Skip to main content

कुणीतरी...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 07/06/2008 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
कसे लागले वेड जीवाला कुठुन जुळले रेशीमधागे चांदरातीला चांदण्यांसवे कोण कुणासाठी हे जागे? कुठुन येइ असा अचानक प्राजक्ताचा गंध सभोवती कुणासाठी अन हसता हसता नकळत डोळे भरुन येती? कुणासाठी ही लागे हुरहुर कशासाठी ये भरुन हा उर कुणासाठी अन आनंदाच्या क्षणीही उठते मनात काहुर कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर...
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 6526
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया