Skip to main content

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी सोमवार, 26/12/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
तोल हा मनाचा तू जरा सावर रे. दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पडुनी झोळीस सारा बाजार निघुनी जात रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. नकळतच एखाद्याच्या मोहात ते अडकत, ती गोष्ट दूर होण्याच्या भीतीने त्यास वेधत, पण व्यक्ती, वस्तू आणि प्राण कधी न कधी सोडून जात रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. Posted by santosh at 09:08 0 comments Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook भेट ती तरुणी चालली कुणिकड, डोक्यावर घेउनी घागर, पडता कानी बासरीचे ते स्वर, धुंद होऊनी ती चालली बेफिकीर. तहान आणि भुकेचा आता पडला विसर, नाजूक पायी तिच्या ना ठेचाचा असर, त्या स्वरातील हाक आहे ती जाणून, मग बेभान होऊनी ती चालली बेफिकीर. खरच त्या स्वरात आहे खूप माधुर्य, पण तिला तर सख्याची ओढ, ते तर आहे तिच्यासाठी भेटीच माध्यम, मग सख्याच्या ओढीन ती चालली बेफिकीर. आता ना कसल्या थकव्याची जाणीव, नाजूक पद तिचे पडती भर भर, आता त्याच्या भेटीशिवाय तिच्या मनास कसले चैन, मग बैचैन होऊनी ती चालली बेफिकीर. पाण्याच्या बहाण्याने ती सख्यास भेटत, त्रासली ती डोक्यावर घेउनी घागर, पण भेतीसमोर हा त्रास तिला वाटे नगण्य, मग सोसुनी हा त्रास ती चालली बेफिकीर. रोजच तर असते दोघांची भेट, आणि रोजचाच हा जीव असत आतुर, रोजच्या प्रभातसम ह्यातील गोडवाही कायम, मग त्या भेटीतील गोडवा चाखण्यास ती चालली बेफिकीर.
लेखनविषय:

वाचने 3355
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ती तरुणी चालली कुणिकड, डोक्यावर घेउनी घागर, पडता कानी बासरीचे ते स्वर, धुंद होऊनी ती चालली बेफिकीर. तहान आणि भुकेचा आता पडला विसर, नाजूक पायी तिच्या ना ठेचाचा असर, त्या स्वरातील हाक आहे ती जाणून, मग बेभान होऊनी ती चालली बेफिकीर. खरच त्या स्वरात आहे खूप माधुर्य, पण तिला तर सख्याची ओढ, ते तर आहे तिच्यासाठी भेटीच माध्यम, मग सख्याच्या ओढीन ती चालली बेफिकीर. आता ना कसल्या थकव्याची जाणीव, नाजूक पद तिचे पडती भर भर, आता त्याच्या भेटीशिवाय तिच्या मनास कसले चैन, मग बैचैन होऊनी ती चालली बेफिकीर. पाण्याच्या बहाण्याने ती सख्यास भेटत, त्रासली ती डोक्यावर घेउनी घागर, पण भेतीसमोर हा त्रास तिला वाटे नगण्य, मग सोसुनी हा त्रास ती चालली बेफिकीर. रोजच तर असते दोघांची भेट, आणि रोजचाच हा जीव असत आतुर, रोजच्या प्रभातसम ह्यातील गोडवाही कायम, मग त्या भेटीतील गोडवा चाखण्यास ती चालली बेफिकीर.

मला वाटले मनाचा तोल ढासळवणारे काहीतरी दिले आहे कलादालनात. श्या ! घाईघाइने धागा उघडून निराशा झाली.

३१ डिसेंबर च्या अगोदरच जागा चुकली वाट्ते मला वाटले मनाचा तोल ढासळवणारे काहीतरी दिले आहे कलादालनात. धागा उघडून निराशा झाली. काव्य प्रकार कलादालनात कुठे हो

तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रसवणार्‍या शब्दकळांना तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे.