ऑनर किलिंग
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ऑनर किलिंग
(जळगाव मध्ये एका धनगर नावाच्या इसमाने आपल्या पोरीचा गळा दाबून खून केला व खुना मध्ये काका व आजी यांचा हि सहभाग आहे.)
वाहिन्यांमुळे आपल्याला मिळालेला आणि रुजलेला शब्द म्हणजे ऑनर किलिंग.
दोन प्रेमी जिवांच्या नातेवाईकांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी प्रेमी जिवांची केलेली हत्या म्हणजे ऑनर किलिंग अशी याची थोडक्यात व्याख्या.
या भारतवर्षात एक काळ होता जेव्हा स्त्री आणि पुरुष हा भेद न्हवता.लीलावती,गार्गेयी,मैत्रेयी या विदुषींचे दाखले आपण आजही देतो."कामसुत्र" हे या देशात तयार झाले.कामसुत्राचा उल्लेख एवढ्याच्साठी की स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजच्या इतका मागसलेला न्हवता कारण यातील शिल्पे आजही आपल्याला आपल्या मदिरांमधे
पहायला मिळतात.स्त्री ही वस्तु नसुन पुरुषाइतकीच हाडामासाने बनलेली जिवंत व्यक्ती आहे हे आपल्या पुर्वजांनी तेव्हाच मान्य केले होते.
या सर्व काळानंतर मात्र चित्र बदलत गेले.स्त्री ही एक वस्तु झाली कारण परकिय आक्रमण झाली की स्त्री ही भोगवस्तु म्हणुन पळविली जाऊ लागली.
"जोधा अकबर""गदर"या चित्रपटांवरुन वाद झाले कारण यात हिंदु मुस्लिम अशी जोडपी होती.या तत्कालिन घटनांना ती परीस्थीती कारणीभुत होती कारण राजकिय डावपेचात स्त्रीचा वस्तु म्हणुन वापर होत होता.
आताच्या काळात मात्र स्त्री हे अब्रुचे प्रतीक झाले आहे.पालकांनी निवडलेल्या स्थळाव्यतीरिक्त जर एखाद्या मुलीने स्वतःच एखादा वर पसंत केल्यास अचानक त्या घराण्याची अब्रु(?) मातीत मिसळु लागली आहे.पालकांना समाजाचे एवढे भय निर्माण झाले आहे की अशी घटना घडने म्हणजे पालक जगाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नाहित असा घेण्यात येतो आहे.
आणि याची परिणीती म्हणजे आपनच जन्म दिलेल्या आणि वाढवलेल्या पोटच्या गोळ्याची हत्या करणे....................................
हत्या करणे फ़ारच स्वस्त झाले आहे.क्षुल्लक गोष्टीवरुन त्या होऊ लागल्या आहेत.एखाद्याकडे पाहिल,हसला म्हणुनही हत्या होतात असे आपण वाचतोच.माणसाचा जिव इतका स्वस्त झाला आहे का?आपणच जन्म दिलेल्या मुलांचे जिव मह्त्वाचे की आपली प्रतिष्ठा महत्वाची? स्वतःचा हट्ट मह्त्वाचा की मुलांच्या भावभावना महत्वाच्या?आपली मुले स्वतःचे निर्णय सक्षमपणे घेऊ शकत नाहित असा ग्रह बाळगणे म्हणजे पालक म्हणुन आपण स्वतःच कुठेतरी कमी पडलो असे कबुल करणे नाही काय?
प्रेम हे केल जात नाही ते होत असत.प्रेम वय,जात,भेद जाणत नाही.प्रेम म्हणजे व्यवहार नाही की हे सर्व पाहुन केल जाव.पालकांनो लक्षात घ्या आपल्या मुलांनी आपले आयुष्य कुणाबरोबर व्यतीत करायचे हे जर त्यांनी ठरवले तर त्यात मानभंग होतो असे का समजता? मुलांनी निर्णय घेतला आणि तो चुकला तर ते स्वतःच त्यास जबाबदार असतील की.आपण आयुष्यात अनेक निर्णय घेतो तेही चुकतातच की.
या जगाचा अंत होत नाही तोवर प्रेम केले जाईल यात कुठेच शंका नाही.प्रंतु म्हणुन तोवर आपल्याला किती हत्या पहाव्या लागतील या विचाराने अंगावर काटा येतो.
या सर्वावर काय उत्तर आहे तेही कळत नाही.नेहमी मला उत्तर सापडतात पण आज मात्र थोडा चाचपडतोय.
.
.
.
.
कारण समेट तिथे घडतो जिथे समजुतदारपणा आहे.पण दोन माणस दोन ध्रुवांवर बसुन एकमेकांच्या भेटीची आशा बाळगु लागले तर ते कालत्रयी शक्य नाही हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
तुमचा
खोटी प्रतिष्ठा विरहीत मेघपुष्प
प्रतिक्रिया
एक अनुस्वार
च्च !
याही
काय बोलाव किंवा लिहाव ? स्टार