Skip to main content

असाध्य स्वार्थ...!

लेखक वेणू यांनी मंगळवार, 20/03/2012 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
वेदनांचे सण साजरे करण्याची ना हिम्मत होती, ना ऐपत..! त्यांना पापण्यांमागे साठवून अश्रु गाळण्याइतकी, श्रीमंती कधी नव्हतीच! उलट त्यांची धार बोथट करण्यासाठी प्रसंगी काळाशीही निग्रही स्पर्धा....! सुखाशी जितकी सलगी, तितकीच वेदनांशी फारकत! तसं नुकसान फारंसं नाही मात्र, 'वेदनेतले कंगोरे आज जपले, तर उद्या काव्यही बहरेल' हा स्वार्थ साधायचा राहूनच गेला! -बागेश्री
लेखनविषय:

वाचने 1180
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मात्र, 'वेदनेतले कंगोरे आज जपले, तर उद्या काव्यही बहरेल' हा स्वार्थ साधायचा राहूनच गेला!... ---^---^---^---

वेदनांचे सण साजरे करण्याची ना हिम्मत होती, ना ऐपत..! त्यांना पापण्यांमागे साठवून अश्रु गाळण्याइतकी, श्रीमंती कधी नव्हतीच!
छान सांगितले आहे.. साधे सरळ आणि तितकेच खरे वाटणारे.

कविता आवडली.