Skip to main content

मन-झोपाळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/03/2012 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
ओघळ पिकल्या पानांचे; सुकले देठ जरी अंकूर अजूनहि ओले; खोडात चिमुकले; गाभारी वारा,.. झाडून नेतसे हिरमुसलेले; गत वय माघारी झुळुकेत चिन्मयी कल्प उमलवे; नवजीवन दरबारी अंकीत कळ्या विलसती कोवळ्या वर्मावर अवतारी गंधाने भारी नवपर्णांकित शुभ्र परांची वारी किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी यातना वेदना गळलेल्या; नत पायतळाशी; गोळा पाहून रम्य मय वसंत-शोभा; तृप्त ऋणांकित डोळा मजला ही भेटे अशी मनोरम रत्नजडित मधुशाळा अवकाशाचा अन झुले अंबरी मदनमस्त मन-झोपाळा ................................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1871
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मनःपूर्वक आभार सांजसंध्याजी :)

पुढच्या ओळी आवडल्या : किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी

तुमची कविता वाचताना, कोरिव काम केलेल्या शिसवी खुर्चीवर हात फिरवल्याचा भास होतो. पुढच्या कवितेच्या प्रतिक्षेत.