वीश

भारती's picture
भारती in जे न देखे रवी...
7 Jun 2008 - 9:50 am

तू तर माझी स्पेशल डीश
द्यायच्याय तुला भरपूर वीश
दिसली नाहीस एक दोन वीक
बरी नव्हतीस, होतीस का सीक?
स्पेशल माणसाला स्पेशल गीफ्ट
आयुर्मान लाभो तुजला 'ह॑ड्रेड ए॑ड फीफ्थ'

कविताशुभेच्छा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Jun 2008 - 12:38 pm | विसोबा खेचर

भारतीताई,

मिपावर नवीनच दिसता. आपलं मनापासून स्वागत करतो...

चुभूदेघे, परंतु आपलं लेखन हे पुढे ढकललेल्या इपत्रांतील वाटतं आहे. अर्थात, तसं ते नसेल तर चांगलंच आहे. परंतु इथे लेखन करण्यापूर्वी आपण हे वाचलं असेल अशी आशा करतो.. आणि वाचलं नसेल तर ते वाचावं अशी विनंती करतो...

असो, आपले मिपावरील वास्तव्य आनंददायी आणि सुखकर होवो..

आपला,
(मिपाकर) तात्या.

स्वप्निल मन's picture

7 Jun 2008 - 9:52 pm | स्वप्निल मन

तात्या,

तुमचा समज चुकीचा आहे. वरील कविता मी स्वतः लिहीलेली आहे. मी मिपाचे सर्व नियम वाचलेले आहेत. मी कुठेही कविता अपलोड करताना स्वतः लिहीलेल्याच
कविता अपलोड करते.

आणि इपत्रांतील कविता कोणीतरी लिहीलेल्याच असतात. उलट माझ्यासाठी ही चा॑गली compliment आहे.

आपला चिकित्सकपणा आवडला.

फटू's picture

7 Jun 2008 - 10:28 pm | फटू

कविता लिहिली भारतीताईंनी... तात्यांनी विचारणा केली भारतीताईंकडे... आणि त्याला प्रत्युत्तर दिले स्वप्निल भाऊंनी... एक व्यक्ती आणि दोन वापरखातं असं काही आहे का ?

असो... मिपावर आपलं स्वागत आहे...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

स्वप्निल मन's picture

7 Jun 2008 - 10:13 pm | स्वप्निल मन

तात्या,

वरील प्रतिक्रीया माझी नाही, भारतीताई या॑ची आहे. भारतीताई माझ्या आई आहेत. चुकून ती माझ्या खात्यामधून प्रकाशित झाली.

विसोबा खेचर's picture

8 Jun 2008 - 6:47 am | विसोबा खेचर

खुलाश्याबद्दल धन्यवाद स्वप्नीलराव!

आपल्या मातोश्रींचं मिपावर मनापासून स्वागत आहे. त्यांना आमचा नमस्कार कळवा!

आपला,
(मातृभक्त) तात्या.