पहिला भाग
अजून राहुलला जगायचे होते.. वर्षानुवर्षे जगायचे होते.. नियती पुढचा खेळ मांडत होती, साऱ्या सोंगट्या आत्ता जवळ येत होत्या.....
"बेटी, बहोत दर्द है क्या जीवन में ..मुक्ती चाहिये?".. अनाहूत प्रश्नांनी उषा भानावर आली. विचार करता करता त्या रस्त्यावरच्या बाकड्यावर तिचा डोळा लागला होता.तिचीच तिला लाज वाटली. पदर सावरून घेत तिने समोर पहिले. तिची धांदल पाहून तो म्हातारा गालातल्या गालात हसत होता. ती फणकारयाने म्हणाली.. "आप की कुछ तकलीफ, अपना रस्ता नापो, चलो बडे आये मुक्ती देणे वाले" .. आणि निघणार तोच म्हाताऱ्याने तिचा हात पकडला.. म्हणाला, "बेटी, मुझे सब पता है | तुम्हारे मियाँ बिमार है, धंदा खतम हो गया, घरमें खाने को अनाज का दान भी नही | फिकर ना करो सब कुछ ठीक हो जायेगा, बस दोन दिन बादवाली अमावस को वो पुराणी बंगाली मै मियाँ को लेकर आना .. ये कुछ पैसे रख्खो, राशन के लिये |" उषा भांबावून गेली, कोण हां म्हातारा, चांगल्या घरातलं तर दिसतो. पण मला का पैसे देतो आणि अमावस्येला त्या बंगलीत.. नको रे देवा, तिकडे काय आहे काय माहित.. पैसे घेऊ की नको.. बेडर मन म्हणाले घे गं पैसे, अमावस्येला जायचे की नाही नंतर बघू, आत्ताची सोय तर होतेय. नाही ह्याने काही उलटे पालटे केलं तर आधीच दिवस खराब आहेत. तिच्या मनातले सर्व विचार चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असावेत.म्हाताऱ्याने अधिक काही न बोलता तिचा हात सोडला, हातात पैसे कोंबले.. नोटांचा स्पर्श जाणवताच तिने समोर पाहिले, म्हातारा कुठेच नव्हता. सबंध रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. ती घाबरली. भास म्हणावा तर हातात नोटांची गड्डी .. मटकन खालीच बसली बिचारी. हे तिच्या आलकनशक्तीच्या पलीकडचे होते. कोण तो म्हातारा, कसा हसतमुख, गोरापान, शुभ्र दाढी पोटापर्यंत रुळणारी, भव्य कपाळ, बोलला हसला तेव्हा त्याचे दात दिसले, कसे एक सारखे होते, विश्वास वाटला कुठेतरी. कपाळावर टीळा होता का .. कफनी कुठली होती, भगवी की हिरवी.. अरे चक्क काळी तर नव्हती.. नाही मला काहीच आठवत नाहीये. काय करू मी.. राहुल काय म्हणेल?
राहुल, अरे राहुल घरात एकटा आहे.. मी पण काय वेंधळी. राहुलची आठवण येताच उषा सारे काही विसरली.पळतच घरात शिरली.राहुल बेडवर पहुडला होता.. त्याची नजर खिडकीकडेच होती.पण शुध्द हरपली होती. उषानी त्याला सरळ केला,सलाईन बदलले. चादर निट केली., आणि शांत पाने बाहेर आली. आता हा कधी शुद्धीवर येणार काय माहित, डॉक्टरांना फोन करावा का? पैसे आहेत, हो दिलेत न त्या म्हाताऱ्याने. म्हाताऱ्याचा विचार तिला चटका देऊन गेला. फार विचार न करता, तिने डॉक्टरांना फोन केला, बाहेर जाऊन कुलूप लावले आणि इमेसिबीच्या हापिसात जाऊन बील भरून आली. चहापाणी देऊन लाईट सुरु करून घेतली.घरी आली तो डॉक्टर वाटच बघत होते, इंजेक्शन आणि गोळ्या देऊन ते चालते झाले. त्यांची फी ने देऊन टाकली, तरी मेल्याने हात दाबलाच. मानेला झटका देतच ती बाहेर पडली, किराणा माल आणला..म्हाताऱ्याने पैसे बरेच दिले होते.. महिना - २ महिने नक्की जातील असे तिला वाटून गेले. सध्या नोकर नसल्याने घरातली सारी कामे तिलाच करावी लागत होती. संध्याकाळ झाली, तशी ही देवघरात आली.. दिवे लावताना तिला खुप विचित्र वाटत होते, ही कधी देवघरात यायची नही. काकाच काय ते बघायचे, आज काका पण नव्हते. बऱ्याच दिवसांनी तिने आज दिवे लावले. स्वयपाक करून राहुलला भरवले. साहेब शुद्धीवर आल्यावर त्यांनी बेल दाबून सूचना दिली होती. त्याचा बेड वगैरे साफ करून, त्याला परत झोपवले.मग ही जेवली,आवरा आवर करून बेडरूम मध्ये आली. हीच ती बेडरूम जिथे काही दिवसांपूर्वी स्वर्ग नांदत होता.. आज उजाड झालाय तो. हुंदका दाटून आला तिला,उशीत तोंड खुपसून बराच वेळ रडली, मग न जाणे कधी झोप लागली तिला.
जागी झाली तो सूर्य चांगलाच वर आल होता, उठावेसे वाटत नव्हते, पण राहुलने बेल दाबून घर डोक्यावर घेतले होते. त्याच्याकडे जाऊन, त्याला सरळ करायला तिने हात पुढे केला.. तसा तिला धक्का बसला. हातावर कसलेसे वळ दिसत् होते.काल म्हाताऱ्यानी हाच हात पकडला होता. ती जागा हिरवट काळी दिसू लागली होती. राहुलने हात हलवताच ती भानावर आली. विचार मागे सारत कामाला लागली. राहुलचे सगळे आवरून ही पर्यंत तास गेला. मग ने स्वतःचे आवरले. आज त्याने पेज नीट नही खाल्ली, काय झाले असेल त्याला? पण मी तरी काय करू? बाकी काही द्यायचे नही डॉक्टरांनी बजावले आहे. विचार करत ती न्हाणीघरात आली, तसे तिचे हाताकडे परत लक्ष गेले, हुळहुलत होते थोडे. तिने आयोडेक्स लावले आणि गरम पाण्यानी हात शेकल. अंमळ वाटले तिला. आज तिला देवघरात जावेसे वाटलेच नही.भाजी करताना लाल टोमाटो नुसतीच बघत बसली. खास काही घडले नही, काम तर फारसे नव्हतेच. टीव्ही बघत बसली तर कुठलातरी भुताचा पिक्चर लागल होता.. तिला असले चित्रपट अजिबात आवडत नसत. टीव्ही बंद करून तिने पुस्तक उघडले. वाचनात पण लक्ष लागत नव्हते, सगळे नवीन छंद लग्न लागल्या पासून जोपासले होते. नटण्या - मुरडण्याची आवड तिने मारून टाकली होती. राहुल तिला म्हणायचा तुझी आई जशी आहे तशी तुला व्हायचं का? .. ती सुधारायचा यशस्वी प्रयत्न करीत होती. परत तिने टीव्ही लावला, आता सिरियल्स बघू लागली. तिच्या ही नकळत तिने चॅनेल बदलले. आता ती भुताचा चित्रपट आवडीने पाहत होती. तिचे लक्ष असते तर तिला कळले असते, खिडकीतून काळी मांजर येऊन राहुलच्या छातीवर बसली होती.
आज अमावस्या, आज त्या म्हाताऱ्याने बोलावले आहे. जायचे की नाही. राहुलला काय सांगू, त्याला असल्या बुवा बाजीची चीड आहे. तो संतापेल. आज ती चिकन करत होती.. बाजारात फिरताना आज तिला हेच आवडले. कोंबडी कापताना आज तिला आनंद झाला.चिकन शिजत असताना, तिला कोंबडीची तडफड आठवून आनंद वाटत होता. तिने ठरवले आज एकटेच जाऊया. राहुलला काही सांगायला नको. तो झोपला की जाऊन येते. तशी हाताची हूळहूळ कमी झाली. बघता बघता दिवस उलटला. रात्रीचे आठ वाजले असतील नसतील, दार वाजवले कुणीतरी. ने की-होल मधून पहिले तर काका.. आंनंदाने तिने दार उघडले.. काका, बाहेरूनच म्हणाले .. उषे येणार ना.. मग चला की, राहुलला घेऊन जायचे आहे. ती हादरली, काकांना कसे कळले.. "काका कुठे जायचे?", तिने हळूच विचारले. तसे काका जोरात हसले.. म्हणाले, "पैशाचा हिशीब द्यायला जायचे बेटा.. चला". "काका, राहुलला नको, आपला व्यवहार आपणच पाहूया. पण आजचा हां, परत नाही येणार मी." ती निक्षून म्हणाली. तसे काका विचारात पडले.. ठीक आहे म्हणाले.. उषा गेली काकांसोबत.
काका तर कधीच गायब झाले होते, मग काका आले कुठून .. उषा नक्की कोठे गेली.. काय चालू आहे नक्की.. उषाने कुठून पैसे आणले.. काय करणार आज ही.. की ही पण तिच्या आईप्रमाणे... सगळे आवाज घेत पडून राहिलेला राहुल आतून बाहेरून संतापला.. त्याच्या अंगाची आग आग होत होती.. पण तो हतबल होता.... केवळ वाट बघणेच त्याच्या हातात होते.. आणि तो वाट बघत राहिला.. ..
क्रमशः
याद्या
2177
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
बाब्बौ!
कथानक बरं वाटतंय, मांजरं आणि
दोन्ही भाग आजच वाचले आहेत.
मस्तच रे !