Skip to main content

शिवस्तुती

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 10/06/2008 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
अति शितल मृदू शांत चंद्र्मा तो ललाटी जटी जया उगम पावे जन्हवी पुण्यदाती लेपुन तनू भस्मा स्वात्मनंदा विराजी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अणू रणू व्यापणारी लोचने तीन दिव्य करी धरी ड्मरू आणि त्रिशुळ भव्य अति धवल दिव्य कांति तेजसी ती प्रकाशी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अर्धांगी आदी शक्ती वाम अंगास ज्याच्या जगत वंद्य पुत्र गणपती स्कंदराजा देखणा करी प्रपंचा शिव विरक्त योगी नमन तव करीतो शंकरा पुण्यश्लोकी अविरत जपी रामा भक्त श्रेष्ठा दयाळा शरण तव येता उद्ध्ररसी कृपाळा सहज तरूनी जाइ प्राथ्रितो जो शिवाला नमन तव करीतो शंकरा विश्वनाथा नृत्यनिपुण नटराजा मोहसी तू जगाला तांडव परि करीता विश्व जाते लयाला करून हरण प्राणा निजधामासी नेसी नमन तव करीतो शंकरा पुण्यश्लोकी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2260
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

एखादे स्तोत्र वाचल्यासारखे वाटले. पुण्याचे पेशवे