Skip to main content

पुन्हा एकदा

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 16/12/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दुलई धुक्याची अंगावर दंव निळी ओढणी गूढ नभावर कौलांवरती वलये धुराची ऊब पांघरुन जो तो भूवर झिरमिळ पालव रेशिम इरकल चित्र नव्हाळे लज्जित कणभर गोत जिव्हाळा हा सृजनाचा मकर क्रांतिचा वारू मनभर चाहुल वा ही हूल म्हाणावी येते जाते तुडवित अंतर पाचोळा उधळित स्वप्नांचा पुन्हा एकदा झुलते अंबर ....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1651
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आता तुमच्या कवितेवर प्रतिसाद द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत.
चाहुल वा ही हूल म्हाणावी येते जाते तुडवित अंतर पाचोळा उधळित स्वप्नांचा पुन्हा एकदा झुलते अंबर
सुन्न!!!

सुंदर रचना!

सही रे सही