Skip to main content

.....सखे.......

Published on शनीवार, 10/03/2012
सखे... मी होतो एक वादळ भरकटलेलं कुठेतरी. भरुन घेतेस त्याला ..शिडातल्या वार्यासारखे..तु तुझ्या पदरी. तुच दिशा होतेस..होतेस प्रेरणा मार्गावरच्या काटेरी. मी ही निघतो मग वाळवंटी फुलवित बागा. तारा सुध्दा मला बघुनि ठरवु लागतो त्याची जागा. सखे... तुझ्या डोळ्यातुन अलवार काजळ विखुरतं.. रात्र होऊन सार्या गगनात पसरतं.. पुर्ण निर्वस्त्र होऊन तु तुझा पदर भिरकावतेस गगनात .. चंद्र..तारे..त्यामध्येच मग लहान मुलासारखे खेळतात.. वासनेने फणफणणार्या मला तु समईच्या शांतपणाने कुशीत घेतेस.. निर्माल्यातील फुलासारखे स्वत:ला मला अर्पण करतेस... भोगात दंग मला अचानकच तुझ्या ह्रुदयाच्या स्पंदनातुन मृदंग ऐकायला येतो.. तुझ्या वक्षांमधल्या..मांगल्यमयी..हळव्या जागेत गाभार्यातील अंधाराचा भास होतो.. वासना एकाक्षणात तिथे जळुन खाक होते.. जमिनीवरच रेंगाळणार्या किड्यासारख्या माझ्या मनाला तेव्हा अतिविशाल गगनाचे भान येते.. मग मला फक्त ऐकु येत राहतं तुझ्या अंतरातील वास्तल्य.. भोगणारा मीच मग अर्पितो तुला माझे सर्वस्व..अन मीच होऊन जातो मग पवित्र निर्माल्य.. मग मी गगनातला भिरकावलेला तुझा पदर चंद्र तार्यांसहीत तुझ्या अंगाभोवती लपेटवतो .. पहाटेच्या मांगल्यमयी प्रकाशात... एक भोगी विझतो अन एक भक्त जन्मतो.. सखे.. ह्या वादळाला शिडात बांधतेस तु.. स्वत:च अस्तित्व माझ्यातच विरवुन..करुन देतेस स्वत्व मला प्राप्त .. फक्त तुच उरावीस..तनी मनी..कालातीत..सर्व ठिकाणी..माझ्याऐवजी.. तुझ्याच ठायी व्हावं हे वादळ समाप्त.. मनात साठलेय तुझ्याविषयी.. ओतप्रोत प्रिती.. तुझ्याच कुशीत मिळावी.. मला अखेरची मूठमाती.. -------योगेश @महिला दिनाचा मुहुर्त चुकला असला तरी समस्त स्त्रीवर्गाला माझा साष्टांग दंडवत..
लेखनविषय:

वाचन संख्या 1655
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

तुमच्या सखीला आणि एकूणच स्त्रियाना तुम्ही दिलेली सर्वोच्च मानवंदना!

अप्रतिम.. खूप वेगळ्या पातळीवरच्या जाणिवा , प्लेटोनिक लव्ह चा कन्सेप्ट या काव्यात जास्तच स्पष्ट झाला.

विचार करण्याची गोष्ट आहे. हेच जर डॉक्टरसाहेबांनी लिहिल असतं तर त्याला काय काय प्रतिसाद मिळाले असते? Nervy Guy