✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

ज
जागु यांनी
Tue, 02/21/2012 - 16:26  ·  लेख
लेख
भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच. नुसती रुपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळीची फुले संध्यासमयी हिमवर्षावाप्रमाणे झाडाखाली सुगंधी सडा घालत असतात.बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे रसिकांना सुखद अनुभव असतो. तो मी मे महीन्यात अगदी वेळ काढून घेतला. आमच्या घरापासून १५ मिनीटांच्या अंतरावे एक मठ आहे. त्या मठीच्या आवारात २-३ बकुळीची झाडे माझ्या लहानपणापासुन पाहते. मागिल मे महिन्यात लेकीला सुट्टी पडल्या पडल्या ही फुले वेचायला जायचा चंग मनाशी बांधला. ह्या फुलांचा सडा प्राजक्ताप्रमाणे सकाळीच पडत असावा असा माझा भ्रम होता म्हणून एक दिवस लवकरच उठून आम्ही सहपरीवार बकुळीच्या झाडाखाली गेलो. पण तिथे तेंव्हा अगदी ४-५ फुले पडलेली सापडली. झाडावर पाहीले तर झाड फुला, कळ्यांनी गच्च भरले होते. तिथल्याच एका माणसाला विचारले असता त्याच्याकडून संध्याकाळी ही फुले पडतात असे समजले. मग आम्ही संध्याकाळी ही फुले वेचण्यासाठी गेलो तर नुकतीच सडा पडायला सुरुवात झाली होती. माझी मुलगी बालपणीचा फुले बकुळीची फुले वेचण्याचा पहिला अनुभव घेत होती तर मी मोठेपणी लहान होऊन हा अनुभव घेत होते आणि माझे मिस्टर आमच्या दोघींच्या आनंदात सामिल झाले. बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया अशा काहीतरी गाण्याच्या ओळी मनामध्ये आपोआप गुणगुणल्या जात होत्या. पिक्चमध्य स्लोमोशन दिसते तशी बकुळीची फुले हळूवार येउन खाली पडत होती. एक फुल वेचल की बाजुला दुसर येऊन पडायच. आमच्या दोघींची घाई झाली होती फुले वेचण्याची. फुले वेचून आम्ही एका रुमालात ठेवली. १५-२० मिनीटे आम्ही ह्या सुगंधी पुष्पवृष्टीचा आनंद घेत होतो. ती रुमालभर फुले घेउन आम्ही घरी आलो. घरी गेल्या गेल्या पहिला एका पानावर ती फुले ठेऊन फोटो काढले. नंतर त्याचे गजरे करायला घेतले. बकुळीचा गजरा करणे म्हणजे अतिशय सोप्पे काम. एखाद्या नारळाच्या, ताडाच्या पातीचा धागा काढून किंवा बिनपानांचे जे वेल असतात अमरवेल सारखे त्यात बकूळीची फुले बिनासुईने ओवली जातात. कारण ह्या फुलाला आधीच होल असते. कदाचीत ह्या कारणामुळेच बकुळीला दुसरे नाव ओवळी असे पडले असावे. दोर्‍यात गुंफतानाच सुईची गरज भासते पटापट ओवण्यासाठी. हा गजरा केसात माळल्यावर १-२ दिवस ह्याचा सुगंध केसात दरवळत असतो. कालांतराने ही फुले बदामी, बदामी वरून चॉकलेटी रंगाची होऊ लागतात पण बकुळीच्या सुगंधात मात्र काही कमतरता येत नाही. ह्या फुलांची अजुन एक गंमत म्हणजे ही फुले मावळली तरी पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात. पुर्वी वह्या-पुस्तकांच्या पानांमध्ये ही फुले ठेवण्याचा माझा छंद होता. ही फुले असलेल्या पुस्तकाची पाने उघडल्यावर त्यातुन सुगंध दरवळत असे. बकुळीपासुन सुगंधी साबण, अत्तर तयार करतात. बकुळीच्या सालीचा उपयोग आयुर्वेदात दातांच्या उपचारासाठी करतात. बकुळीला फळे धरतात. बकुळीच्या झाडाखाली कृष्ण बासरी वाजवून गौळणींना आकर्षीत करत असे असा महाभारतात बकुळीच्या झाडाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या बकुळीसोबर प्रेमभावनाही जुळलेल्या आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
35515 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

प्राजू काही हरकत नाही ग.

जागु
Fri, 02/24/2012 - 12:36 नवीन
प्राजू काही हरकत नाही ग. तुझ्यासारख्या रसिक व्यक्तिने घेतला ह्यात मला अजुन आनंद आहे. पैसा हल्ली खुपच दुर्मिळ झाली आहेत ही फुल. आपल्याला मिळतात हेच आपल नशिब समजायच आणि त्या बिचार्‍यांना त्यामुळे काही मिळकतीचे साधन मिळते हे त्यांचे नशीब. सुरंगीची आठवण केलीस म्हणुन मागचा सुरंगीचा धागा टाकते. http://www.misalpav.com/node/17348
  • Log in or register to post comments

प्रास ह्या अर्जुन वृक्षाला

जागु
Fri, 02/24/2012 - 15:14 नवीन
प्रास ह्या अर्जुन वृक्षाला आम्ही आईन/ऐन म्हणतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा