Skip to main content

सामोसा/समोसा चाट

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 12/01/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य सामोसा/समोसा भाजी: ४ बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करुन घ्याव्यात १/२ वाटी उकडलेले मटारचे दाणे २ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून जिरेपूड १ टेस्पून गरम-मसाला १ टीस्पून आमचूर पावडर (फोटोत नाही आहे पण पुढे कृतीत वापर केला गेला आहे ) १/२ टीस्पून जीरे मीठ चवीनुसार ५-६ कढीपत्ता तेल . पाकृ: एका भांड्यात तेल गरम करुन जीरे, कढीपत्ता, आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. . पेस्ट चांगली परतली गेली की त्यात चिरून ठेवलेले बटाटे, उकडलेले मटारचे दाणे, धणे-जीरेपूड, गरम-मसाला व मीठ घालावे. . त्यात आमचूर पावडर घालून सर्व एकत्र करावे. . भाजी तयार झाली की गार करायला ठेवावी. साहित्य सामोसा/समोसा आवरण व तळण: २ वाट्या मैदा १/४ वाटी बारीक रवा १ टीस्पून ओवा मीठ चवीनुसार कडकडीत तेलाचे मोहन . पाकृ: वरील सर्व साहित्य एकत्र करुन त्यावर कडकडीत तेलाचे मोहन घालावे . . गार पाण्याने कणीक घट्ट भिजवून ठेवावी. २०-२५ मिनिटांनी त्याचे गोळे करावेत.गार पाण्याने भिजवल्यामुळे सामोसे खुसखूशीत होतात. . तयार गोळयाची पोळी लाटावी, फार जाड ही नको...फार पातळ ही नको. लाटलेल्या पोळीचे मधो-मध दोन भाग करावे. . अर्ध्या भागाचा त्रिकोण करावा व त्याला मैदा-पाण्याची पेस्ट लावून बंद करावा. टोक ही नीट बंद करावे नाहीतर तळताना तेल आत जाईल. . . तयार त्रिकोणात तयार भाजी भरून कडा नीट बंद कराव्यात. . . गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर सामोसा/समोसा तळावेत. . तयार सामोसे /समोसे. . साहित्य छोले / चणा ग्रेव्ही : (ही ग्रेव्ही नेहेमीच्या छोल्यांप्रमाणे नाही जराशी आंबट-गोड आहे) २ वाट्या उकडलेले काबुली चणे किंवा टीनमधले चणे १ छोटा कांदा बारीक चिरलेला १ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट १ टेस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून जीरेपूड १ टेस्पून छोले मसाला १ टीस्पून जीरे ३-४ टेस्पून चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे) ४-५ टेस्पून चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे) मीठ चवीनुसार तेल . पाकृ: एका भांड्यात तेल तापवून जीरे, आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट व बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. . त्यात लाल-तिखट, धणे-जीरेपूड, छोले मसाला घालून परतावे. . आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आणावी. चवीपुरते मीठ घालावे. . आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालणे. . आवडीप्रमाणे गुळ घालणे व नीट मिक्स करणे. . रस्सा अंगासरशी ठेवावा. सर्व्हींग : तयार सामोसे /समोसे तयार छोले/ चणा ग्रेव्ही हिरवी चटणी चिंचेची चटणी फेटलेले दही बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव बारीक चिरलेली कोथिंबीर चाट-मसाला . एका प्लेटमध्ये सामोसा/ समोसा कुस्करुन घ्यावा व त्यावर डावाने छोले ग्रेव्ही घालावी. . त्यावर थोडे फेटलेले दही, हिरवी चटणी व चिंचेची चटणी घालावी. . त्यावर कांदा, टोमॅटो , चाट-मसाला, शेव व कोथिंबीर घालावी व लगेच खायला सुरुवात करावी. . नोटः वरील पाकृ थोडी मेहनतीची आहे पण तुम्ही ही आणखीन सोपी करु शकता. विकतचे सामोसे/ समोसे आणून बाकी कृती तशीच बनवावी. इथे फ्रोझन पट्टी सामोसे/ समोसे मिळतात जे विशेष आम्हाला आवडत नाही म्हणून मी घरीच सामोसे/ समोसे बनवते :) आवडत असल्यास सामोस्याच्या भाजीत हळद घालावी.

वाचने 17535
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

एकतर इतक्या मेहनतीने ते सामोसे बनवा, आणि नंतर परत कुस्करा. कशाला इतका त्रास करुन घ्यायचा? त्यापेक्षा सरळ सामोश्याच्या सारणासाठी भाजी करुन घ्यावी, पारीची पुरी तळून घ्यावी आणि हे दोन जिन्नस छोले ग्रेव्हीत मिक्स करावेत. चव तीच राहिल आणि त्रासही कमी. कसे? :) (इथुन पुढे तुमच्या पाकृना मस्त, चांगले, तोंपासू इ.इ. सर्व विशेषणे आहेत हे गृहित धरावे. प्रतिसाद दिला नसेल तरीही ;) )

In reply to by अन्या दातार

त्यापेक्षा सरळ सामोश्याच्या सारणासाठी भाजी करुन घ्यावी, पारीची पुरी तळून घ्यावी आणि हे दोन जिन्नस छोले ग्रेव्हीत मिक्स करावेत
+१ रे अन्या. बाकी मेहनत अफाट घेतली आहे. कुठुन उपासाच्या दिवशी धागा उघडला असे झाले. ;)

In reply to by गणपा

कुठुन उपासाच्या दिवशी धागा उघडला असे झाले.
तेच म्हणतो.. पाहवं कि नाही, या पेचात पडलेलो. एकतर आधीच गेल्या महिन्याभरापासून घरात समोसे बनवण्यासाठी भुणभूण सुरू होती त्यात आता रंगीबेरंगी फोटोवाला धागा कहर..!

In reply to by किसन शिंदे

एकतर आधीच गेल्या महिन्याभरापासून घरात समोसे बनवण्यासाठी भुणभूण सुरू होती
काय हे किसना? इतके दिवस सांगूनही सामोसे बनवले नाहीस? छे, तुझ्यासारख्या व्यक्तिकडून ही अपेक्षा नव्हती. अरे एखादा कट्टा चुकला असता तर काय आभाळ कोसळणार होतं का? तोच दिवस पकडून केले असतेस सामोसे तर चांगलं झालं असतं की नै?? ;)

In reply to by अन्या दातार

अरे एखादा कट्टा चुकला असता तर काय आभाळ कोसळणार होतं का?
अन्या बाळा, असे किती कट्टे झालेयत रे माझे गेल्या महिन्याभरात? तुझ्या नोंदवहीत बघून सांग जरा.

In reply to by किसन शिंदे

मा. अन्याभाउ,' सुसभ्य व्यक्तिमत्वाचे किसन शिंदे 'असं म्हणायचंय का तुम्हाला ?

वरील पाकृ थोडी मेहनतीची आहे पण तुम्ही ही आणखीन सोपी करु शकता. विकतचे सामोसे/ समोसे आणून बाकी कृती तशीच बनवावी.
एवढी मेहनत करणे शक्य नाही, त्यामुळे ही पूर्ण डीशच विकत आणावी म्हणतो ;) पण मस्त फोटो खासकरून चमचे! - (ऐतखाऊ) सोकाजी

का असा छळवाद मांडताय. त्रास आहे नुसता त्रास. अवांतरः ५० राव ही पाकृ पाहून विशेष आनंदित होणार यात काहीच शंका नाही. :)

हे असे फोटो टाकून आम्हाला फक्त जळवणे अज्ज्जिबात आवडले नाहीये. यापुढे तुझ्या पाकृंना माझ्याकडून प्रतिक्रिया मिळणार नाही यांची नोंद घे ;)

तुमच्या पाककृती पाहून आमचे डोळे दिपतात !!! तुम्ही (MASTER CHEF India ३) मध्ये जरूर भाग घ्या

मी नेहमीच तुमच्या पाक्रु वाचत असते... आणि बरर्याच करून पण पहिल्या आहेत...... तुमच्या सगळ्याच पाक्रु, वर्णन आणि स्तुती करण्या पलीकडे आहे.... :-) खूपच छान.... आणि सामोसे चाट तर लाजवाब !!! एक नंबर आले आहे... फोटो जीवघेणे आहे मात्र !!! :-) मनि.....

तुमचे कुटुंब हे अत्यंत नशिबवान आहे.. भयंकर पुण्यसंचय असल्याशिवाय घरात अशी सुगरण मिळत नाही.... रोज रोज नवे पदार्थ.... क्या बात है!!

मी पण स्मिताशी सहमत. आता तुला प्रतिक्रिया देणारच नाही

प्रेझेंटेशन एकदम बेस्टेस्ट आहे. तुमचं कौतुक वाटलं. :-) पण प्रचंड मेहनतीची डिश आहे ही... आयतीच मिळाली तर अगदी पोटभर खाऊ.

एकाच धाग्यात ३ वेळा खपल्या गेल्या आहे. मागच्या महिन्यात एकेठिकाणी चाट खाल्ली. ती इतकी भिकार होती, की चाट म्हणले की आता काटा येतो अंगावर. मात्र आता ही पाकृ पाहून पुन्हा ट्राय मारल्या जाईलच. मी सामोसा खाणाराच ! परेश कणकवलीकर ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मागच्या महिन्यात एकेठिकाणी चाट खाल्ली. ती इतकी भिकार होती, की चाट म्हणले की आता काटा येतो अंगावर. मात्र आता ही पाकृ पाहून पुन्हा ट्राय मारल्या जाईलच.
मी पण सहमत!!!
मी सामोसा खाणाराच ! परेश कणकवलीकर
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

_/\_ _/\_ _/\_ ...........नो कमेंट्स !!! :) :) :)

मेलो..............खपलो.........................अरे काय जीव घेताय आमचा...............एवढे चटकदार फोटो टाकुन आणि तेहि चतुर्थिच्या दिवशि .............का छ्ळ करताय..........कोणितरि था॑बवा रे .................... पाक्रु एकदम झकास.........फोटो त्याहुनहि मस्त.......... भन्नाट.........जबरदस्त........अजुनहि बर॑च ........आता था॑बतो......तो॑डातिल लाळेमुळे बोलता येत नाहिये..........

फोटू नेहमीप्रमाणेच्........विद्या बालन!;) कृती जरा वेळखाऊ आहे पण कष्टाचं फळही चवदार असतं.

समोश्याला समोशाचा आकार देणे आजपावेतो जमलेले नाही. पण आता त्याची तोडमोडच करायची म्हटल्यावर आकार कसाही आला तरी चालेल! :) तेव्हा करून पहायला हरकत नाही! अवांतर - निदान ह्या पाकृततरी चमचे दिसणार नाहीत असे वाटले होते :)

_/\_ .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. .. _/\_ .. आणि शेवटून दुसरा फोटू जीवघेणा.

काय सारखं सारखं सांगायचं बाई तुला!! अशक्य नीटनेटकेपणा आहे.. त्या छोल्यामध्ये, समोश्यामध्ये आणि शेवटच्या चाट मध्ये...

व्वा ! पाककृती आणि पाककृतीच्या प्रत्येक टप्प्याचे फो टो ज्या सुबकतेने आणि नजाकतीने सादर केले आहेत, ते पाहुन एखाद्या नवशिकीने अथवा एखाद्या नवशिक्यानेही ही पाककृती सहज केली तर नवल वाटायला नको.........

खुपच छान दिसतेय, एकदम आवडली

मस्तं पाककृती आहे. समोसे बनविताता बारीक चिरलेला कांदा तळून घ्यायचा आणि तो तेलातून काढून निथळवून समोश्यांच्या सारणात घालायचा तसेच आमचूर ऐवजी चांगल्य प्रतीचा चाट मसाला तसेच कोथींबीर वापरल्यास समोसे अजून चविष्ट होतील. समोशात कढीपत्ता टाळावा. समोशांचे छायाचित्र पाहता मैद्यात जे मोहन घातले आहे ते नीट मिसळले गेलेले नाही असे दिसते. कडकडीत मोहन न घालता थंड तेल मिसळून मैदा भरपूर मळावा लागतो. म्हणजे, मैदा आणि तेल पुर्णंपणे एकजीव झाले की आवरणाला फोड येते नाहीत. आणि आवरण खुसखुशीत होते. बाकी पाककृती दिसायला मस्त आहे. चवीलाही भन्नाट असणार. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे पुढच्यावेळेस नक्की तसे बनवून बघेन समोसे :) धन्यवाद