Skip to main content

ऒंजळीत हिरव्या काचा

लेखक भारी समर्थ यांनी सोमवार, 26/03/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
ऒंजळीत हिरव्या काचा माझ्या रिकाम्या हाती प्राणसखी ती माझी मज सोडून झाली पुढती हा काळ एकटा झाला की नशीब माझे रूसले गालावरले झरले थेंब मी स्वहस्ताने पुसले या वेळी संसाराच्या का तुजविन जगणे आले आठवणीच सार्‍या तुझया अन् कल्लोळ मागे थांबले कोण जाणील सांग गूढ गुपीते अपुली अंधारातही धरली होती माझ्यावर तु सावली व्यसन झाल्या सवयीचे हे खुंटत कुढणे काय? माणसांचा भवती पसारा मला ओळखील काय? आता धरतो उराशी सगळे कढ तुझे नी माझे शांत एकटाच आता म्हणतील मला हे मागे.
लेखनविषय:

वाचने 1207
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

--^--^--^--

कोण जाणील सांग गूढ गुपीते अपुली अंधारातही धरली होती माझ्यावर तु सावली
__/\__

भारी समर्थ साहेब, अप्रतिम एक हळवी कविता. निव्वळ लाजवाब कविता. कविता वाचावयाला सुरुवात केल्या केल्या मनाचा ठाव घेते. आणि मग कधि डोळे पाणवले ते कळलच नाही. मस्त मस्त मस्त..

भारी बुवा प्रेमात पाडूचा काय माका ? ( मालवणी शिकत आहे जपून वाचा ) तुम्ही लिहित रहा . लिहितच रहा . उगीच कौतिकाची थाप म्हणजे आपल्याशीच प्रतारणा उठसूट लिहित रहा असे म्हणावे का असावी अशी धारणा ? असे ज्याचे मत आहे तो म्हण्तो आहे लिहित रहा . यातच सारे आले.