Skip to main content

प्रवास जीवनाचा...!

लेखक वेणू
शनिवार, 31/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्याची लय गवसली, असं जाणवताच सर्वांग सरसावतं ठेका धरायला.... 'पण-परंतू' येणारच आडवे.....! खाच-खळग्यांशिवाय मजा ती कसली? अपरिहार्य प्रवासातलं- ठेचकाळणं, बांधीलच जणू! बिघडतोच ठेकाही! प्रवास मात्र, तसाच अखंडित.. त्याच्याच गतीचा...!! येणार खळगे, विस्कटणार सूरही.. तालास लयीची भेट घडवून आणण्याची कसरत आणि जिम्मा, फक्त आपलाच! जगणं असं स्विकारलं ना की मग सहज जमतं, लयीत ठेचकाळायला.... -बागेश्री (पूर्वप्रकाशित- दीपज्योती दिवाळी अंक २०११ - http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_09.html)
लेखनविषय:

वाचने 1646
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

बागेश्री सुंदर आहे कविता... दीपजोती मधे प्रकाशित झालीये का ? अभिनंदन तुझं ! मनापासून कौतुक :)

आवडली. तालास लयीची भेट घडवून आणण्याची कसरत आणि जिम्मा, फक्त आपलाच! जगणं असं स्विकारलं ना की मग सहज जमतं, हे मुक्तक छान आहे. यात गझलेची जान आहे.

@जगणं असं स्विकारलं ना की मग सहज जमतं, लयीत ठेचकाळायला....>>> व्वा...व्वा....अर्थपूर्ण,आणी खुप काही शिकवणारी कविता