Skip to main content

बालपण

लेखक संदीप२७
सोमवार, 12/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे पुन्हा एकदा त्या निरागसकतेचे प्रतिक व्हायचे आहे.. कधी घाबरता जगातील दुष्ट प्रवृत्ती,गोष्टींना हलकेच आईच्या कुशीत शिरायचे आहे पुन्हा एकदा मला तिच्या कुशीतील उबदारपण अनुभवायचे आहे.. कधी एक घास चिऊचा एक घास काऊचा करत तिच्या हातून दुध भाताचा घास घ्यायचा आहे कधी हलकेच तिच्यावरील प्रेम मला तिच्या गालावर गाल घासून सांगायचे आहे म्हणूनच मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे.. पुन्हा एकदा कामावरून घरी आलेल्या बाबांकडे choclate चा हट्ट धरायचा आहे कधी नाही पुरवता ते नाक लाल करून,गाल फुगवून रुसवा व्यक्त करायचा आहे.. एकदा संसाराचा पसारा मांडण्या आधी भातुकलीचा खेळ तो खेळून पाहायचा आहे पुन्हा एकदा राजा होऊन गोंडस अशा राणीचे स्वप्न रंगवायचे आहे.. परीपक्वता विचारांत भरपूर आली त्यात थोडा बालीशपणा मिसळून पाहायचा आहे पुन्हा एकदा मला अल्लड अशा बालपणाचे दिवस जगायचे आहे कदाचित ह्यासाठीच मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे.. - संदीप
लेखनविषय:

वाचने 1164
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

परीपक्वता विचारांत भरपूर आली त्यात थोडा बालीशपणा मिसळून पाहायचा आहे पुन्हा एकदा मला अल्लड अशा नि:शब्द् झालो .............

लहानपण देगा देवा गुळ साखरेचा ठेवा. आता फक्त आठवणिच.......