कोण होती ती.... (९)
ती म्हणाली " आता हे होणे नाही ...
या जन्मी हे भाग्य नाही .....थकले आहे रे
त्राण नाही आता जगण्याचे,,,बास !!
तुला एकदा पाहायचे होते दुरुनी
म्हणून थांबवले होते मृत्यूला प्रत्येक क्षणी .....”
तो तिथेच उभा होता ...तसाच ....
ती निघाली .....मागे वळूनही नाही पहिले
त्याने खूप प्रयत्न केले तिला थांबवण्याचे
पण सोसाट्याचा वारा त्याचा आवाज
गिळून टाकत होता ...
कोसळणारा पाऊस त्याची आसवे पुसून टाकत होता
स्तब्ध तो , पाय जमिनीवरच खिळले होते ...
तसाच उभा राहिला तो ... तिथेच ....
त्याला अडवायचे होते तिला ,,
झालेल्या चुकीची कबुली पण द्यायची होती ..
आता त्याला एक एक क्षण तिच्याबरोबर जगायचे होते....
तो आता तिच्यासाठी आक्रोश करत होता...
पण वेळ निघून गेली होती....
त्याच्या काळजाचे झालेले तुकडे घेऊन ....
तो तिथेच उभा होता ...तसाच ....
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1203
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच मस्त
आवडली .छान