Skip to main content

गजरा (४) ....

लेखक फिझा
Published on सोमवार, 23/01/2012
गजरा (४) नेहमीचाच असायचा हट्ट माझा गजऱ्याचा चा नाहीतर मग फुलांचा माझा वेळ जायचा कागदावरची फुले गुंफण्यात त्याचा मात्र कागदावर हिशोब लिहिण्यात पण कागदावर न उमटलेली एक लय मात्र घेऊन यायचा ... तो.... असा तो ......असा तो गजरा ........... रुसवे फुगवे तर नेहमीचेच असायचे भांडण किंवा अबोला कमीच पडायचे मग गजऱ्याचे देणे आणि घेणे व्हायचे .... आणि सुगंधाने त्याच्या दोघे मोहून जायचे ... डोळ्यात दाटलेली एक नीर ओळ पाहायचा आणि विरघळणारा राग झेलायचा ...... असा तो असा तो गजरा ......... क्षितिजाकडे पाहणारी नजर आणि हातातला हात... गुंतलेले भाव आणि गहिवरलेले श्वास .... 'माझे असणे' सार्थक करणारे त्याचे मोहक हसू , आणि उगीचच वाहणारे माझे डोळ्यातील अश्रू , भारलेले हे आयुष्य अजूनच सुगंधित करून टाकायचा ...... असा तो असा तो गजरा ......... मला ........ मला तो आवडायचा .....आणि त्याला माझा 'गजरा' !!!
लेखनविषय:

वाचन संख्या 1832
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

क्षितिजाकडे पाहणारी नजर आणि हातातला हात... गुंतलेले भाव आणि गहिवरलेले श्वास .... 'माझे असणे' सार्थक करणारे त्याचे मोहक हसू , आणि उगीचच वाहणारे माझे डोळ्यातील अश्रू , भारलेले हे आयुष्य अजूनच सुगंधित करून टाकायचा ...... असा तो असा तो गजरा ......... मला ........ मला तो आवडायचा .....आणि त्याला माझा 'गजरा' !!! तुमच काय ? तुम्हाला तो आवडायचा पण त्याला तुमचा गजराच ;;;;;;; परत त्याला विचारा कि तुला मी आवडते कि नाही. ते सांग ? ----- रघु सावंत

रुसवे फुगवे तर नेहमीचेच असायचे भांडण किंवा अबोला कमीच पडायचे मग गजऱ्याचे देणे आणि घेणे व्हायचे .... आणि सुगंधाने त्याच्या दोघे मोहून जायचे ... डोळ्यात दाटलेली एक नीर ओळ पाहायचा आणि विरघळणारा राग झेलायचा ...... असा तो असा तो गजरा .........
मस्त!! आवडली.