Skip to main content

" भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! "

लेखक विदेश
Published on गुरुवार, 26/01/2012
सर्वधर्मसमभाव सुखाने रमतो येथे माणुसकीला जपण्या जो तो बघतो येथे अतिथी आदर सन्मानाने घडतो येथे भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! |१| प्रतिकूल निसर्गातही चढाई शत्रूवरती जवान जखमी होउन लढतो सीमेवरती बलिदानाचा गर्व सांडतो भूमीवरती येथ जन्मलो, येथ वाढलो, बाळगतो अभिमान ! |२| सणवारांचे महत्व जपणे आहे एकीसाठी लहान मोठा भेद विसरणे जाणिव नित्यासाठी वैरभाव मतभेद विसरणे घडता भेटीगाठी संस्कारांचे वैभव अमुचे, बाळगतो अभिमान ! |३| तिरंग्यास घेऊन धावतो बालक हाती जेव्हां ऊर भरुन येतसे पित्याचा पाहुन हर्षे तेव्हां सार्थक झाले जन्माचे अभिमानही दाटे तेव्हां आदर्श मानव मी देशाचा, बाळगतो अभिमान ! |४|
लेखनविषय:

वाचन संख्या 1094
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया