साहित्य सामोसा/समोसा भाजी:
४ बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करुन घ्याव्यात
१/२ वाटी उकडलेले मटारचे दाणे
२ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१ टेस्पून गरम-मसाला
१ टीस्पून आमचूर पावडर (फोटोत नाही आहे पण पुढे कृतीत वापर केला गेला आहे )
१/२ टीस्पून जीरे
मीठ चवीनुसार
५-६ कढीपत्ता
तेल
पाकृ:
एका भांड्यात तेल गरम करुन जीरे, कढीपत्ता, आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.
पेस्ट चांगली परतली गेली की त्यात चिरून ठेवलेले बटाटे, उकडलेले मटारचे दाणे, धणे-जीरेपूड, गरम-मसाला व मीठ घालावे.
त्यात आमचूर पावडर घालून सर्व एकत्र करावे.
भाजी तयार झाली की गार करायला ठेवावी.
साहित्य सामोसा/समोसा आवरण व तळण:
२ वाट्या मैदा
१/४ वाटी बारीक रवा
१ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
कडकडीत तेलाचे मोहन
पाकृ:
वरील सर्व साहित्य एकत्र करुन त्यावर कडकडीत तेलाचे मोहन घालावे .
गार पाण्याने कणीक घट्ट भिजवून ठेवावी. २०-२५ मिनिटांनी त्याचे गोळे करावेत.गार पाण्याने भिजवल्यामुळे सामोसे खुसखूशीत होतात.
तयार गोळयाची पोळी लाटावी, फार जाड ही नको...फार पातळ ही नको.
लाटलेल्या पोळीचे मधो-मध दोन भाग करावे.
अर्ध्या भागाचा त्रिकोण करावा व त्याला मैदा-पाण्याची पेस्ट लावून बंद करावा. टोक ही नीट बंद करावे नाहीतर तळताना तेल आत जाईल.
तयार त्रिकोणात तयार भाजी भरून कडा नीट बंद कराव्यात.
गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर सामोसा/समोसा तळावेत.
तयार सामोसे /समोसे.
साहित्य छोले / चणा ग्रेव्ही : (ही ग्रेव्ही नेहेमीच्या छोल्यांप्रमाणे नाही जराशी आंबट-गोड आहे)
२ वाट्या उकडलेले काबुली चणे किंवा टीनमधले चणे
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
१ टेस्पून आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट
१ टेस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जीरेपूड
१ टेस्पून छोले मसाला
१ टीस्पून जीरे
३-४ टेस्पून चिंचेचा कोळ (आवडीप्रमाणे)
४-५ टेस्पून चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे)
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
एका भांड्यात तेल तापवून जीरे, आले + हिरवी मिरची + लसूण पेस्ट व बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा.
त्यात लाल-तिखट, धणे-जीरेपूड, छोले मसाला घालून परतावे.
आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आणावी. चवीपुरते मीठ घालावे.
आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालणे.
आवडीप्रमाणे गुळ घालणे व नीट मिक्स करणे.
रस्सा अंगासरशी ठेवावा.
सर्व्हींग :
तयार सामोसे /समोसे
तयार छोले/ चणा ग्रेव्ही
हिरवी चटणी
चिंचेची चटणी
फेटलेले दही
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
बारीक शेव
बारीक चिरलेली कोथिंबीर
चाट-मसाला
एका प्लेटमध्ये सामोसा/ समोसा कुस्करुन घ्यावा व त्यावर डावाने छोले ग्रेव्ही घालावी.
त्यावर थोडे फेटलेले दही, हिरवी चटणी व चिंचेची चटणी घालावी.
त्यावर कांदा, टोमॅटो , चाट-मसाला, शेव व कोथिंबीर घालावी व लगेच खायला सुरुवात करावी.
नोटः
वरील पाकृ थोडी मेहनतीची आहे पण तुम्ही ही आणखीन सोपी करु शकता. विकतचे सामोसे/ समोसे आणून बाकी कृती तशीच बनवावी. इथे फ्रोझन पट्टी सामोसे/ समोसे मिळतात जे विशेष आम्हाला आवडत नाही म्हणून मी घरीच सामोसे/ समोसे बनवते :)
आवडत असल्यास सामोस्याच्या भाजीत हळद घालावी.
वाचने
17535
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकतर इतक्या मेहनतीने ते
त्यापेक्षा सरळ सामोश्याच्या
In reply to एकतर इतक्या मेहनतीने ते by अन्या दातार
+१
In reply to त्यापेक्षा सरळ सामोश्याच्या by गणपा
आँ??
In reply to +१ by किसन शिंदे
???????
In reply to आँ?? by अन्या दातार
मा. अन्याभाउ,' सुसभ्य
In reply to ??????? by किसन शिंदे
मस्त!
का असा छळवाद मांडताय. त्रास
सानिका तैंचा स्वप्निल असो...!
नाही आवडले
खतरनाक!!!!!
ताई!!!!
मस्त ,झक्कास्, तो पा सु
मी नेहमीच तुमच्या पाक्रु वाचत
..
सानिका
मी पण स्मितासोबत सहमत आहे..
प्रेझेंटेशन एकदम बेस्टेस्ट
खल्लास ! खल्लास ! खल्लास !
मागच्या महिन्यात एकेठिकाणी
In reply to खल्लास ! खल्लास ! खल्लास ! by परिकथेतील राजकुमार
कालच मस्त समोसा चाट
मस्त
_/\_ _/\_ _/\_
येस्स्स्स अँड ही इज बॅक, बॅक
मी परवाच सामोसे केले होते...
मेलो..............खपलो.......
ठार !!!! अवांतर : पतीराजांना
इनो
In reply to ठार !!!! अवांतर : पतीराजांना by सुहास..
फोटू
मस्त
येत्या विकांती समोसा चाट बेत
चटकदार ,चमचमीत..
_/\_ .. _/\_ .. .. _/\_ ..
पाककृतीकडे लक्ष न देता फोटो
काय सारखं सारखं सांगायचं बाई
खुप सुंदर !
लय भारी
मस्त..
धन्यवाद
In reply to मस्त.. by प्रभाकर पेठकर