✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रारणगाथा-६ पैकी ५: किरणोत्साराची देखभाल

न
नरेंद्र गोळे यांनी
Sun, 12/11/2011 - 08:06  ·  लेख
लेख
किरणोत्सार पाहताही येत नाही आणि अनुभवताही येत नाही. मात्र त्याचा स्वास्थ्यावर हानीकारक प्रभाव पडतो. म्हणून, किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींची देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. ह्या देखभालीच्या साह्याने प्रत्येक व्यक्तीस मिळणार्‍या मात्रेची नोंद ठेवली जाते, ज्यामुळे हे सुनिश्चित करणे शक्य होते, की कोणत्याही कर्मचार्‍यास निर्धारित मात्रेपेक्षा जास्त मात्रा मिळू नये. किरणोत्सार देखभाल अनेक प्रकारे केली जाते. १. व्यक्तीगत अवशोषित किरणोत्सार मात्रेचे मापन २. किरणोत्सारी क्षेत्रातील किरणोत्साराचे मापन ३. गतीशील उपकरणाद्वारे किरणोत्साराचे मापन ४. शीतलक आणि द्रव व घन अपशिष्ट पदार्थांतील किरणोत्साराचे मापन ५. वातावरणात प्रसृत होणार्‍या किरणोत्साराचे मापन निरनिराळ्या किरणोत्सारांच्या मापनांसाठी निरनिराळी उपकरणे वापरली जातात. किरणोत्साराच्या उपस्थितीचा शोध लावण्यासाठी मूलक-कक्ष आणि प्रमाणशीर (आनुपाती) गणक वापरतात. व्यक्तीगत मात्रामापनासाठी चित्रफित, औष्णिक-प्रतिदीप्ती (थर्मोल्युमिनिसेंट) आणि किरणोत्सारी-प्रकाश-औष्णिक- प्रतिदीप्ती (रेडिओ-फोटो-थर्मोल्युमिनिसेंट) पदार्थांचा वापर करतात. किरणोत्साराचे क्षेत्रीय मापन आणि अन्य देखभाल करण्यासाठी गायगर-मुल्लर तसेच प्रस्फुरण प्रदर्शकांचा वापर करतात. अणुभट्टीच्या आसपास अथवा किरणोत्सारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीस आपल्याजवळ मात्रामापक (डोसीमीटर) बाळगणे आवश्यक असते. मात्रामापकाद्वारा ह्या गोष्टीचा पत्ता लागतो की त्या व्यक्तीने, विशिष्ट काळात (एक वर्ष, एक महिना, दोन सप्ताह अथवा त्याहूनही कमी) किती मात्रा प्राप्त केलेली आहे. देखभालीत पूर्वी दोन प्रकारच्या मापकांचा उपयोग होत असे. १. चित्रफीत (फोटोग्राफीक फिल्म) अथवा फितबक्कल (फिल्म बॅज) २. खिशात ठेवण्याचा छोटा मूलककक्ष. फितबक्कल काही काळ वापरल्यावर ती फित विकसित करून तिच्यातील काळेपणाच्या घनत्वाच्या आधारावर त्या काळात तिने प्राप्त केलेल्या अवशोषित किरणोत्सार मात्रेचे अंकन केले जाते. खिशातील मूलककक्षात, कोणत्याही वेळी डोळ्यांनी पाहून, प्राप्त मात्रा समजून घेता येते. बहुधा खिशातील मूलककक्ष उच्च किरणोत्सार क्षेत्रात काम करत असता वापरला जातो, कारण कमी वेळात जास्त मात्रा मिळाल्यास ते लगेच कळते आणि ती व्यक्ती सतर्क होते व आपली मात्रा निर्धारित मात्रेच्या मर्यादेत राखू शकते. वर्तमानात, फितबक्कल मात्रामापकाऐवजी औष्णिक-प्रतिदीप्ती मात्रामापकाचा (थर्मो-ल्युमिनिसेंट डोसीमीटर) वापर होत आहे. याव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये किरणोत्सारी-प्रकाश-प्रतिदीप्ती (रेडिओ-फोटो-थर्मोल्युमिनिसेंट) मात्रामापकाचाही वापर होत आहे.
प्रारण संरक्षणाबाबतची मानके निर्धारित करणार्‍या संस्था
प्रारण-सुरक्षा-उपस्कर
नरेंद्र गोळे, narendra.v.gole@gmail.com http://urjasval.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे. यापूर्वीचे लेख खालील दुव्यांवर वाचता येतील. http://www.misalpav.com/node/19593 प्रारणगाथा-६ पैकी १: प्रारणे आणि अणूची संरचना http://www.misalpav.com/node/19601 प्रारणगाथा-६ पैकी २: किरणोत्सार, विश्वकिरणे आणि मूलकीकरण http://www.misalpav.com/node/20047 प्रारणगाथा-६ पैकी ३: सर्वव्यापी किरणोत्सार .

Book traversal links for प्रारणगाथा-६ पैकी ५: किरणोत्साराची देखभाल

  • ‹ प्रारणगाथा-६ पैकी ४: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन
  • Up
  • प्रारणगाथा-६पैकी ६: प्रारण संवेदक उपकरणे ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माहिती

प्रतिक्रिया द्या
2627 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

वाचत आहे

पैसा
Sun, 12/11/2011 - 22:08 नवीन
खूप माहितीपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Sun, 01/08/2012 - 01:32 नवीन
सहमत! खूपच माहिती आणि बरेच नवीन मराठी प्रतिशब्द समजले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

नरेंद्र गोळे
Sun, 01/08/2012 - 06:11 नवीन
पैसा आणि विकास, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा