
आज जवळ जवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता नावातच एग असल्याने अंड्याचा वापर अपरिहार्य आहे. ;) पण तुम्ही अंड खात नसाल तर त्यावरही उपाय आहे.
नेहमीसारखे वांग्याचे काप करण्या ऐवजी आज पाकृमें थोडा टिव्स्ट्.
साहित्यः

एक मोठं वांगं.
एक मोठा कांदा (जीतका शक्य असेल तितका बारीक चिरलेला.)
२ मध्यम टोमॅटो (
.........................-॥-
.........................)
२-३ चमचे टोमॅटोची पेस्ट.
चिमुटभर साखर (ऑप्शनल.)

१ चमचा लाल तिखटं / मसाला.
१/४ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
२-३ चमचे तेल.
१/४ वाटी ब्रेड क्रम्स्
१/४ वाटी मैदा + चवीनुसार मीठ.
१ अंडे.(फेटलेले.)
अंड्याला पर्याय हवा असल्यास २ चमचे मैदा + १ चमचा बेसन एकत्रं करुन थोडं पाणी टाकुन भजीच्या पीठा पेक्षा किंचीत पातळ भिजवावं.
कृती:
या पाककृतीसाठी आपल्याला थोडा सॉस / रस्सा लागणार आहे. तर सर्व प्रथम आपण तो बनवून घेऊ.
सॉस

एका कढईत ३-४ चमचे तेल कडकडीत तापवून घ्यावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. चिमुट्भर मीठ टाकावं म्हणजे कांद्याला पाणी सुटुन तो लवकर शिजेल.
मग त्यात लाल तिखट / मसाला टाकून चांगलं परतुन घ्यावं.

मसाल्याचा कच्चा वास निघुन गेल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. मध्यम ते मंद आचेवर सतत परतत रहावं. चवी नुसार मीठ टाकावं. २-३ चमचे टोमॅटोची पेस्ट टाकून चांगल ढवळुन घ्यावं. चीमुटभर साखर टाकावी.

वरून झाकण ठेउन पेस्टचा कच्चट वास जाई पर्यंत आणि कांद्या टोमॅटोचा पार लगदा होई पर्यंत शिजवावे. हा सॉस बनवताना शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. (झाकण ठेवल्यावर आतल्या बाष्पाचं जितकं पाणी पडेल तितक पुरेसे आहे.)
वांग्याचे काप

एका बशीत ब्रेड क्रम्स, दुसर्यात मैदा + मीठ आणि तिसर्यात फेटललं अंडे ठेवुन हाताशी ठेवावं.
(ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी २ चमचे मैदा + १ चमचा बेसन + पाणी एकत्र करुन भजी पेक्षा थोडं पातळ पीठ भिजवून घ्यावं.)

वांग्याचे साधारण १ ते दिड सेंमी जाड काप करुन घ्यावे.
लाल तिखट / मसाला + तेल + मीठ एकत्र करुन ते वांग्याच्या कापाना लावून किमान २० मिनीटे मुरत ठेवावं.
मुरवलेल कापांना पाणी सुटलेल असल्याने ते सर्वप्रथम मैद्यात घोळवून घ्यावे. मग ते फेटलेल्या अंड्यात घोळवून शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.

तव्यावर २ चमचे तेल सोडून ते कडकडीत तापल्यावर त्यात हे वांग्याचे काप खरपूस तळून घ्यावे.
हे तळलेल काप एखाद्या जाळी वर ठेवावे म्हणजे खालून वाफ धरुन ते मऊ पडणार नाहीत.
(इथले २-३ फोटो माझ्या धांदरट पणामुळे डिलीट झाले. :( )
एका बेकिंग पेल्ट मध्ये खाली थोसा सॉस पसरवून घ्यावा त्यावर एक वांग्याचा काप ठेवावा. वरून परत थोडा सॉस लावून त्यावर अजुन एक काप असा थर रचावा. वर परत थोडा सॉस लावुन बचका भर तुमच्या आवडीचं चीज ठेवावं. (मी मोझ्झेरेला चीज वापरलय.)
नंतर ही बशी ओव्हनमध्ये ग्रील मोड वर चीज वितळे पर्यंत ठेवावी (अंदाजे १ ते दीड मिनीट.)
ओव्हन नसल्यास मायक्रॉवेव्हमध्येही चालेल.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

स्टार्टर म्हणुन वाढायला हरकत नाही.

पण हा पदार्थ गरम असतानाच खाण्यात मजा आहे. तेव्हा ताबडतोब लुत्फ घ्यावा.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

वाटल्यास थोडासा पुलाव/ जीरा राईस सोबत साईड डिश म्हणुनही वाढू शकता.
__/\__
अरे काय सकाळीच त्रास आहे हा..
In reply to अरे काय सकाळीच त्रास आहे हा.. by गवि
+१
In reply to अरे काय सकाळीच त्रास आहे हा.. by गवि
जबरदस्त
अतिशय जबराट, तोंडाला पाणी
In reply to अतिशय जबराट, तोंडाला पाणी by प्रचेतस
+१
जबरा, भन्नाट.. आणखी काय बोलू?
गणपाशेठ,
In reply to गणपाशेठ, by प्रास
असेच म्हणतेय मी
In reply to असेच म्हणतेय मी by सानिकास्वप्निल
+१
देवा या माणसापासून वाचव रे.
गणपा
In reply to गणपा by परिकथेतील राजकुमार
+१
:-)
In reply to :-) by दिपक
+१ प्रतिसाद आवडेश.
In reply to :-) by दिपक
बरोब्बर प्रतिसाद
In reply to बरोब्बर प्रतिसाद by अत्रुप्त आत्मा
+१ पाकृतीचा लुत्फ नव्हे तर
मस्त
मस्त
वांग्याची अलर्जी आहे, फरक
In reply to वांग्याची अलर्जी आहे, फरक by वैशाली माने
हे राम.
In reply to हे राम. by गवि
हे राम नको. त्यांना सगळ्याचीच
गनपाभौ, चीझ आणि टोमॅटो सॉस हे
In reply to गनपाभौ, चीझ आणि टोमॅटो सॉस हे by सोत्रि
हे सांगितलेत ते चांगले केलेत.
In reply to गनपाभौ, चीझ आणि टोमॅटो सॉस हे by सोत्रि
चीझ आणि टोमॅटो सॉस हे
पुस्तक
गणपा, अप्रतिम पाकृ. पूर्वी
चीज वितळळेला वान्ग्याचा फोटो
__/\__ दंडवत.
व्वा..
काही नवीन?
मस्त..
लई भारी!
यम्मी!
पास...
झक्कास!
झकास!!
एगप्लान्ट पार्मझान सारखे दिसतेय....
In reply to एगप्लान्ट पार्मझान सारखे दिसतेय.... by खादाड_बोका
अगदी हेच!
In reply to एगप्लान्ट पार्मझान सारखे दिसतेय.... by खादाड_बोका
येस बरोबर. पण आमच्या
भागो भाई लोक अब ये
. (नजर लागु नये म्हणुन तीट
छान फोटो! शॉर्टकटः विकतचे
अरे काय कहर आहे ही पाकृ.