Skip to main content

मोबाईल कंपन्यांची नवी बाजू

लेखक मनमौजी यांनी गुरुवार, 05/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझा सोबत घडलेल्या ह्या प्रसंगाने मला मोबाईल कंपन्यांची नवी बाजू दाखवली. तिच बाजू तुमचा समोर मांडण्याचा हा माझा प्रयत्न. मि एक एअरटेल प्रि-पेड चा ग्राहक आहे. एअरटेल प्रि-पेड सोबत मि नेटवर्क विशयीचे चित्र-विचित्र अनुभव घेतच असतो. परन्तु, यावेळी तस नाही. काल रात्रि मि पाहिलेले शेवटची शिल्लक होती रू.५०.५४. पण आज सकाळी जेव्हा मि एका कॉल नन्तर बिल पाहिले तेव्हा मला ध्यानत आले की एअरटेलने माझा १ पैसा कमी केला होता. माझी शिल्लक रू.४५.५३ इतकी होती. १९८ ला लगेच कॉल केला. ५-७ मिनिट लागले कस्टमर केअर एक्झिक्युटीवशी बोलायला. त्या सुन्दर आवाझ असनार्‍या बाईला माझ बोलण पटेना. मि तिला माझा टेरीफ प्लान सम्बन्धी खालिल विवरन दिले: Call Rates: Rs.1, Rs. 0.10 SMS: Rs. 0.10, Rs. 0.25 तिल हे समजावून सांगताना माझा नाकी नऊ आले की कसाही कॉल केला तरी माझा बिलातून १ पैसा कमी होणे शक्य नाही. जवळ जवळ अर्धा तास वाद घातल्यावर त्या बाई ने मला माझा १ पैसा परत करन्याची हमी दिली आणि झाल्या प्रकाराबाबत माझी माफी देखील मागीतली. झालेल्य प्रसंगाला जेव्ह मि पुन्हा निट पाहिले तेव्हा विचार आला की, प्रि-पेडचे करोडो ग्राहक आज भारतात आहेत. प्रत्येकाचा खिशाला जर ही १ पैशची गळती लावली तर किती लोक असतील ज्याना हे लक्षात येइल? आणि ज्याना लक्षात आल नाही त्यांच पैशाच काय? आता तुम्हिच विचार करा या मोबाईल कंपन्यांच बलन्सशिटचा आणि तुमच्या मोबाईलच्या बॅलन्सचा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8036
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

पैसातै आणि ढब्बू पैसाच्या प्रतिक्रियेंच्या प्रतिक्षेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ढब्बू पैसा चलनातून कधीच बाद झाल्याने प्रतिक्रियेतही 'अर्थ' नाहीच ;) तर असोच :P

=))

ऑफिस स्पेस चित्रपटासारखे कुणी १ , १ पैसा गोळा करून आपले तळे तर नाहि साचवत एअरटेल मधले कुणी ??

>>१ पैसा परत करन्याची हमी दिली पैसा परत मिळाला/नाही मिळाला, कि आणखी एक लेख टाका...... म्हणजे एअरटेल लुबाडलेले पैसे परत देतं कि नाही ते कळेल....... ;)

काल रात्रि मि पाहिलेले शेवटची शिल्लक होती रू.५०.५४. पण आज सकाळी जेव्हा मि एका कॉल नन्तर बिल पाहिले तेव्हा मला ध्यानत आले की एअरटेलने माझा १ पैसा कमी केला होता. माझी शिल्लक रू.४५.५३ इतकी होती. तुमचा प्लान हा 1ps / per second असणार. म्हणून तुमचा ब्यालेंस पैशात कापला गेला असेल

एयरटेल काय आणि रिलायंस काय सगळ्याच मोबाईल कंपन्या हाच घाऊक धंदा करतात. बाकी तुम्हाला हे आताच कसे काय लक्षात आले बुवा... - (प्रीपेडपप्पू) पिंगू

In reply to by पिंगू

आता काय आणि नंतर काय, लक्षात येणे महत्वाचे आणि दुसर्‍यांचा लक्षात आणून देणे त्याहूनही महत्वाचे...

एअरटेल के क्या कहने!!! कस्ट्मर केअरशी बोलायचं तर ५० पैसे / ३ मिनिट घेतात... आणि किमान ५-७ मिनिटं "आपका कॉल बहुमुल्य है.. क्रुपया प्रतिक्षा करे!!" म्हणतात.. तिथे रुपया जातोच.. मग मंद लोक बोलतात त्यांना काही एक कळत नाही.. त्यात खुप वेळ जातो... शेवटी हातात काहीच नाही आणि बॅलेन्स मात्र २-३ रुपयानी कमी होतो... तुमच्यात बरीच चिकाटी असणार हे सगळं करायला...

In reply to by पिलीयन रायडर

एअरटेल के क्या कहने!!! कस्ट्मर केअरशी बोलायचं तर ५० पैसे / ३ मिनिट घेतात... आणि किमान ५-७ मिनिटं "आपका कॉल बहुमुल्य है.. क्रुपया प्रतिक्षा करे!!" म्हणतात.. तिथे रुपया जातोच.. मग मंद लोक बोलतात त्यांना काही एक कळत नाही.. त्यात खुप वेळ जातो... शेवटी हातात काहीच नाही आणि बॅलेन्स मात्र २-३ रुपयानी कमी होतो... तुमच्यात बरीच चिकाटी असणार हे सगळं करायला...
प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्हीसाठी कस्टमर केअरचे कॉल विनामोबदला आहेत. मी गेल्या ७ वर्षात एकदाही क.के. शी बोलताना चार्ज लागल्याचे बघितलेले नाही. * *अर्थात फ्रेंडस अथवा तत्सम कार्डला वगैरे काही वेगळे नियम असतील तर कल्पना नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

१९८ ल केलेला कॉल ह फुकट आहे पण १२१ ला कॉल केला तर वरिल प्रमणे ५० पैसे / ३ मिनिट आकारली जातात.

In reply to by मनमौजी

तुम्हाला आता कुठे कॉल करायचा हेच माहिती नसेल तर असेच होणार ना. ;) आमचा एक मित्र तर अजूनही बर्‍याचदा क.के. ला फोन करून त्याच्या समसचा काउंट किती झाला आहे ते विचारतो. =))

५०.५४ - ४५.५३ = ५.०१ ०.०१ नव्हे.. :-) तरी पण वरचा एक पैसा कसा गेला.. तुमचा मुद्दा बरोबर..

१९८ ला लगेच कॉल केला पण १९८ हा महानगर टेलिफोनचा आहे ना आणी तुमचा सेल नंबर ऐअरटेल चा आहे ना. ये बात कुछ हजम नही हुइ जनाब.... १९८ का १२१ ह्या शंकेत असलेला शंकेखोर

In reply to by अमृत

अमृत साहेब, माझ्या एका नातलगाला... ऐअर टेल कडुन पोस्ट पेड कनेक्शन च बिल आल होत तेहि वापरात नसलेल्या नंबरच, नाममात्र रुपये ९८३०/- तेही २००५ मध्ये . तेव्हा पासुन ऐअर टेल चा जो धसका घेतला तेव्हापासुन ऐअरटेल पासुन लांबच आहे. त्या मुळे १९८ हा नंबर ऐअरटेल चा आहे हे माहीतच नव्हते. ही माहिती आताच मिळाली.

In reply to by मनराव

बर्‍याच मोबाईल सेवादात्यांचे क.के. क्रमांक सारखेच आहेत. पण ते त्या त्या मोबाईल सेवादात्याच्या सिमकार्ड वरतीच चालतात ही खरी मेख आहे. ;) दोन वर्षापूर्वी तर एका सेवादात्याचा मेसेज सेंटर नंबर वापरून दुसर्‍या सेवादात्याच्या कार्डवरून हवे तेवढे समस फुकटात करता येत होते. अर्थात १५/२० दिवसात हे लक्षात आले, पण तोवर बर्‍याच जणांची चंगळ झाली.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कित्तेक एसेमेस केलेत फुकट. हद्द म्हणजे बाजुला बसलेल्या मित्राला व.पा. खायला चलतो काय हे विचारण्यासाठीपण ही ही ही... पण ६-७ वर्षांपूर्वी.. :-) अमृत

In reply to by अमृत

एका मित्राच्या स्कीम मध्ये एक आठवडा एसेमेस फ्री होते६-७ वर्षापुर्वीची गोष्ट आहे ही. त्याने एका आठवड्यात ९००० मेसेजेस केल्याची माहिती दिली त्याने. :)

ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत काही करता येणार नाही काय? आजकाल दूरदर्शनला बर्‍याचवेळा जाहिराती (माहितीचा अधिकार आणि ग्राहक संरक्षण) येतात. सह्याद्री वाहिनीच्या सात आणि साडेनऊच्या बातम्यांअगोदर (वा दरम्यान) जाहिराती येतात. सबळ पुरावा असेल तर कंपनीला भुर्दंड द्यावा लागेल.

अहो airtel आहेच अस. आमच्या office च्या नंबरचा पण एक घोटाळा करून ठेवलाय यांनी. हे लोक (call centre) लोकांना call करतात आणी cut करतात. असे (ज्यांना call गेलाय) लोक जेव्हा return call करतात तेव्हा तो फोन आमच्या office ला लागतो. गेले २ महिने अस चालू आहे. airtel ला तक्रार केली तर ते लोक बोलतात की त्यात काय नंबर बदलून टाका. आता बोला.

In reply to by शिल्पा नाईक

उलट अशावेळी तुम्ही एयरटेल कडून बोलत आहात असे सांगून समोरच्याला तुमच्या बॅलेन्समधून दंड म्हणून १००/- कमी होणार आहेत, आणि तेवढा बॅलेन्स नसेल तर पुढच्या रिचार्जला होणार असे सांगायचे. वरती पोलीस केस होणार आहे असे देखील सांगायचे. अधिक माहिती साठी एयरटेलच्या व्हेगा सेंटर अथवा इतर कुठल्याही झोन ऑफिसचा नंबर देऊन टाकायचा. २४ तासात एयरटेल झक मारत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते का नाही बघा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

इथुन तिथुन मिथुन अज्जाबात नाय ! आम्ही मकर वाले आहोत. बाकी अशा बर्‍याच युक्त्या ट्राय करणे चालु असतेच. ;)

माझ्या भावाच्य मोबाईल वर रोज जोक्स वाले समस यायचे एअर्टेल कडून आणि प्रत्येक समस चा रू१ कटायचा. मी कॉल करून जाब विचारल्यावर क.के. वाले म्हणाले सर तुम्हीच ही सुविधा अ‍ॅक्टिवेट केली आहे जे की खरं न्हवतं. शेवटी तो माझ्यावर दया दाखवण्याचा अविर्भाव करून बोलला सर, तुम्ही म्हणता म्हणून मी आतापर्यंत कापलेली रक्कम परत करतो. मी बोललो मी बोलतो म्हणून नाही तुझे रेकॉर्ड चेक कर आणि तुझ्यानी जमत नसेल तर तुझ्या मॅनेजरला लाइनवर घे. उगा उपकार केल्याप्रमाणे बोलू नको. मग त्यानी मुकाट्यानी पैसे परत केले. :-) गेल्या महीन्यात इंटरनेटच्या बिलात रू८५ जास्त लावून मला एअरटेलने बिल पाठवले मी क.के. ला कॉल केला तर उत्तर मिळाले की ते अँटी व्हायरसचे पैसे आहेत जे 'मी' अ‍ॅक्टिवेट केलं. मी त्याला सांगितलं 'अन्ना माझ्याकडे महागडा अँटीव्हायरस असताना मी तुझा टुकार सॉफ्टवेअर का म्हणून घेइल' मग तो नरमाइनी बोलला 'सार, वो सिस्टमका गलती हो गया'. असो एक गोष्ट नक्की की आपण जाब विचरला नाही तर या कंपन्या डोक्यावर घाण करायला कमी करणार नाहीत. आजकाल बरेचदा 'कोण वाद घलणार आणि कीतीशे पैसे वाचणार ' म्हणून बहुतांश लोक या बाबींकडे दुर्लक्ष करतात आणि या कंपन्या त्याचाच फायदा घेतात. अमृत

In reply to by अमृत

आजकाल बरेचदा 'कोण वाद घलणार आणि कीतीशे पैसे वाचणार ' म्हणून बहुतांश लोक या बाबींकडे दुर्लक्ष करतात आणि या कंपन्या त्याचाच फायदा घेतात.
अगदी अगदी. आणि एखाद्या मोबाईल नं. वरून पैसे कापले गेल्यावरती रागारागाने (आणि गुर्मीने) २/३ वेळा कॉल आला की त्या विशिष्ट नंबरला पुन्हा हा त्रास होत नाही असे देखील एक निरिक्षण आहे. मला देखील पिक्चर मेसेज अ‍ॅक्टिव केले म्हणून रोज एक रुपायाचा भुर्दंड बसत होता. मी अक्षरशः त्या लोकांना बोललो की 'अशा चोर्‍या करुन बायका पोरांची पोटं भरण्यापेक्षा आम्हाल सांगा, आम्ही दर रिचार्ज मागे एयरटेल कंपनीला १०/१५ च्या ऐवजी २०/२५ रुपये देत जाऊ. एयरटेलला भिक लागली आहे असे स्पष्ट सांगून मोकळे व्हा पण चोर्‍या करू नका." फार लागले असावे त्याला ते बहूदा. =)) त्याने ४ दिवसांचे पैसे दोन वेळा असे एकूण आठ रुपये माझ्या खात्यात जमा केले. अर्थात पुढच्या २४ तासात ४ रुपये परत घेतले म्हणा कापून.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण अजुन एक मेख आहे.. माझ्या नवर्‍यानी प्रि-पेड वरुन पोस्ट पेड करुन घेतलं, तर त्याला दुपारि १ वाजता मेसेज आला की आता तुमची सेवा बंद होउन ४ तासानी पोस्ट पेड सुरु होईल.. सेवा बंद तर झाली पण दुसर्‍या दिवशी सकाळी १० पर्यंत सुरु झाली नाही. मग दुसर्‍या मोबाइल वरुन क.के ला कॉल केला.. तर त्या येडीनी ९८९००१२३४५ असला काही तरी नंबर पोस्ट पेड साठी आहे तो लावा म्हणुन सांगितलं.. तो लावला तर परत प्रि-पेडच क.के... आताच्या बाबाने परत ९८९००१२३४५ हाच नंबर दिला.. त्याला सांगितलं की अरे आम्ही तोच नंबर लावलाय... तरी त्याचं एकच म्हणण.. नाही तुम्ही परत लावा.. मग ३ र्यांदा हेच झाल्यावर हे कळालं की हा नंबर पोस्ट्पेड वरुन्च लावता येईल आणि हेही कळालं (४थ्यांदा कॉल केल्यावर) की ३ च्या वर कॉल करता येत नाहीत... क.के आपोआप आपला कॉल कट करते.. असं का हे विचाराय्ला अजुन एका तिसर्‍या नंबर वरुन कॉल केला तर २ वेळा सरळ मध्येच बोलता बोलता कॉल कट केला (उत्तरे देता येइनात आणि आम्ही जाम भडकलो होतो म्हणुन..) नंतर कळाले की (ओफिसात जाउन भांडल्यावर) चुकुन दुसर्‍याच सिम नम्बर वर हे झाल्याने सिम बदलावे लागेल व त्याचे चार्जेस वेगळे पडतील.. मग ते देणार नाही म्हणुन भांडल्यावर नवे सिम मिळाले (फुकटात) आणि २ तासानी सेवा सुरु झाली... आता जर तुमचे कॉल कट केले बोलता बोलता आणि ३ च्यावर तर तुमचा कॉल लागुच दिला नाहि तर कशी करणार तक्रार...

की ५.०१ कापुन ह्यांनी झापल्यावर ०.१ परत केले.

आयडिया , एयरटेल , व्होडाफोन आणि टाटा वापरुन (थोडक्यात चार धाम यात्रा करुन ) शेवटी बी. एस्स.एन. एल. ला शरण गेलो....ते सध्या जरा बरे चालले आहे.....

२०-२२ वर्षांपुर्वी लोकांच मोबाईल वाचुन अडत नव्हत. हा सगळा चंगळवाद आहे. कनेक्षण तोडा. आणि हँडसेट विकायचा नसेल तर विजेरी,रेडियो, कॅमेरा, एम पी ३ प्लेयर म्हणुन वापरा. हाकानाका. :)

In reply to by गणपा

हा सगळा चंगळवाद आहे. >> सगळे तलवारीनी खेळत असताना एकदम कोणीतरी अणुबाँब टाकल्यासारखी गत झाली....... ;)

क. के. ला बोलताना कितीही चिडायचं नाही म्हटलं तरी ते तिथे चीड आणायलाच तिथे बसवलेले असतात असं नेहमी वाटतं. नंबर डायल केलात, पटकन एखाद्या जीवंत मानवी आवाजाने तिकडून रिसीव्ह केला तर तुम्ही पोस्टपोड असलात तरी त्या दिवशी तेहेतीस कोटी देवांची आणि सहासष्‍ट कोटी शास्‍त्रज्ञांची तुमच्यावर मेहेरनजर आहे असे बिनदिक्कत मानावे. मगर ये हो नहीं सकता! जादुगाराचा प्राण पिंजर्‍यात ठेवलेल्या पोपटात असावा आणि तो पिंजरा बारा गुहा आणि तेरा समुद्रापार कुठल्यातरी दरीत असावा त्या दुर्गम जागी हे क.के. बसलेले असतात. आपण इकडून आग लागल्यासारख्या घाईत नंबर डायल करतो आणि सत्त्वपरिक्षा सुरू. अतिगोड हिणकस आवाजाच्या बाईची रेकॉर्ड (स्वर 'मी फार थकलेय बरं, पण माझं नशीबच फुटकं इथं हे बोंबलत बसावं लागतंय): झझझ कंपनी में आपका स्वागत है. ये करने के लिये वो दबाईये, वो करने के लिये ये दबाईये ... आपण चार शिव्या घालून ती बटणं दाबत दाबत इप्सित ठिकाणी जातो (अचूक बटण दाबायला चुकलात की पुन्हा नवा गडी नवा राज.. माझा तर संयम इथेच हरे राम म्हणतो ), रिंगही जाऊ लागते... पण मध्‍येच ती रेकॉर्ड केकाटू लागते.. इस वक्त हमारे सभी एक्झी‍क्युटिव्हज् अन्य ग्राहकों को सेवा देने में व्यस्त है. आप हमारे बहुमूल्य उपभोक्ता है (हो, म्हणूनच ही फळं भोगतोय, हरामखोर! ) , कृप्या प्रतिक्षा करें [मग कानावर त्यांच्या जाहिरातींची बळजबरी] झझझ पेश करता दादादादी कॅलिंग स्कीम जिसमें आप पा सकते है पुरे महिनेभर आपके दादादादी के साथ मनपसंद बातें, वो भी सिर्फ 50 रुपए में ( सिर्फ 50 रुपए में म्हणताना तिला कुणीतरी गुदगुल्या केल्यासारखा ती आवाज काढते, आणि आपण दारात कितीवेळचा उभा आहे, पण कुणीच भीक घालायला तयार नाही तसे मख्‍ख! आपल्या संयमाची काशी ! कॉल कट करावा वाटतो ) शेवटी ती किटकिट एकदाची बंद होऊन भस्सकन् मध्‍येच कॉल जोडला जातो आणि पुढचा तमाशा सुरु - 'मैं झझझ से विशाल आपकी क्या सहायता कर सकता हूं?' 'ये घटिया आयवीआर पहले उखाड के फेक दो.. और किसी जिंदा आदमी को यहां पटकाओ सीधी बात करने के लिये ..' 'सॉरी सर, आपकी असुविधा के लिये खेद है, क्या मै आपका नाम जान सकता हूं ?' '***********' क्या मै आपका नंबर जान सकता हूं? 9999999999 ' क्या ये वही है जिस नंबर से आप बात कर रहें है? ' 'नहीं, उसको धोने के लिये बाल्टी में भिगोया है.. ये तो दुसरा वाला है.. क्या यार, तुम्हारे सामने जो डिब्बा रखा है उसपर मेरी पुरी कुंडली पडी है.. फिर क्यों परेशान कर रहे हो ? उसमे देख नहीं सकते?' 'क्या आपकी समस्या बतायेंगे?' 'मेरा आऊट गोईंग बंद किया गया है..पच्चीस बार कॉल कर चुकां हू.. अभी तक शुरु नहीं हुआ..' 'क्या आप बतायेंगे की आपने पिछला पेमेंट किस मोड से किया था? कैश, चेक या इंटरनेट?' 'उज्जैन की दानपेटी में कैश डाला था' 'क्षमा करें सर, आप असभ्य भाषा का प्रयोग कर रहें है..' 'वो कहावत है ना उलटा चोर कोतवाल को डांटे.. मै पैसे भर चुका हूं, उसकी रसीद मिल चुकी है फिर भी ये फालतूगिरी की जांचपडताल करनी जरुरी है ? ' 'आपकी असुविधा के लिये खेद है सर, लेकीन हमारी सिस्‍टीम के अनुसार जानकारी तो लेनी होगी ' 'हां, हां.. ले लो, समय पडेवो पाछे गधेडानू काको कहेवो पडे! तुम्हारे एबी रोड वाले आऊटलेट में पेमेंट किया था.. उस घटिया जगह पर सर्वर डाऊन था.. इ‍सलिये उसी वक्त पोस्‍टींग नहीं हो सकी.. और यहां तुम्हारे मुंह लगना पड रहा है.. ' बस्स! पुढे लिहू पण शकत नाही.. यथेच्छ शिव्यांचा वापर न केलेले फार थोडे कॉल मला आठवतात (हंड्रेड पर्सेंट ब्लॅकलिस्टेड) यक्कू

In reply to by यकु

तुम्ही तांडव न्रुत्य जरी केलंत ना... म्हणजे लिटरली जटा सोडुन नाचलात्..जोरजोरात शिव्या घातल्यात.. आणि मग खुप चिडचिड करुन दमुन तुम्ही धापा टाकायला लागलात तरि... " असुविधा केलीये खेद है" ह्या एका वाक्यात तुमची विकेट निघेल...!!! नाही तर मग तुमचा डान्स चालु असतानाच कॉल बंद होतील...!!!!

In reply to by पिलीयन रायडर

अगं मी स्वतः एकेकाळी रिलायंसच्या कॉलसेंटरमध्ये काम करायचो. तेव्हा ह्या प्रकारचे वैतागलेले ग्राहक कमी असायचे आणि टाईमपास करणारे ग्राहक जास्तच यायचे. तेव्हा हमरीतुमरीवर येऊन कितीतरी ग्राहक पळवले होते. पण ज्यांना खरोखरच त्रास झाला होता, त्यांना मात्र मदत केली होती. बाकी असे खरोखर वैतागलेले ग्राहक त्यामानाने कमीच बघितले होते. - (एकेकाळीचा कॉल सेंटर एजंट) पिंगू

In reply to by पिंगू

हाहाहाहाहा =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =))=)) =)) =))=)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =))=)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खॅखॅखॅ करीत एकदम खोलीभर लोळलो !!!!

In reply to by यकु

एकदा एका पोरीने टाईमपास म्हणून रात्री १२:०० वाजता कॉल केला होता आणि नेमका तो माझ्याच वाट्याला यावा. तेव्हा त्या बयेला कसं फुटवलं हे माझं मलाच माहित रे यक्कु.. ;) - पिंगू

येथील असंबद्ध प्रतिसाद डिलीट करावेत मनमौजी आपण म्हणता तो प्रॉब्लेम गम्भीर आहे मी या कंपनीकडून २ वेळा माफी लिहून घेतली आहे

मूळात Call Rates: Rs.1, Rs. 0.10 SMS: Rs. 0.10, Rs. 0.25 असा प्लान असेल तर, ५०.५४ अशी शिल्लक राहणे कसे शक्य आहे? कदाचित, अशी एक पैश्याची चोरी त्यांनी पूर्वीदेखिल अनेकदा केली असावी!

In reply to by सुनील

तुमची शंका स्वाभाविक आहे. पण काही रिचार्ज जसे की रू. १०० ला रू. ८८.३९ तुमच्या मोबाईल बॅलन्सला नेहमी बदलता ठेवतात. त्यामुळे वरील नमूद बॅलन्स येतो. ही घटना केवळ माझा सोबत घडलेली नसून माझा एका मित्राला देखिल ह्याची प्रचिती आली आहे.

भारती चा एकूण २०११चा नफा= 38,241.20 करोड रुपये. समजा एक करोड* लोक प्रिपेड वापरतात. दररोज एक पैसा पकडला तर ३६५ पैसे प्रत्येकी वर्षाचे. ३. ६५ रुपये = ३.६५ करोड म्हणजे नफ्याच्या ०.००९५ % *अंदाजे एक मोठा आकडा. १० करोड पेक्षा जास्त प्रिपेड कनेक्शन असण्याची शक्यता नाही असे मला वाटते. म्हणजे काहीच नाही. कोणतीही कंपनी इतक्याश्या पैशांसाठी "लोकांना फसवून" काहीतरी करेल हे व्यावहारीक वाटत नाही. कारण अशामुळे होणार्‍या बदनामीचे नुकसान फार मोठे असते. (शिवाय कायदेशीर रीत्याही कोणी केस करून मोठे नुकसान घडवून आणू शकतो) मी जेव्हा मद्रासमध्ये होतो तेव्हा आम्हाला देशभरता फ्री एसएमएस होते, पण त्याकरता रोज एक पैसा आपोआप कट व्हायचा. नंतर हच ने फॅमिली काँलिग सुरु केलं होतं. त्यामध्ये पाच हच नंबरना १ पैसा प्रतिमिनीट मध्ये आम्ही कॉल करु शकत होतो. त्याकरता रोज एक रुपया आपोआप कट व्हायचा. वरील प्रकरण प्रथमदर्शनी असेच वाटत आहे. तो पैसा परत केला गेला हे मात्र गमतीशीर आहे. सिस्टीममध्ये कस्टमर केअर रीप्रेझेंटेटीव्हला तसं करण्याची सोय असते का? इतर कोणाचा पैसा कट होतो का? (अन्यथा सुनील यांचा प्रश्न रास्त आहे.)

In reply to by Nile

क. के. ला सर्व सोई उपलब्ध असतात. एकदा माझी एका क. के. सोबत खडाजंगी झाली, कारण होते न मागता दिलेल्या कॉलर ट्युन्सचा. तो उत्तर भारतीय असल्याने त्याची बोलन्याची पध्दत उध्धट प्रतित होत होती. ह्यावर मि त्याला चार शब्द सुनावले तर त्याने माझा कॉल बन्द केला. इतकेच नाही तर त्याने चार नविन सर्विसेस माझावर लादल्या आणि हे त्याने कॉल बन्द केल्या नंतर पाच मिनीटात केले. मला पुन्हा क. के. ला कॉल करावा लागला. त्याना पुन्हा सगळा प्रकार सांगावा लागला आणि हे विकतच दुखण मला २ तास इतक महाग पडल.

मित्तल, अंबाणी, टाटा असे लोक बरेचदा आपले आत्मचरीत्र लिहीतात त्यात आपल्या सक्सेस स्टोरीज लिहितात. आपण कसे कष्ट घेतले, अडचणींवर मात कशी केली इ. पण एक गोष्ट कुणीच लिहीत नाही. ते म्हणजे आपण चोर्‍या केल्या. कस्टमरलाच लुबाडले.

आमच्याकडे पेट्रोलचे भाव दाखवताना $३.९९ (आणि मग छोट्या अक्षरात +९/१० सेंट असं लिहिलेलं असतं) म्हणजे पेट्रोलचा भाव खरा $३.९९९. आता सेंट हे सगळ्यात लहान नाणं असताना ०.९ सेंट कसे देणार? पण असतो तसा भाव. इथे त्याच्या उलट परिस्थिती असू शकेल. म्हणजे तुमच्या कॉलचा दर मिनिटाला ९९.८० पैसे असू शकतो. कारण जाहिरातीत १ रुपयापेक्षा कमी किमतीत बोला असं म्हणता येत असेल. कदाचित इतर कारणं असतील. पण तुम्हाला सांगताना ते सोपं म्हणून १ रुपया सांगतात. मग पाच मिनिटं बोललात की तुमचे झाले ना ४.९९. किंवा कदाचित खरा भाव १००.२० पैसे असताना तो राउंड ऑफ करून १ रुपया म्हणणं कायद्यात बसतही असेल. मग पाच मिनिटात ५.०१ होतात. असो. सांगायचा मुद्दा काय की अशा गमतीजमती होत असतात.