ओढाळ स्मिताची रेष रेशमी फुलली
रचना हुरहुरली; काहुर गुंता; दृष्ट जाहली ओली
रज्जूंस पावली ऊर्जा मेघांमधली
दाटून श्वासभर अक्षत अंकित झाली
हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे
पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे
राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या
पापणीबंद सार्याच छ्टा प्रतिमेच्या
मग वाट पहाणे आठवणे गत उरले
नुरले भवताल; लयींवर; भुलले अंबर-झूले
एकांत झुरे भेटीसाठी लक्षण हे नच भवभोळे
पंजरी शरांच्या; भीष्म; स्मृती हळवेले
.........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1124
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
अफाट
"काहुर गुंता" सोडलं तर अगदी
लयीतल्या
In reply to "काहुर गुंता" सोडलं तर अगदी by प्रशांत उदय मनोहर
छान ! प्रत्येक कडव्यातील