थेंब टपोरे टपोरे
खाली आसुसली माती
मातीच्या गं अंगावर
लक्ष रोमांच फुलती
थेंब टपोरे टपोरे
पानापानात वाजती
फुलांच्या गं पाकळ्यात
मोती टपोरे झुलती
थेंब टपोरे टपोरे
गंध देहात, मनात
श्वास पुरता पुरेना
किती साठवू उरांत
थेंब टपोरे टपोरे
माझी तहान भागेना
तुझ्या स्मृती जागतात
डोळा डोळ्यास लागेना
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3564
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे अष्टाक्षरी पण .....
चांगली
नारदाचार्य
In reply to चांगली by नारदाचार्य
खी खी खी :)
In reply to नारदाचार्य by विवेक काजरेकर
तरीही छंदात आहे
वा!
प्रसन्न+कलाटणी
सुंदर!
'ग' बद्दल...
आमचाही अधिकार नाही
In reply to 'ग' बद्दल... by अविनाश ओगले