ए सुमनांचे राणी
ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू
तुझे स्मितहास्य, कहर जाहले
न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी
कटाक्षांचे मिलन, कहर जाहले
तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी
ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की
त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज
मला ऐकविणे, कहर जाहले
कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते
कधी चालतांना, बिथरणे, उसळणे
हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे
उतरून चढविणे, कहर जाहले
ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र
तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही
ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी
तुझे धुंद होणे, कहर जाहले
ह्या गाण्यातली बहार अनुभवलेल्यांना गीतकार ओळखता यावा नाही का!
:) गजब हो गया.......
मस्त जमलंय...
असेच म्हणतो.
+२
मस्त!
छान !
सुंदर अविष्कार. मस्त जमलय.
(No subject)
कुणालाच गीतकार ओळखू आलेला दिसत नाही ! कमाल आहे.
गीतकार सांगायचा होता का? तर
गीतकारही ओळखलाच होता म्हणा की! उत्तम.
सायबा