Skip to main content

काय करावे मन तळमळते !

लेखक विदेश यांनी बुधवार, 01/02/2012 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
साधे सोपे सहज शब्द ते एकापुढती एक ठेवले , कांगावा काही ना करता निमुटपणे ते कविता बनले ! याला तुम्ही कविता म्हणता ? -उसळुन सारे धावत आले , शांतच होती माझी कविता घाव किती अंगावर पडले ! अगम्य असभ्य शब्द कोषिचे एकापुढती एक ठेविले , डोक्यावरती घेऊन सारे कविता सापडली म्हणाले ! ही कविता की ती कविता मज अजूनही पुरते ना कळते , भीत रहावे - लढत रहावे - काय करावे मन तळमळते !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1596
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

चमचमीत मसालेदार बुफे ते एकापुढती एक ठेवले कांगावा काही न करता निमुटपणे ते मी रिचविले! याला तुम्ही जेवण म्हणता उसळुन सारे वरती आले , तरी शांतच होतो मी वरवरी जठरात ते डचमळले तरी! अगम्य अनंत ते मसाले एकामध्ये अनेक मिसळीले पोटात होवुनी कालव सारे पित्त वाढले असे म्हणाले! हा पदार्थ की तो पदार्थ खावू किती ते ना कळते उपाशी राहावे-चरतच राहावे काय करावे पोट मळमळते!

In reply to by मोहनराव

मालक, आपण विडंबनाला उंचीवर नेउन ठेवलंत... या जरा खाली या... तुम्ही पडल्यास खुर्च्या-टेबलांना इजा होइल नै का !!!

छान कविता आहे. आवडली. संदेश पोहोचला. प्रसिद्धीचे निकष बदलत असले तरी गुणवत्तेचे निकष कसे बदलतील, नाही का? तेंव्हा, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे! :)

In reply to by मेघवेडा

ये लगा मेवे का सिक्सर !! खरंच तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. त्याही पुढे चित्ती असू द्यावें समाधान. ;)