Skip to main content

मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!!

लेखक फिझा
Published on गुरुवार, 05/01/2012
मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!! उधाणलेल्या समुद्राला सावरायचंय कोसळणाऱ्या पावसालाही झेलायचंय सूर्याचा रंग पांघरून स्वताला पाहायचंय कुणाचा निरोप तर कुणाचा आधार व्हायचंय किनाऱ्या.....मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!! वाऱ्याच्या संगतीने बेफान व्हायचंय पावसाच्या सरींनी चिंब भिजायचंय लखलखणाऱ्या सुर्यालाही नमवायचं .... कधी नवीन तर कधी गतआठवणी व्हायचंय सागरा .....मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!! हजारो पक्षांचे थवे होऊन उडायचंय सूर्य आणि चंद्राचे घर होऊन राहायचंय चांदण्यांच्या प्रकाशाने उजळून निघायचंय पाण्यालाही स्वताच्या रंगात रंगवायचंय आभाळा ....मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!! सगळ्या ऋतुंमध्ये नव्याने सजायचंय कधी हिरवी शाल तर कधी कोरडं व्हायचंय थंडीन कुडकुडायचंय , कधी पावसात भिजायचंय आगीचा डोह पोटात घेऊनही नेहमी हसायचंय वसुंधरे .....मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!! तुझी वाट बघत किनाऱ्यावर थांबायचंय समुद्राबरोबर तुझ्या आठवणीत रमायचंय तुझा हात हातात घेऊन आभाळात फिरायचंय प्रत्येक क्षणी तुझ्यासवे इथे जगायचंय तुझी होऊन...मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!!
लेखनविषय:

वाचन संख्या 1222
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

खुप मस्त... आवडली..खुप सुंदर!!

कवितेचा आशय अतिशय मस्त.... तुमच्या कविता ह्या संवेदना व अतिशय छानपणे मांडलेल्या असतात. उधाणलेल्या समुद्राला सावरायचंय कोसळणाऱ्या पावसालाही झेलायचंय सूर्याचा रंग पांघरून स्वताला पाहायचंय कुणाचा निरोप तर कुणाचा आधार व्हायचंय किनाऱ्या.....मलाही तुझ्या सारखंच वागायचंय ह्या ओळी अतिशय सुंदर झाल्या आहेत मस्त

अप्रतिम .. खुपच सुंदर
तुझी वाट बघत किनाऱ्यावर थांबायचंय समुद्राबरोबर तुझ्या आठवणीत रमायचंय तुझा हात हातात घेऊन आभाळात फिरायचंय प्रत्येक क्षणी तुझ्यासवे इथे जगायचंय तुझी होऊन...मलाही तुझ्या सारखंच वागायचंय !!!
सर्व कवितेच सार एकदम जबर्दस्त पणे मांडले आहे ..