✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सच्याचे शंभर.........

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Fri, 03/16/2012 - 16:27  ·  लेख
लेख
आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर... सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्‍यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली. सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन. :) सच्याच्या महाशतकाची यादी [दुवा म.टा] आणि सच्याची क्रिकेट कारकिर्द [दुवा क्रि. इन्फो]
Sachin-Tendulkar
[छा. जालावरुन साभार]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27055 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

सच्चु.......अभिनंदन !!

जयवी
Fri, 03/16/2012 - 18:09 नवीन
शेवटी हा सन्मान सचिनने बांग्लादेश ला दिला :) तुस्सी ग्रेट सचिन :)
  • Log in or register to post comments

खुपच बोलकि प्रतिक्रिया सचिनची

गणेशा
Fri, 03/16/2012 - 18:24 नवीन
Tendulkar speaks: "It's been a tough phase for me. I started off the season batting reasonably well, i was luckless. I was not thinking about the milestone, the media started all this, where ever I went, the restaurant, room service, everyone was talking about the 100th hundred. Nobody talked about my 99 hundreds. It was slightly different, the ball was not coming onto the bat. It hasn't sunk in but I've definitely lost about 50 kilos. Doesn't matter how many hundreds you've scored, you still have to put your head down and score for the team. Dreams do come true. I had to wait for one for 22 years (the World Cup)."
  • Log in or register to post comments

कट आणि पेस्ट

चौकटराजा
Fri, 03/16/2012 - 18:34 नवीन
मी दोन आठ्वड्यापूर्वी काय म्हणालो होतो ते पेस्ट करीत आहे. आता तरी चौकटराजा वाया गेला असे म्हणू नका लेको. तो वात्रट आहे हे प्रोफाईल मधे आलेच आहे राव ! आता कट पेस्ट सचिन काही नको रिटायर होउ ! प्रेषक चौकटराजा Sat, 25/02/2012 - 20:25. सचिन तेडूलकर हा सर्वकालीन महाफलंदाज आहे .त्याने अनेक विक्रम केले आहेत पण तो सर्वोत्तम फलंदाज नाही. माझ्या आठवणी प्रमाणे त्याचा व ग्लेन मॅक्ग्रा चा खरा फारसा सामना झालेलाच नाही. त्याने अपयश पाहिले आहे व यश पुन्हा मिळू शकते हे ही पाहिले आहे. चाळीशी ला आल्याने त्याचे रिफलेक्स कमी होऊन तो बाद होत असावा. आपल्या निवृतीचे कारण गावसकरानी हेच दिले होते. पण सचिनने आणखी एखाद्या सिरीजचा चान्स घ्यावा. त्याला १०० व्या महा शतकाचे आकर्षण असेल असे वाटत नाही. पण अजूनही तो विझलेला आहे असे मला तरी वाटत नाही. त्याच्या पेक्षा चांगला गेल्या चार वर्षात कोण भारतीय खेळला आहे ? ------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------ असेल जर देव, सापडणार नाही कधी, कधी आकाशाहून मोठा तर सुक्ष्म अणूहूनही कधी माणसाची झेप आकाशाइतकी नाही मोठी , मग भक्तीने तो बधेल ही आशा धरावी का खोटी ? .......
  • Log in or register to post comments

माझा चेपु स्टेटस

कपिलमुनी
Fri, 03/16/2012 - 18:35 नवीन
THIS CENTURY IS FIXED TO DEVIATE PEOPLE FROM BUDGET, INCREASED TAXES ... NOW EVERYONE FORGET BUDGET AND TALK ABOUT CENTURY !! ;)
  • Log in or register to post comments

THIS IS WHAT !

चौकटराजा
Fri, 03/16/2012 - 19:24 नवीन
THIS IS WHAT THINKIING " OUT OF BOX " IS ALL ABOUT ! मुनीराज धन्य आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जियो !!

इष्टुर फाकडा
Fri, 03/16/2012 - 18:38 नवीन
सचिन आता क्रिकेट चा रजनीकांत झाला. जिवंत दंतकथा !
  • Log in or register to post comments

सचिन ला मानाचा मुजरा

निश
Fri, 03/16/2012 - 18:38 नवीन
सचिन ला मानाचा मुजरा. खर तर सचिन सारखे लोक हि समाजाला मिळालेले अमुल्य वर आहेत. खरा क्रिकेट चा सम्राट सचिन.
  • Log in or register to post comments

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/16/2012 - 21:21 नवीन
हरलो म्याच. :( च्यायला, सच्याचं महाशतक होऊनही आपण हरलो. आपल्यकडे चव ना धवाचे बॉलर होते आज. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म

मी-सौरभ
Fri, 03/16/2012 - 23:47 नवीन
आजच ते गोलंदाज बिना चवी ढवीचे बरे झाले??? तुमचा तो सचिन काय दिव्य खेळला ते बघितलच... रच्याकने: रविवारच्या युद्धाचा टीआरपी वाढावा म्हण्णूनच आज हरलो आपण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे अस कोणी बोलू नका रे...

स्पा
Sat, 03/17/2012 - 08:58 नवीन
अरे अस कोणी बोलू नका रे... इनो घ्यायला पण हल्ली लायकी लागते म्हणे - डोक्यातहाणीन धोंड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

सचिन देवाय नम:

गोंधळी
Fri, 03/16/2012 - 21:54 नवीन
सचिन देवाय नम:
  • Log in or register to post comments

हुश्श....

नावातकायआहे
Fri, 03/16/2012 - 22:15 नवीन
झाल एक्दाच...
  • Log in or register to post comments

सचिनचे मनापासून अभिनंदन

जाई.
Fri, 03/16/2012 - 22:19 नवीन
सचिनचे मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments

लै भारी

रमताराम
Fri, 03/16/2012 - 22:50 नवीन
सचिन, सचिनप्रेमी यांचे हार्दिक अभिनंदन. याशिवाय "पुढून तुतारी मागून पिपाणी वाजवणार्‍यांचे"ही आभार. त्यांचे अभिनंदन कण्हत कुंथत आले असले तरी आमचे आभार 'तहे दिलसे' आहेत बरं का.
  • Log in or register to post comments

आपल्या तुतार्‍या वाजून झाल्या की.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/17/2012 - 20:04 नवीन
आम्ही पिपाण्या फुंकुच. सच्याच्या महाशतकानं वर्षभरातला खालावलेला परफॉर्मन्सचा बॅकलॉग भरुन काढला आहे इतकेच या निमित्तानं म्हणावसं वाटतं. बाकी, आपलं चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मुकेश अंबानी ह्यांना हे वर्षे

निनाद मुक्काम …
Fri, 03/16/2012 - 23:58 नवीन
मुकेश अंबानी ह्यांना हे वर्षे काही बरे गेले नाही. बिचारे वास्तुदोष म्हणून जगातील सर्वात श्रीमंत घरात राह्यला जाऊ शकत नाही. सध्या फोर्ब ने प्रसिध्द केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे स्थानात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमालीची घसरण झाली आहे. आता सचिनचे महाशतक झाले. म्हणजे मुंबई इंडियन ची ब्रांड वेल्यू जबरदस्त वाढणार. सचिन चा मात्र ह्या आय पी ल मध्ये घामटा निघणार. तेथे पाटा खेळपट्टीवर अनेक सुमार गंधर्व सुद्धा कुमार गंधर्वांच्या लयीत फटकेबाजी करतात. तेथे सचिन ला ह्या डब्लू डब्लू एफ च्या क्रिकेटच्या फडात पहावत नाही.
  • Log in or register to post comments

मागचे दोन आयपीएल

फारएन्ड
Sat, 03/17/2012 - 09:50 नवीन
अरे तू मागच्या दोन आयपीएल स्पर्धा पाहिल्यास का? सचिनची बॅटिंग तेथेही बघायला सर्वात चांगली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

प्रा डॉ....................

इरसाल
Sat, 03/17/2012 - 07:29 नवीन
काल बाकीचे (बांगलादेश ब्याटिंगच्या वेळी) हरावेच असे खेळत होते. सालं...झाले ना ह्याचे शंभर मग हारूचया ही म्याच.
  • Log in or register to post comments

+१००

किसन शिंदे
Sat, 03/17/2012 - 09:04 नवीन
सहमत. काय तो इरफान, लेकाचा फुलटाॅस चेंडू टाकत होता सिक्सर हाणण्यासाठी.. धोणीच्याही पोटात खुप दुखत असावं कदाचित, कारण एवढी घाणेरडी कॅप्टन्सी आधी कधीच पाहीली नव्हती. बिचारा सचिन! :( शतकानंतर मॅच हारलो म्हणून हे सचिनद्वेष्ट्ये त्याच्या नावाने शंख करायला मोकाट सुटतील आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

संघहितापेक्षा वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य!!!

श्रीरंग
Sat, 03/17/2012 - 11:45 नवीन
बांगलादेश सारख्या संघाविरुध्द विकेट्स हातात असूनदेखील चाळिसाव्या षटकापर्यंत केलेली संथ फलंदाजी हे पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक होतं यात शंकाच नाही. ज्या खेळपट्टीवर इतर सर्व फलंदाजांनी फटकेबाजी केली, तिथेच फक्त शतक पूर्ण करण्याच्या उद्देशाने अती सावध व संथ खेळणार्या सचिनला पाहून वाईट वाटलं. संघहितापेक्षा वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य देण्याची वेळ या महान खेळाडूवर यावी याहून वाईट दुर्दैव ते काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

-१

अन्या दातार
Sat, 03/17/2012 - 13:19 नवीन
२८९ ही त्या मानाने चांगली धावसंख्या असूनही तुम्ही असं म्हणताय?
ज्या खेळपट्टीवर इतर सर्व फलंदाजांनी फटकेबाजी केली, तिथेच फक्त शतक पूर्ण करण्याच्या उद्देशाने अती सावध व संथ खेळणार्या सचिनला पाहून वाईट वाटलं.
सेहवागसारखे वाट्टेल तशी बॅट फिरवून ४० पर्यंत धावा काढून बाद झाला असता तर "हॅ, यंदाही हुकलंच शतक. रिटायर हो म्हणाव" अश्या कॉमेंट्स लोकांनी केल्याच असत्या. नर्व्हस नायन्टीजचे प्रेशर आधीच अनुभवले असल्याने त्या धावपट्ट्यात संथ खेळला तर तुम्ही म्हणणार की वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य दिले. मग नक्की सचिनने काय करायला हवे होते? जरा सांगता काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

+++++++++११११११११११११११११११११

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/17/2012 - 14:50 नवीन
+++++++++११११११११११११११११११११ टू अन्या... हेच म्हणणार होतो... कालच त्याची आयबिएन..लोकमत वर दाखवलेली मुलाखत या सर्व टिकाकारांना चोख उत्तर देणारी आहे... तेंडल्याची काही हृदयस्पर्शी वाक्य>>>>> @खुप लोकांना या गेमबद्दलचे काहि कळत नसताना,बोललेली मत पाहुन वाइट वाटतं... @माझं नव्व्याण्णवावं शतक होइपर्यंत शंभराव्याची चिंता कुणालाच नव्हती...पण ९९वं झाल्यावर जो तो...जिथे तिथे १०० कधी होणार अशी विचारणा करु लागला,ज्याचं माझ्यावर एक प्रकारचं नाहक प्रेशर आलं... मी फक्त भारतासाठीच खेळतो..(रेकॉर्ड्स होत जाणं..हा अनुषंगिक परिणाम..!) @(लोक काहिही म्हणोत)...मी देव नाही...मी सचिन तेंडुलकर आहे... कथित जिज्ञासुंनी अख्खी मुलाखत पहावी..अजुन २/३वेळातरी पुनःप्रक्षेपित होइल.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हे झालं सच्याचं मत.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/18/2012 - 09:05 नवीन
आपलं काय मत आहे ते सांगा की, उगाच सच्या यवं बोलला आणि त्यवं बोलला. क्रिकेट न कळणार्‍यांचे मथळ्यांचे मथळे वाचतोय (आदरणीय श्री अण्णा हजारेंच्या मताबद्दल बोलायचं आहे. पण आत्ता नाही. ) सच्याची फलंदाजी कशी आहे. सगळेच सच्या माझा जवळचा कसा आहे, सच्या एक शेजारी म्हणून कसा आहे, सच्या आमचा गल्लीतला म्हणून कसा आहे, सच्या कसा साधा आहे. च्यायला, नुसती गर्दी झाली प्रतिक्रियांची. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

>>मी फक्त भारतासाठीच

श्रीरंग
Tue, 03/20/2012 - 20:36 नवीन
>>मी फक्त भारतासाठीच खेळतो..(रेकॉर्ड्स होत जाणं..हा अनुषंगिक परिणाम..!)<<< मग मोजकीच षटकं आणी खूप विकेट्स बाकी असताना पॉवरप्ले मधे अत्यंत सावध खेळून अनेक चेंडू निर्धाव का बरं घालवले असावेत त्याने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मी चाळिशीत फटकेबाजीचे प्रयत्न

श्रीरंग
Tue, 03/20/2012 - 20:47 नवीन
मी चाळिशीत फटकेबाजीचे प्रयत्न करून विकेट फेकण्याबद्दल म्हणत नाहिये. पण ८५ नंतर त्यानी जो रटाळपणा केला, त्याचा विपरीत परिणाम झालाच. गोलंदाजांनी पण माती खाल्ली हे कबूल आहेच. पण सचिनचा संथ खेळ पण पराभवास कारणीभूत ठरला. वनडे खेळणे स्वेच्छेनी थांबवले असूनही कसोटीत धावा होत नाहियेत म्हटल्यावर वनडे मधे प्रवेश करणे, त्यातही न जमल्यामुळे बांगलादेशविरुद्ध अतीसावध खेळणे, हे सर्व सचिनने शतकाच्या घेतलेल्या दडपणाचे द्योतक आहे. असो. शेवटी तोही "माणूस"च. त्यालाही "मोह" व्हायचाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/17/2012 - 16:01 नवीन
कालचा सामन्यात भारतीय संघाला धावसंखेचा डोंगर रचता आला नाही, त्याला संथ भारतीय फलंदाजी जवाबदार आहेच. बाकी, विक्रमादित्याची फलंदाजी लौकिकाला साजेशी नव्हती यात काही वाद नाही. काल ज्यांनी ज्यांनी सच्याची ब्याटींग पाहिली असेल त्यांनी जर काळजीपूर्वक धांवांचा रनरेट पाहिला तर शतकाच्या जवळ जाणा-या शेवटच्या पंचवीस धावांना लागणारा वेळ पाहिला तर सच्यालाही आता विश्वविक्रमासाठी लागणा-या शंभर धावा झाल्याच पाहिजे असे कालच्या खेळीवरुन तरी वाटत होते. खेळपट्टीवर चेंडु थांबून येत होता असे म्हटल्यामुळे १४७ चेंडुत झालेल्या ११४ धावांचं मोलही खूपच आहे, असे, नाविलाजाने म्हणावे लागते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

जर शतक झाल नसत तर "बांगलादेशा

गणपा
Sat, 03/17/2012 - 16:11 नवीन
जर शतक झाल नसत तर "बांगलादेशा विरुद्दही आता शतक काढता येत नाही होय, आता केनियाला बोलवा" अस म्हणायला सोकॉल्ड स्वघोशीत क्रिकेट जाणकार मागे हटके नसते. म्हणुन कदाचित त्यांच्या भल्यासाठीच तो हळु खेळला असणार यात तिळमात्र शंका नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही तर असेच बोल्लो असतो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/17/2012 - 16:29 नवीन
बांगलादेशा विरुद्दही आता शतक काढता येत नाही होय, आता केनियाला बोलवा" अस म्हणायला सोकॉल्ड स्वघोशीत क्रिकेट जाणकार मागे हटके नसते. स्वघोषित क्रिकेट जाणकार तर नक्कीच असे म्हणाले असते, यात काही वाद नाही. कशाला ताकाला जाऊन भांडं लपवायचं. :) कालची विक्रमादित्याची फलंदाजी संघासाठीच होती असे ठासून सांगणा-यांची संख्या प्रचंड आहे. पण, कालची संथ फलंदाजी विक्रमासाठीच होती असेही काही म्हणणारे आहेतच. मतमतांतरे असणारच. व्हिवियन रिचर्डचे मत सचिनला खूप पटलंय. 'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू द्या' अनेक भावनाकुळ क्रिकेटप्रेमींचाही कंठ अशा उद्गारांनी तर खूपच दाटून येत असेल. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू

गणपा
Sat, 03/17/2012 - 16:41 नवीन
'सचिनला वाटतंय तो पर्यंत खेळू द्या'
अलबत.. तुम्हा-माझ्यासारख्या सामान्य लोकांपेक्षा, त्याच या खेळातल ज्ञान निश्चितच जास्त आहे. मग त्याने कुठे थांबाव आणि कुठे नाही ते आपल्या वा त्या सोकॉलड क्रिकेट जाणकारांपेक्षा (कांबळी, साबा करीम, अंकोला ) त्याला जास्त चांगल कळत असेल नाही का? मला तर कधी कधी कपील आणि सौरवच ही नवल वाटत. स्वतःची इतक चांगली उदाहरणं समोर असताना फुकाचे वकिली सल्ले देत असतात. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अफकोर्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/17/2012 - 16:59 नवीन
क्रिकेट जगणारे आणि क्रिकेट तज्ञांच्या मताला तुमच्या आमच्या सारख्यांच्या मतापेक्षा अधिक किंमत आहे, यात काही वाद नाही. सचिन व्हि. रिचर्ड्सच्या मताचा त्याचमुळे आदर करतोय. ( असे सांगत सुटला) क्रिकेट जगणारे क्रिकेट पाहतात. क्रिकेटचे तज्ञ क्रिकेट पाहतात. क्रिकेट समालोचक क्रिकेट पाहतात आणि पोहचवतात त्याचबरोबर तुमच्या माझ्यासारखे हौशी लोकही क्रिकेट पाहतात. प्रत्येकाची आपली एक सच्याच्या खेळाकडे पाहण्याची दृष्टी आहे. आणि त्या आधारावर कोणी बोलत असेल तर फार महत्त्वाचे नसेलही परंतु प्रत्येकानं या निमित्तानं आपल एक मत व्यक्त केलं आहे, करताहेत. सचिनला झाल्या शतकामुळे आपल्या भाषेत मणामणाचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय त्याचा अर्थ असाही आहे की, सच्यालाही लोकभावना आणि काही तज्ञांची मतं कळताहेत. लोकांच्या प्रचंड अपेक्षा त्याच्याकडून असतात हेही त्याला ठाऊक आहे. आता या लोकभावना आणि तज्ञांची काय काय मत आहेत आणि त्याचे अर्थही काय आहेत हेही त्याला उत्तम कळतं. म्हणून तर त्याच्या भविष्यकाळाच्या खेळासाठी तो व्हि. रिचर्ड्सच्या मताचा दाखला देतो आणि माझ्यातला क्रिकेटचा फॉर्म अजूनही उत्तम आहे. आत्ता तर मी कुठे चांगला खेळतोय प्रत्येक वेळी लक असेलच असे नाही म्हणतो म्हणजे त्याच्या खेळातली भूक अजूनही खूप आहे ''मला अजून खेळवा'' असेच त्याला या महाशतकानिमित्तानं म्हणायचं आहे. आपण कितीही म्हटलं त्यानं खेळलं पाहिजे आणि कितीही म्हटलं की आता त्याने नव्यांना जागा करुन दिली पाहिजे. तसंही, आपल्या मताला कोणतीच किंमत नाही. आपल्या हातात फक्त पाहणे आणि सोसणेच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आपण कितीही म्हटलं त्यानं

गणपा
Sat, 03/17/2012 - 18:08 नवीन
आपण कितीही म्हटलं त्यानं खेळलं पाहिजे आणि कितीही म्हटलं की आता त्याने नव्यांना जागा करुन दिली पाहिजे. तसंही, आपल्या मताला कोणतीच किंमत नाही. आपल्या हातात फक्त पाहणे आणि सोसणेच आहे.
हांगाश्श्शी. आता कस एकदम प्वाइंटाच्या मुद्द्यावर आलात सर. ज्यांना पहायचय त्यांना पाहुद्या. ज्यांना ते सोसणे वाटते त्यांनी आपले डोळे कान बंद करुन घावे. काय म्हंता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाहणं आणि सोसणं हे सापेक्ष

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/17/2012 - 18:40 नवीन
पाहणं आणि सोसणं हे सापेक्ष आहे. असो, आम्ही मात्र आपल्या सर्वांच्या वतीनं सच्याला मानाचा फेटा घातला आहे. आणि छायाचित्र आंतजालावरुन साभार असंही कोपर्‍यात लिहिलं आहे. थोडक्यात आपलं मत असं दिसतं- '' सचिन फक्त विक्रमासाठी खेळतो ' या टीकाकारांच्या टीप्पणीवर सचिन म्हणाला की, काही लोक असे आहेत ज्यांचा मी मान राखतो आणि काहींची भीड बाळगत नाही. ज्यांची मी भीड बाळगत नाही, त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यांना जे बोलायचे ते बोलत राहू दे. माझे काम देशासाठी खेळणे आणि जिंकून देणे आहे.'' याला म्हणायचं पाहणं. :) आणि ''माझ्यासाठी नाही, तर देशासाठी खेळणे हे माझे लक्ष असून ते जोपर्यंत पूर्ण होते आहे तोपर्यंत मी खेळत राहीन'' याला म्हणायचं सोसणं. :) पळा आता...........!!! (बातमी सौजन्य मटा) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मला आठवतय, जर मी चुकत नसेल ती

जोशी 'ले'
Sat, 03/17/2012 - 18:27 नवीन
मला आठवतय, जर मी चुकत नसेल ती अहमदाबाद च्या मोटेरा वरची श्रीलंके विरुध्द ची टेस्ट होती व 434 व्या विकेट ची कपिल ला प्रतिक्शा होती व लंकेची एकच विकेट बाकी असतांना कुंबळे बिचारा दिड दोन हात बाहेर बॅालींग करत होता :-) न जानो चुकुन विकेट मिळालि तर, नंतर न्युझीलंड विरुध्द वगळल्या नंतर त्याने निव्रुत्ती स्विकारली,......त्याने सचिन ला निव्रुत्ती बद्दल काहि सांगावे? ये बात कुछ हजम नही हुवा पांजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

खरंय. असाच प्रकार सचिनने

श्रीरंग
Tue, 03/20/2012 - 20:29 नवीन
खरंय. असाच प्रकार सचिनने देखील केला हे बघून आश्चर्य वाटलं. १०-१२ षटकं शिल्लक असताना अती सावध खेळून त्यानी संघाचा घात केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

पुढल्या निवड समितीचे अध्यक्ष

गणपा
Tue, 03/20/2012 - 20:52 नवीन
पुढल्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणुन श्रीरंगरावांचे नाव सुचवू इच्छितो. :) दाखवा सगळ्या माजोरड्या म्हातार्‍यांना बाहेरचा रस्ता हो तुम्ही श्रीरंगराव. आपला फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

सचिन चे

समंजस
Sat, 03/17/2012 - 09:28 नवीन
सचिन चे अभिनंदन ! [ शेवटी सचिनची (शतकांची) शंभरी भरली म्हणायची तर :) ] अवांतरः क्रिकेटच्या देवाचं अवतार कार्य आता संपलं असं म्हणता येईल का? क्रिकेटचा देव आता पुढील अवतारांना कार्य करण्यास संधि देईल का ? की परशूरामासारखं इतर अवतारांच्या मध्ये लुडबुड करणार?
  • Log in or register to post comments

सच्याची नै भरली........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/17/2012 - 20:12 नवीन
क्रिकेटच्या देवाचा अवतार एवढ्यात संपणार नाही. सचिन म्हणतो की, निवृत्तीचा विचार करायला लावणारे स्वार्थी वृत्तीचे आहेत. (कोण स्वार्थी आहे, हे मला अजिबात कळलं नाही) काही कळलं का तुम्हाला ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

नाहि ब्वॉ

समंजस
Mon, 03/19/2012 - 18:09 नवीन
नाहि ब्वॉ. आपल्याला माहित नाही ते कोण आहेत आणि तसेही सचिन खुपच समंजस असल्यामुळे तो कोणाचंही नाव घेणार नाही :) त्यामुळे हे रहस्यच राहणार बहूतेक :) निवृत्ती केव्हा घ्यावी हे ठरवण्याचा अधिकार त्याला आहेच. फक्त एक भिती ही आहे की त्याचा रवि शास्त्रि होउ नये :) अवांतरः [ थोरा/मोठयांनी सांगितलंय की थोडक्यात जी गोडी असते ती जास्तीत नाही :) ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाही, तो तसे म्हंटलेला नाही

फारएन्ड
Mon, 03/19/2012 - 19:21 नवीन
निदान मी पेपरमधे वाचलेले आहे ते "खेळाच्या शिखरावर असताना निवृत्त होणे हे स्वार्थी आहे" असे म्हंटला आहे. ते चुकीचे नाही. हे द्रविडला उद्देशूनही नसावे. ते दोघेही अशा पद्धतीने एकमेकांना टोमणे मारायच्या पेक्षा बर्‍याच वरच्या लेव्हलचे आहेत. द्रविडने इंग्लंड दौर्‍याआधीच ठरवले होते की इंग्लंड दौर्‍यानंतर निवृत्त व्हायचे. पण तेथे त्याचा 'टच' परत आल्याने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्याचे ठरवले. तेथे पुन्हा अपयशी ठरल्यावर आता अजून ताणण्यात अर्थ नाही असे त्याला वाटले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अति होतय

मन१
Sat, 03/17/2012 - 12:52 नवीन
अति होतय
  • Log in or register to post comments

च्यायला तु पण क्रिप्टिक

यकु
Sat, 03/17/2012 - 12:54 नवीन
च्यायला तु पण क्रिप्टिक कर. काय अति होतंय ते तर सांगशील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मिपा

मन१
Sat, 03/17/2012 - 13:27 नवीन
मिपाचं एकवेळ ठिक आहे हो, सचिन सोडून इतरही धागे वगैरे येताहेत. सचिनच्या खेळाचा चाहता असूनही मिडियात, आणि एकूणच जनमानसात " महाशतक" हा एक एकच ज्वलंत राष्ट्रैय प्रश्न वगैरे जो बनला होता आणि जो मास हिसटेरिया झालाय त्याचे आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+१

कुंदन
Sun, 03/18/2012 - 02:14 नवीन
मन१ बरोबर सहमत. प्रा डॉ , तुमचा आयकर भरायला सचिन येणार आहे का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

माझा आयकर कुंदन भरील ना ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/18/2012 - 08:58 नवीन
प्रा डॉ , तुमचा आयकर भरायला सचिन येणार आहे का? माझा आयकर मलाच भरावा लागणार आहे. पण, सचिननं ज्या फलंदाजीने ब्रह्मानंदी टाळी लागण्याचा जो आनंद दिला त्याची तुलना कोणत्या कराशी कधीच होणार नाही. ष्ट्रेट ड्राइव्ह मारल्यानंतर आपल्या चेह-यावर आनंदाची जी लहेर उमटायची ती शब्दात पकडता येणार नाही. सचिननं पॅडलस्वीप मारायचा पवित्रा घेतल्यावर अनेकदा मला धडकी भरली भरली आहे. काय करायचां हा जीवघेणा स्वीप, या पेक्षा कितीतरी फटके तुझ्या भात्यात आहे, असे मनोमन बोलून मी कितीतरी वेळा त्याच्याशी मनातल्या मनात संवाद साधला आहे. माझ्या जगण्यातल्या अनेक भल्या-बुर्‍या प्रसंगातून मला या फलंदाजीनं खूप निरपेक्ष आनंद दिला आहे. सच्याचं ग्राऊंडवर दिसणं हाही आनंदाचा क्षण असायचा. असतो. हा आता त्याचा परफॉर्मन्स पूर्वी सारखा नसला तरी 'लाईक' वर आम्ही रसिक क्लीक करतोच. असो... केवळ डॉलर आणि त्याच्या आजूबाजूलाच पाहणार्‍या आणि यंत्राप्रमाणे जगणा-या लोकांना आमच्या भाऊक लोकांच्या भावना काय समजायच्या. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अभिनंदन :-)

दिपक
Sat, 03/17/2012 - 13:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

खर तर प्रतिसाद द्यायचा नव्हता.. पण काये ना

गणपा
Sat, 03/17/2012 - 13:51 नवीन
सचिनच शतक झालं की काहींजणांचा अपेंडिक्सचा त्रास बळावतो.... आणि तो सामना हरल्या शिवाय त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नाही. मग त्यासाठी बिचार्‍या देवांना पाण्यात बसुन रहावे लागते. :) तेव्हा तमाम सचिन द्वेष्ट्यांना सुदृढ आरोग्याच्या मनापासुन शुभेच्छा. आणि या नेक कामासाठी भारतीय संघाचे मनःपुर्वक आभार. :)
  • Log in or register to post comments

खल्लास! अपेंडिक्स होय? मग

यकु
Sat, 03/17/2012 - 13:55 नवीन
खल्लास! अपेंडिक्स होय? मग बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पटलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 03/17/2012 - 20:22 नवीन
>>>>> सचिन द्वेष्ट्यांना सुदृढ आरोग्याच्या मनापासुन शुभेच्छा. सचिन द्वेष्टे वगैरे कोणी नाही, नसेलही. सचिनबद्दल जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या कौतुकाच्या बातम्या वाचल्यानंतर कोणाही भारतियांची छाती अभिमानाने भरुन येईल असा हा प्रसंग आहे. कोणा क्रिकेट रसिकांचं काहीही मतं असलं तरी सचिन द्वेष्टे कोणी असेल असे वाटत नाही. त्यामुळे 'अपेंडिक्सचा त्रास' 'सचिन द्वेष्टे' हे प्रतिसादातील शब्द काही पटले नाहीत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सचिनच्या मुलाखतीत कुठेतरी

निनाद मुक्काम …
Sat, 03/17/2012 - 22:40 नवीन
सचिनच्या मुलाखतीत कुठेतरी वाचले की हॉटेलात आणी रूम सर्विस सगळे एकच विचारत होते की शतक कधी होणार हे वाचून मला आमचे जुने दिवस आठवले. आगाऊ पणा व भोसक पणा हे नखशिखांत आमच्या अंगात भरले असतात. मधमवर्गीय जीव नवीन नवीन ह्या पंचतारांकित दुनियेत खुळ्यागत वागतात. एकदा लक्ष्मी मित्तल ह्यांना तुम्ही देशाचे नाव मोठे केले मला तुमचा अभिमान वाटतो असे आमच्यापैकी एका दीड शहाण्याने मित्तल ह्यांना हॉटेलच्या भर लॉबी मध्ये म्हटले होते. आणि त्यांचा सारा कर्मचारी वर्ग क्षणभर पाहतच राहिले. नशीब त्यांच्या नोकरीवर गंडातर नाही आले. आज मला स्पायडर मेन सिनेमातील एक वाक्य प्रकर्षाने आठवले. "With great power comes great responsibility." This is my gift, my curse. Who am I सचिन
  • Log in or register to post comments

१०० बे शतक काय हो तो करणारच

रघु सावंत
Sat, 03/17/2012 - 23:39 नवीन
१०० बे शतक काय हो तो करणारच होता. त्याने नाही करायचे तर अजुन कोणी करायचे बाकी देवाचे काय अभिनंदन करायचे म्हणा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा