जागे होण्याआधी गोकुळ
शांत अजुन पानांची सळसळ
चंद्र केशरी अजुनी आभाळी
पहाटवारा वाहे अवखळ
अजुन जुईची बंद पाकळी
नसे अजुनही किलबिल जागी
खट्याळ वारा घाली फुंकर
होई हलके राधा जागी
दाट सावळ्या केसांना मग
हळुच सारुन मागे काना
अर्ध्या मिटल्या लोचनात त्या
पहिली आठवण होते कान्हा
अधीर्या ओल्या अंधारातुन
भारावून ती चाले वाट
तिलाच ऐकू येतो आणिक
यमुनेचा तो हिरवा काठ
दिसते तेथे बाहू पसरुन
तीच आकॄती ओळखीचा बांधा
घुमु लागता त्याचा पावा
राधा नुरते आता राधा
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1878
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा ! सुन्दर काव्य आवड्ले
मस्त!
+१
In reply to मस्त! by राघव
सुंदर
प्रेरणा , मस्त कविता आहे ,
सुंदर.
राधा कृष्णावर झालेली काव्य हा
सुंदर काव्य
व्वा... मस्तच...विशेषतःह्या
सुं द र !
+ १
In reply to सुं द र ! by चैतन्य दीक्षित
सुंदर कविता.
मस्त मस्त....! प्रेम करणारे