Skip to main content

विव्हळून ..

लेखक तिमा यांनी शनिवार, 14/04/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: गविंना सलाम करुन (कारण विडंबन पाडणे हे नेहमीच सोपे असते) उघड्या कानांतून एक विव्हळणारा सूर घुसला कोणा नवगायकाचा हायब्रीड, आंग्लाळलेला नंबर असणार डोक्यात तीव्र झिणझिण्या, आन मनांत गांवरान शिव्या आल्या संस्कारांचे चाप काढून, त्या मनसोक्त खुल्या आवाजात दिल्या. पुन्हा पुन्हा कानात घुसणारे ते अभिजात संगीताचे विडंबन कोण सालं सुरेल केकाटताय बाप मेल्यावाणी भो .... नवीन पिढीची चव नासवून टाकतात भ्रष्ट नकलेच्या सडलेल्या मेंदूंचे ........ नांव विचारलं, तर तो आमचा आवडता 'शंकर' होता मग मी, गपगुमान कानांत बोळे घालून चालू लागलो!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1661
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया