✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दर्द - ऐ - दात

५ — ५० फक्त, Tue, 03/20/2012 - 22:12
मी आताशा ठरवुनच टाकलंय, पुढचं प्रेम या डॉक्टरवरच करायचं. सगळे दात काढले तिनं, तरी तिच्यावरच मरायचं. मी आताशा ठरवुनच टाकलंय... एक दिवस काय झालं, बासुंदी पिता पिता हाटेलात पुढचा एक दात कर्रकन हलला मला वाटलं त्याचा बेरिंगच निसटला घरी येता येता दवाखान्यांत गेलो तिथली रांग पाहुन मनोमन सुखावलो बाहेर एक बाउन्सर बहुधा कंपाउंडर असावा आत नाही जमलं की इथंच उपटत असावा. शेवटी माझा नंबर आला, हळुच आत गेलो बेसिनमधले गोरे हात पाहुनच गार झालो या हातानी एक काय चार दात काढा जमलं तर भरुन द्या मागच्या दोन दाढा 'येस,प्लिज, य, खुर्चीवर बसा,' आवाज बरा नव्हता, काळी तिन पांढरी दोनच्या मध्ये अडकला होता काय झालंय ते विचारलं, तेंव्हा बरं वाटलं खुप दिवसाचं दुख: एकदम घशात साठलं, भारावुन म्हणलं, सगळेच दात दुखतात तोच खर्रारा आवाज, 'इथंच सगळे चुकतात ' मी म्हणलं, चुकत असेल तर चुको लाख बापडं आवाज बरा नसला तरी छान असावं रुपडं मागुन येउन तिनं हनुवटी धरली दाढी न केल्याची मलाच लाज वाटली ग्लोव्हज मधुन देखील तिला टोचु नयेत केस परतफेड म्हणुन उद्या ड्ब्बल करेन फेस तो स्टिलचा आकडा, डोळ्यासमोर आला प्रेम बिम विसरा,मला माशाचा हुक वाटला मासा तर घाबरेलच असा हुक पाहुन मी मात्र सावरलो मागची बोटं पाहुन ' अरे अरे, फार त्रास असेल ना ?' जेवताना सारखं अवघड होत असेल ना ? सताड उघड्या तोंडातुन ग्वाँ ग्वाँ आवाज आला सवयीनं तिच्या मेंदुनं पटकन संदेश टिपला शेवटी तो हुक दुख-या दातावर विसावला त्याचा थंडपणा मला कण्यापर्यंत जाणवला ओरडता येत नसल्यानं मी तोंडच हलवलं तिथंच मला गो-या बोटातलं बळ जाणवलं दोन मिनिटं तिच्या बोटांचा खेळ चालु होता त्याचवेळी चुकार बटा खाली पडत होत्या त्या सगळ्याचा अंत खरंच सुखात होता आता एक खड्डा माझ्या मुखात होता रक्ताळलेल्या बोटानीच तिनं कापुस दिला 'पाच मिनिटं धरा ' पुन्हा खर्रारा आला मग थोडा सावरुन बसलो समोर येउन ती ही बसली खुर्चीत, मास्क काढला ठेवुन ती पाहताच बाला, जबडा उलुशिक हलला क्रुकेड दात तिचा,तिच्या ओठावर दिसला, नालायक तो दात तिला अस्सा टोचत असेल शाप दिला त्याला तुझ्यात कच्ची मटकी फसेल समोरच्या कागदावर फक्त तीन लाईनि दिसल्या आवाजात देव तर अक्षरात मास्तर फसला, 'ह्या सकाळी आणि ह्या रात्री दोन घ्या; आज आणि उद्या फक्त थंडच काही प्या' कागद हातात घेताना, थोडासाच झालेला स्पर्श घाण अडकलेल्या नखांना दुर्मिळ असा हर्ष ' माझा दात मिळेल का , शेवटचा पाहायला एवढी वर्षं घातलं होतं कोलगेटनं नाहायला पटकन उठली तशी, खुर्ची मागं करुन वळली गर्रकन तिथंच ओढणी वर ओढुन स्टिलच्या ट्रे मधुन एक दात उचलला कापसात ठेवुन हळुच माझ्या पुढे ठेवला मग तोच खर्रारा पुन्हा एकदा घुमला 'जपुन ठेवा तुमच्याकडं, व्यवस्थित चांगला, असा दात काढलेला जसा नागाच असतो प्रेमात आलं आड कुणी तर कचकन चावतो, असल्या भ्याड कल्पना कधी पटत नाहीत तेंव्हा मात्र दात ठेवला खिशात कापसासहित भिती आहे उद्या दुसराच कुणी येईल माझे सगळे दात एकदम सुधारुन देईल दुसरा एखादा दात दुखरा नाही याचं दुखः होतंय नेक्स्ट व्हिजिट परवाच आहे याचं बरं वाटतंय वाटलं इथंच विचारावं तोंड उघडुन एकदा, पण बिल पाहुन म्हणालो, च्यायला एका दाताला ५००/- बराय तुमचा धंदा.

प्रतिक्रिया द्या
12525 वाचन

💬 प्रतिसाद (67)

'देवा मला रोज एक अपघात कर,

सूड
Tue, 03/20/2012 - 22:19 नवीन
'देवा मला रोज एक अपघात कर, आणि तिच्या हातून जखमा या भर ' हे गाणं आठवलं.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा=))=))=))दातांच्या

यकु
Tue, 03/20/2012 - 22:28 नवीन
हाहाहाहा =))=))=)) दातांच्या डॉक्टरनी फारच प्रेमळ असतात ब्वॉ ;-) माझे तर या वयातच दोन दोन दात पडले आहेत * अधोरेखित शब्द काळजीपूर्वक वाचावा, पडले आहेत कुणीही पाडले नाहीत ;-)
  • Log in or register to post comments

तंबाखू फार खाता काय?

प्रचेतस
Tue, 03/20/2012 - 22:29 नवीन
तंबाखू फार खाता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

नाही, आपल्या परममित्रांएवढी

यकु
Tue, 03/20/2012 - 23:12 नवीन
नाही, आपल्या परममित्रांएवढी नाही ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ती पाहताच बाला...

किसन शिंदे
Tue, 03/20/2012 - 22:46 नवीन
=)) =)) =)) आम्हाला आमच्या एका मित्राची आठवण आली. बिचारा त्या डेंटिस्टकडून आल्यापासून गजला काय लिहतो, गाणी काय गातो. :)
  • Log in or register to post comments

जणू हे गीत त्याच मित्राला

प्रचेतस
Tue, 03/20/2012 - 22:53 नवीन
जणू हे गीत त्याच मित्राला डोळ्यांसमोर ठेवून लिहिलंय इतकं जिवंत झालंय. अर्थात तो गझला लिहितोय, गाणी गातोय पण एक हात कायम त्या दुखर्‍या बाजूच्या गालावर ठेवूनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हेच म्हणतो...

धन्या
Tue, 03/20/2012 - 23:01 नवीन
किंबहूना त्या मित्राला मराठी काव्यप्रकार हाताळता येत नसल्यामुळे त्याने आपली व्यथा मराठी कवितेतून लिहिण्याचे काम पन्नासरावांना आऊटसोर्स केले असावे असे वाटते. ;) पन्नासरावांनी काम अगदी चोख बजावले आहे. :)
मागुन येउन तिनं हनुवटी धरली दाढी न केल्याची मलाच लाज वाटली
त्या (हनुवटीखालील) बोकडछाप चुकार केसांना दाढी म्हणतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आवरा.

प्रचेतस
Tue, 03/20/2012 - 23:04 नवीन
Image removed.Image removed.Image removed. आवरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@त्या (हनुवटीखालील) बोकडछाप

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/20/2012 - 23:51 नवीन
@त्या (हनुवटीखालील) बोकडछाप Image removed. चुकार केसांना दाढी म्हणतात? >>> Image removed. मेलो मेलो... धनाजी... आय आय आय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

:-D

मोदक
Wed, 03/21/2012 - 01:00 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पुण्यात नाही का चहाला

सूड
Wed, 03/21/2012 - 08:35 नवीन
पुण्यात नाही का चहाला 'अमृततुल्य' म्हणतात तसंच ते. बरं असे लोक सारखं 'दाढी करायला हवी, वाढलीये' असं ऐकवून दाखवतात.ज्याला ऐकवतात तो मात्र मनात म्हणत असतो, 'माताय, या दाढीला हा वाढलेली दाढी म्हणतो ? मी शेव्ह केल्यानंतर माझी दाढी दोन दिवसात येवढी वाढते.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जळजळ पोहोचली...

मोदक
Wed, 03/21/2012 - 09:44 नवीन
जळजळ पोहोचली... कोणताही विषय ओढून ताणून आणि दुसर्‍याच्या खांद्यावर भार टाकून *पुण्यविषयावर शरसंधान करण्याच्या मनोवृत्तीवर काय बोलावे..? तुमच्या कंपनीने बदलापूरात शाखा का नाही काढली हो..? ;-) *पुण्यविषय हे पुण्यनगरीचे पेशवेकालीन / शिवकालीन नाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चूक

प्रचेतस
Wed, 03/21/2012 - 09:51 नवीन
*पुण्यविषय हे पुण्यनगरीचे पेशवेकालीन / शिवकालीन नाव आहे.
चूक. पुण्यविषय नव्हे, पुण्यकविषय. शिवाय हे नाव शिवकालीन अथवा पेशवेकालीन नव्हे. ते त्याहूनही प्राचीन. ९ व्या शतकात मिळालेल्या काही ताम्रपटांवर पुण्याचा 'पुण्यकविषय' असा उल्लेख आढळतो. नंतर यादवकाळात त्याचे पुनवडी असे अपभ्रष्ट रूप झाले व नंतर पेशवेकालात ते आजच्या पुणे ह्या नामाप्रत पोहोचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मोदक, गाव कुठलं रे

प्यारे१
Wed, 03/21/2012 - 09:56 नवीन
मोदक, गाव कुठलं रे तुझं???? पुण्याच्या चहाबद्दल पक्षी कुठल्याच गोष्टीबद्दल कुणी बोलूच नये का? पुण्याचं पुणेरीपण र्‍हायलंय का अशानं ते तरी बघा जरा. साला बुरख्याच्या आत मिनी स्कर्ट अशी अवस्था आहे पुण्याची. संस्कृती (म्हणजे काय कुणास ठाऊक) सोडवत नाही आणि उधार कॉस्मोपॉलिटनपणाची बक्कळ आवड. हे म्हणजे आपलं ते हे झालं की.... एकाच्या हातात हात नी डोळा घालणार तिसर्‍यालाच. पुण्यात कुणी बोलावलेलं का असा अपेक्षित प्रश्न विचारणारांना फाट्यावर सुद्धा मारले जाणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

कंपू.. कंपू..

मोदक
Wed, 03/21/2012 - 17:19 नवीन
कंपू.. कंपू.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>तुमच्या कंपनीने बदलापूरात

सूड
Wed, 03/21/2012 - 13:36 नवीन
>>तुमच्या कंपनीने बदलापूरात शाखा का नाही काढली हो..? शाखा काढायला हरकत नाही हो, पण 'पुण्यकविषया"वर बोललं की तिथले लोक त्यांच्याच विषयी सगळं चाललं आहे असं समजून जसं तरातरा धावत येतात तसे बदलापूरातले येत नाहीत. ते बरेच वास्तवात वावरतात. कानाची भोकं राहून तिथले काप गेलेत हे त्या लोकांना मान्य असतं. 'पुण्यकविषया'तले लोकच निराळे, मिशीला कोकम लावून तूप सांगत हिंडण्यात स्वारस्य असतं त्यांना. त्यामुळे बदलापूरात शाखा काढून काहीही उपयोग नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बदलापूरात शाखा काढून काहीही उपयोग नाही..

मोदक
Wed, 03/21/2012 - 17:23 नवीन
>>>बदलापूरात शाखा काढून काहीही उपयोग नाही.. पुण्यात शाखा काढली आहे म्हणजे इकडे उपयोग होतो आहे म्हणायचा... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वाहव्वा... वाहव्वा...

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/20/2012 - 22:48 नवीन
वाहव्वा... वाहव्वा... पन्नसराव... काय बेक्कार दात काढायची संधी दिलित हो... Image removed. लै मज्जा येणार आता.... Image removed. आनंदी आनंद गडे, येतात का पाहू ते इकडे Image removed. @दोन मिनिटं तिच्या बोटांचा खेळ चालु होता त्याचवेळी चुकार बटा खाली पडत होत्या>>> Image removed. त्या सगळ्याचा अंत खरंच सुखात होता आता एक खड्डा माझ्या मुखात होता >>> Image removed. कळ्ळे हो आम्हास कळ्ळे.. ;-) अता बघु येतात का इकडे..?
  • Log in or register to post comments

बुवा.. ए चॉलबे ना...

मोदक
Wed, 03/21/2012 - 01:07 नवीन
बुवा.. ए चॉलबे ना... सुपारी घेतली एकाने.. काम पूर्ण केले दुसर्‍याने.. (आणि आता श्रेय घेतोय तीसरा ;-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सांभाळून बरं

पैसा
Tue, 03/20/2012 - 23:06 नवीन
माझ्या एका दाताला पुरुष दंतवैद्याने कालव्यासाठी खड्डा केला होता त्याने हळूवार हाताने आपलं काम केलं. काही त्रास नंतर झाला नाही. पण पुढच्या वेळेला तो गावाला गेल्यामुळे एका दंतवैदिणीकडे जायचा प्रसंग आला. तिने आईच काय आज्जीची आठवण करून दिली. पुढचे ४ दिवस गालावर हात धरून बसून रहावं लागलं. तात्पर्यः दंतवैद्य वैदिणींपेक्षा हळूवार हाताने काम करतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. साक्षात दंतवैदिणीचाच दात वाकडा का बरं?
  • Log in or register to post comments

हरकत नोंदवतो.. (ऑब्जेक्षन... च्या चालीत वाचावे..)

मोदक
Wed, 03/21/2012 - 00:44 नवीन
>>>दंतवैद्य वैदिणींपेक्षा हळूवार हाताने काम करतात. हरकत नोंदवतो.. (ऑब्जेक्षन... च्या चालीत वाचावे..) ;-) आमच्या परममित्राचा अनुभव तुमच्या अनुभवाच्या एकदम विरूध्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एव्हढ कळत नाही होय?

स्पंदना
Wed, 03/21/2012 - 06:25 नवीन
अहो परम मित्राचा अनुभव, अन परम मैत्रीणीचा अनुभव एकच आहे, पण ते दोघे विरुध्द लिंगी असल्याने तो तुम्हाला विरुद्ध वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हित लिंगवाद ?

चौकटराजा
Wed, 03/21/2012 - 09:15 नवीन
हितं लिंगवाद कयापायी आन्ता वो ? हे दात काड्न्याच येक धंदा हाय ! तिनी बक्क्ळ पाचशाचं ब्यील लावल का नाय ? आसा ईषय परात काल्डाना ना मंग आमची प्वारं आनतो काचा फोडाया !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

च्च च्च च!

स्पंदना
Wed, 03/21/2012 - 16:32 नवीन
चौकट राजाजी जरा चौकटीतुन बाहेर या ना हो? का इतके गरम होताय? आता स्पष्टीकरण, त्याच अस आहे, की वैद्यीन बाईंच्या हाताने परम्मित्राला कस गार वाटल, पण त्याच परिस्थितीत, परम मैत्रीणीला दोन दिवस वेदना झाल्या? का? कारण गरिब बिचारा ग, अस कळवळुन वद्यीन बाईंनी जरा हल्क्या हातान परम मित्राला ट्रीट केल असाव , पण हीच नाक माझ्या पेक्षा चांगल कस , वा अश्याच तस्तम विचारान परम मैत्रीणीच्या ट्रीटमेंट मध्ये जरा हात जड झाला असावा. अन हाच फरक जेंव्हा मैत्रीण बाई वैद्यबुवांकडे गेल्या तेंव्हा पडला असावा...मी काय लिहिते आहे? ओ माय गॉड, लिव्ह इट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

...मी काय लिहिते आहे? ओ माय

धन्या
Wed, 03/21/2012 - 19:11 नवीन
...मी काय लिहिते आहे? ओ माय गॉड, लिव्ह इट.
माया साराभाई काकूंची आठवण करुन दिलीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आवं , ह्ये गराम व्हनं

चौकटराजा
गुरुवार, 03/22/2012 - 09:18 नवीन
आवं, ह्ये गराम व्हनं आमचं न्हाई . येक फोन आला सोंस्क्रुति राखनार्‍या कून . म्नन्ला आमी सदश्य न्हाई .तवा तुमच्या बुरूजावनं आमच्ची तोप डागा. न्हाईतर तुमचीच चौकट उखडून पाडू. मंग आमी घाबारलो आन...................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

छान

JAGOMOHANPYARE
Wed, 03/21/2012 - 01:16 नवीन
छान
  • Log in or register to post comments

हा हा हा हा हा लई भारी

सुहास..
Wed, 03/21/2012 - 01:25 नवीन
हा हा हा हा हा लई भारी !! आले लगेच वाचायाला की काय लिहीलय डाक्टरीण विषयी ;)
  • Log in or register to post comments

पयल्या कडव्यातच गारद! हसुन

स्पंदना
Wed, 03/21/2012 - 06:30 नवीन
पयल्या कडव्यातच गारद! हसुन हसुन पुरेवाट! मी परवा एका हँडसम दंतवैद्याकड गेले होते. आपुन एकदम सरळ बोलेला, इतना हँडसम मानुस, इधर काय कु मिलनेका? डॉक्तर बोला, नेक्स्ट जनम मे फिट करते है, ये टाइम दात पे काम चलाते है। सच्ची! चाहे तो अक्षय को पुछो। हस हस के वो गोलपोल हुआ था!
  • Log in or register to post comments

५० तुमच्यावर मी आता दात धरणार

चौकटराजा
Wed, 03/21/2012 - 09:08 नवीन
तुमच्या सारखाच अनुभव मला आला होता. जरासाच वेगळा. शरीर शास्त्र विषयक प्रदर्शन होते. ती बी जे ला असावी. फार फार म्हंजे फारच सुंदर. तिच्या समोर फॉरमॅलिन चोपडलेले काही अवयव पडले होते. पटकन तिने जठर उचलले. " हे स्टमक. ही एच सी एल सिक्रेट करणारी आउटलेटस " तिचे चालू होते. मी ते स्टमक धरलेल्या गोर्‍यापान हाताकडे पहात होतो. फॉरमॅलिन चा वास शरीराला दोन दिवस टिकला पण त्या रूपाचा दरवळ अजून काही जात नाही. पुण्यातच प्रॅक्टीस करीत असेल काय हो ? की बोस्टनला ? आपली कविता मस्त आहे .थोडी लांबलेली वाटते. पण कोणत्याही विषयाचे बंधन काव्याला नसते याचे हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही मला जाताना का घेउन गेला नाही . मी आता कायम तुमच्यावर दात धरणार . चौ रा. ता. क.- आर तिज्यायला ती पण आता साठीला आली असेल नाही. तिचेही एक दोन दात काढले असतील का ?
  • Log in or register to post comments

ठ्ठो !!!!!

स्पा
Wed, 03/21/2012 - 08:32 नवीन
बाब्बो,,,,,, ठ्ठो !!!!! __/\__ क लिवलंय क लिवलंय ती पाहताच बाला, जबडा उलुशिक हलला क्रुकेड दात तिचा,तिच्या ओठावर दिसला, नालायक तो दात तिला अस्सा टोचत असेल शाप दिला त्याला तुझ्यात कच्ची मटकी फसेल खॅ खॅ खॅ =)) =)) =))
  • Log in or register to post comments

५० फक्त मस्त मस्त....!याला

प्यारे१
Wed, 03/21/2012 - 09:22 नवीन
५० फक्त मस्त मस्त....! याला 'वयात येणं' म्हणायचं का???? ;)
  • Log in or register to post comments

हर्षद एक्दम भन्नाट ..खूप खूप

जेनी...
Wed, 03/21/2012 - 09:28 नवीन
हर्षद एक्दम भन्नाट ..खूप खूप आवडलं.:D सगळ्या ओळि मिश्किल पणान तुडुंब भरलेल्या , त्यात फक्त ह्या खालच्या ओळि जरा अनुरुप वाटल्या .:( मग तोच खर्रारा पुन्हा एकदा घुमला 'जपुन ठेवा तुमच्याकडं, व्यवस्थित चांगला, असा दात काढलेला जसा नागाच असतो प्रेमात आलं आड कुणी तर कचकन चावतो, बाकि एकदम खल्लास .......:P
  • Log in or register to post comments

म्हणजे काय?

धन्या
Wed, 03/21/2012 - 09:36 नवीन
सगळ्या ओळि मिश्किल पणान तुडुंब भरलेल्या , त्यात फक्त ह्या खालच्या ओळि जरा अनुरुप वाटल्या .Sad मग तोच खर्रारा पुन्हा एकदा घुमला 'जपुन ठेवा तुमच्याकडं, व्यवस्थित चांगला, असा दात काढलेला जसा नागाच असतो प्रेमात आलं आड कुणी तर कचकन चावतो,
हे जरा समजावून सांगा ना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नक्तंदिनानि मे यान्ति

जेनी...
Wed, 03/21/2012 - 09:53 नवीन
नक्तंदिनानि मे यान्ति कथंभूतस्य संप्रति। दु:खभाङ् न भवेत्येवं नित्यं सन्निहितस्मृति:॥ हे आधी समजावुन सांगा मग सांगते :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नक्तंदिनानि मे यान्ति

जेनी...
Wed, 03/21/2012 - 09:53 नवीन
नक्तंदिनानि मे यान्ति कथंभूतस्य संप्रति। दु:खभाङ् न भवेत्येवं नित्यं सन्निहितस्मृति:॥ हे आधी समजावुन सांगा मग सांगते :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

एकदा विचारलं असतं तरी सांगितलं असतं...

धन्या
Wed, 03/21/2012 - 10:32 नवीन
नक्तंदिनानि मे यान्ति कथंभूतस्य संप्रति। दु:खभाङ् न भवेत्येवं नित्यं सन्निहितस्मृति:॥
अष्टांग हृदयम्, सुत्र २, श्लोक क्र. ४६,४७ श्लोकाचा मतितार्थ असा आहे की देश, काल आणि परिस्थितीनुसार आपलं वर्तन ठेवलं तर त्रास होत नाही. अधिक माहिती हवी असल्यास जालावर शोधावे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

देश, काल आणि परिस्थितीनुसार

सुहास..
Wed, 03/21/2012 - 13:20 नवीन
देश, काल आणि परिस्थितीनुसार आपलं वर्तन ठेवलं तर त्रास होत नाही >>> ही ओळ काव्य कर्त्या साठी आहे का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ही ओळ काव्य कर्त्या साठी आहे

धन्या
Wed, 03/21/2012 - 15:35 नवीन
ही ओळ काव्य कर्त्या साठी आहे का
नाही. मात्र ज्यांना नजरेसमोर ठेऊन हे काव्य जन्माला घातलं आहे त्यांना हा उपदेश नक्की उपयोगी पडेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

एक दात काढायचे ५०० रु आणि

मालोजीराव
Wed, 03/21/2012 - 11:38 नवीन
एक दात काढायचे ५०० रु आणि त्या मानाने प्रगती खूपच स्लो होती...फक्त हस्तस्पर्श जाहला ;) ओ पन्नासराव पुढच्या वेळी भारती विद्यापीठला या आमच्या इथे डेंटल ला...५०-१०० रु मध्ये काम होईल...आणि आपली 'सेटिंग' पण आहे ! - मालोजी
  • Log in or register to post comments

भारी झालीये कविता.बिचार्‍या

गणेशा
Wed, 03/21/2012 - 16:26 नवीन
भारी झालीये कविता. बिचार्‍या परम मित्राचे सगळे दात तिने काढले तर मग बोळक्याच्या प्रेमात ती पडेल का ?
दोन मिनिटं तिच्या बोटांचा खेळ चालु होता त्याचवेळी चुकार बटा खाली पडत होत्या त्या सगळ्याचा अंत खरंच सुखात होता आता एक खड्डा माझ्या मुखात होता
मस्त
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Wed, 03/21/2012 - 18:47 नवीन
मस्तच :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

छान. वाचून गंमत वाटली.

रेवती
Wed, 03/21/2012 - 20:47 नवीन
छान. वाचून गंमत वाटली.
  • Log in or register to post comments

बापरे...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 03/22/2012 - 02:10 नवीन
बापरे! बधीर न करताच दात काढला? की डॉक्टरणीला पाहूनच तुम्ही 'बधीर' झाला होतात? एकदा एका (पुरूष) दंतवैद्याने माझ्या दुखर्‍या दाताला काढण्यासाठी बधीरतेचे इंजेक्शन दिले. पण बहुदा चुकीच्या दातांखाली दिले. थोड्या वेळाने मला जाणवले दुखरा दात (आता कमी पण..) अजून दुखतोच आहे आणि शेजारचा दात बधीर झाला आहे. मी दंतवैद्याला तसे सांगितले तर त्याने अजून १० मिनिटे मला वाट पाहायला सांगितली. तेवढ्या वेळात बधीरतेचे औषध ओसरु लागले आणि दुखरा दात जास्त दुखु लागला. शेवटी माझा नंबर आला तेंव्हा मी दंतवैद्यास तसे सांगितलेही पण त्याने, ' पाहू जरा' करून माझ्या जबड्यात पकड घातली तो दात धरला आणि तो उपटायला लागला. माझ्या मस्तकी कळ गेली. मी 'उंहू' 'उंहू' करीत प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण 'अहो, थांबा, ओरडता काय' असे म्हणत शहाण्याने तो दात, बधीरता उतरल्या अवस्थेत, उपटून काढला. 'हा बघा...' दंतवैद्य मला दात दाखवत होता मी डोळे गच्च्च्च्च्च्च मिटले होते. मरणप्राय वेदना शमण्याची वाट पाहात होतो. मिनिटभराने जरा सावरलो. ह्या अनुभवानंतर दंतवैद्य म्हंटल्यावर (वैद्य असो अथवा वैद्यीण) मी चार हात दूर राहणेच पसंद करीत आलो आहे.
  • Log in or register to post comments

पुढे असे झाले

चौकटराजा
गुरुवार, 03/22/2012 - 09:27 नवीन
पेठकर काकांची दंतवैद्याशी उलीशिक लढाई झाली व गडबडीत त्याने काकांचा नीट असलेलाच दात काढला व परत ५०फक्त सारखे ५०० रूपये काकांवर ठोकले.
  • Log in or register to post comments

एकदम मस्त..

चिगो
गुरुवार, 03/22/2012 - 15:34 नवीन
कविता झक्कास, पन्नासराव.. सुंदर दंतवैद्यिणी लै महागात कापतात, हे मात्र खरं..
  • Log in or register to post comments

कारन

चौकटराजा
Fri, 03/23/2012 - 15:40 नवीन
कारन की त्या दाकतरनी " चिगो बुटी पारलर" मदी जात्यात . ( चिगो यानेकी चिकनी गोरी .असा आर्त येक सामजिक कार्यकर्ता याने सांगित्ला )) त्यो सम्दा खर्च कुनाकडून वसूल करनार ? म्हंजी भारी यारडले चा सूगंधी माल त्येनी वापरायचा. आनि वास फुकाट प्येशंटनी घ्यायचा . नाय ये बराबर नाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

पन्नासराव, मस्त कविता

प्रास
Fri, 03/23/2012 - 12:09 नवीन
पन्नासराव, मस्त कविता लिहिलीयेत बरंका.....! आवडली. एक प्रश्न - तो मेला दात 'बासुंदी' पिता पिता कसा काय कर्रकला?
  • Log in or register to post comments

प्रासबुवा, बासुंदी भलतीच कडक

पिंगू
Sat, 03/24/2012 - 11:50 नवीन
प्रासबुवा, बासुंदी भलतीच कडक होती... ;) - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

मी पुन्हा दर्द-ए-दातांचा इलाज

पिंगू
Sat, 03/24/2012 - 11:53 नवीन
मी पुन्हा दर्द-ए-दातांचा इलाज करायला कोणा दंतवैद्याकडे आणीबाणीची अवस्था आली तरच जाईन. कारण दंत वैद्य/वैद्यीण दोघांनी माझे दात कोरून काढले आणि वरुन भक्कम बिले लावली.. आय हेट दंतोबा.. - पिंगू
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा