विरू दादा ..२१९...अभिनंदन....!!!

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
8 Dec 2011 - 7:04 pm
गाभा: 

विरू दादा चे अभिनंदन..!!

धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आज वेस्ट इंडिज विरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात विरेंद्र सेहवागने सचिन तेंडुलकरचा २०० धावांचा विक्रम आज मोडला. तुफान फटकेबाजी करत असलेला सेहवाग २१९ धावांवर बाद झाला आणि एक विश्वविक्रम घडला.

विश्वविक्रम केल्याबद्दल विरेंद्र सेहवागचे हार्दिक अभिनंदन..!!

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

8 Dec 2011 - 9:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

इतकं ऊत्साहीत होऊ नका...
अवं वळीव हाय तो.. कधीतरीच पडतो.... ;)

आपला तो सचिन, दुसर्‍याचा तो सेहवाग.
काय बरोबर ना?
:)

मोदक's picture

9 Dec 2011 - 12:07 am | मोदक

कितीही बेभरवश्याचा असला तरी टेस्ट आणि वन डे मध्ये (प्रत्येकी) ७५०० + रन जमवून आहे...

मोदक.

हो.. शहरात चालु आहे मॅच..
खुप वेळापासुन फटाके वाजत आहेत.

(इंदुरकर) यशवंत

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2011 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

आग आग सेहेवाग.... बिग बँग ऑफ दी क्रिकेट... शत्रु विरोधक धुळचारक क्षेपणास्त्र...

भारतीय क्रिकेट अघाडीच्या या पहिल्या फळीतल्या लढवय्या शूर सैनिकास
सलाम... :-)
सलाम... :-)
सलाम... :-)

अप्रतिम's picture

8 Dec 2011 - 11:15 pm | अप्रतिम

An Interesting Trivia :
Virender Sehwag Becomes The
First "Human" To Score A Double Century In ODI !
व्हाया फेसबुक.

प्रशांत's picture

8 Dec 2011 - 11:23 pm | प्रशांत

अभिनंदन....!

इन्दुसुता's picture

9 Dec 2011 - 6:20 am | इन्दुसुता

क्रिकेट मधले फारसे कळत नाही , तरी पण एक विक्रम ( चांगल्या अर्थाने ) झाला याचा आनंद आणि अभिमान वाटला.

लीलाधर's picture

9 Dec 2011 - 8:06 am | लीलाधर

त्रिवार अभिनंदन, या शुरवीर लढवय्या सैनिकास आम्हा भारतीयांचा सलाम.

एवढेच म्हणू शकतो,

वीरुचा गजर द्विशतकाचा झेंडा रोविला,

इंदूर ग्रामी द्विशतकाचा डाव त्याने मांडला,

बोला वीरुचा गजर द्विशतकाचा झेंडा रोविला ! :)

५० फक्त's picture

9 Dec 2011 - 8:14 am | ५० फक्त

जोरदार असहमती,

विक्रम , अभिनंदन ठिक पण कोणत्याही खेळाडुला सैनिक म्हणणं अजिबात पटत नाही, सैनिक असणं ही फार फार मोठी गोष्ट आहे ओ, पार श्रीशांत ते सचिन यापैकी कोणीही लढवय्या सोडा साधा चौकीदार सैनिक व्हायच्याही लायकीचे नाहीत, ते रक्त, तो पिंड वेगळाच असतो.

उगाचच फार फार मोठा सन्मान देउ नका.

हर्षदजी अहो पण आज हाच खेळाडू जरी असला तरीही तो भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आणि एका अर्थाने हे गौरवास्पद देखील आहे. आणि सैनिकी द्रुष्टीने जर पहाल तर आज सीमारेषेवर जे आहेत खरोखर आपल्या प्राणांची आहूती देत आहेत त्यांच्या विषयीही तेवढाच आदर आहे हो. कारण आज ते तीथे आहेत म्हणूनच आपण येथे आहोत.

प्रभो's picture

9 Dec 2011 - 10:28 am | प्रभो

असहमत आहे रे हर्षद मी तुझ्याशी.

अरे जर IAF सैनिकांनीच सचिन ला मानद ग्रुप कॅप्टनची पदवी दिली आहे, तर साधा चौकीदार सैनिक व्हायच्याही लायकीचे नाहीत असे आपण (तू/मी) म्हणू कसे शकतो ?? कपीलदेवही आर्मीमधे मानद लेफ्टनंट कर्नल आहे.

जे.पी.मॉर्गन's picture

9 Dec 2011 - 11:50 am | जे.पी.मॉर्गन

>>श्रीशांत ते सचिन यापैकी कोणीही लढवय्या सोडा साधा चौकीदार सैनिक व्हायच्याही लायकीचे नाहीत<<

हर्षद मित्रा.... काय रे ही तुलना केलीस? एक तर ही काही अ‍ॅपल टू अ‍ॅपल कम्पॅरिझन नाही. सैनिक असो वा सामान्य माणूस... त्याची देशभक्ती, त्याचा "पिंड" काय फक्त "गोळ्या मारणे / झेलणे" एवढ्या एकाच मापदंडावर ठरतात? मग युनिफॉर्म न घालणार्‍या कोणाचीच काही लायकी नाही की काय? इथे "सैनिकां"बद्दल काही बोलण्याचा प्रश्नच नाही. पण कधी एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा रोजचा "वर्क-आउट" बघितला आहेस? अरे एखादा शेतकरी शेतात काय राबत असेल असे हे लोकं राबतात. उन्हा तान्हात घाम गाळतात. अगदी सचिनसारख्या बारीक चणीच्या खेळाडूच्या अंगातही बैलासारखी ताकद असते जी नुसती स्टेरॉईड्स घेऊन अथवा एसी जिम मधे व्यायाम करून आलेली नसते. देशासाठी खेळण्यासाठी ह्या लोकांनी प्रचंड त्याग केलेला असतो. शिवाय खेळात तुम्हाला "रीटेक्स" मिळत नाहीत. १०-१५-२० वर्षं सातत्यानी आंतरराष्ट्रीय खेळ खेळणं हे काही खायचं काम नाही. शिवाय बाजूला हजारो लोकं तुमच्या नावानी ओरडत असताना तो खेळ "खेळ" राहात नाही. त्यासाठी ह्यांचं "टेंपरामेंट" काय मातीचं असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.

मी तर म्हणेन की गणवेषातल्या सैनिकांनंतर "सैनिक" म्हणवून घ्यायची कोणाची लायकी असेल तर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंचीच. प्रभोनी म्हटल्याप्रमाणे... स्वतः सैनिकदेखील जर ह्यांच्यामुळे प्रेरित होत असतील तर वीरूसारख्या खेळाडूला सैनिक म्हणणेच योग्य. आजवर फक्त आणि फक्त खेळाडूंनाच आपल्या सेनांकडून असे मानद सन्मान मिळालेले आहेत ह्याचं कारणच मुळी त्यांची जिद्द, जिगर, त्यांचे कष्ट... जे कुठल्याही सैनिकाइतकेच असतात. तुझा प्रतिसाद अजिबातच पटला नाही.

जे पी

श्रीरंग's picture

13 Dec 2011 - 11:31 am | श्रीरंग

"युनिफॉर्म न घालणार्‍या कोणाचीच काही लायकी नाही की काय?"

असा सूर आपल्याला वरील कोणत्या विधानात दिसला माहित नाही. सेहवागच्या खेळाची लायकी नाही वगैरे कोणीच म्हटलं नाहिये. पण म्हणून सैनिक वगैरे म्हणणं हे जरा अतीच होतंय.
शारिरिक/मानसिक तंदुरुस्ती या निकषांवर जरी खेळाडू सैनिकांच्या तोडीस तोड असतील, तरी एखाद्या सैनिकाची कामगिरी आणी एखाद्या खेळाडूची कामगिरी यात तुलना होऊच शकत नाही.
कॉमनवेल्थला जसा बीसीसीआय नी दुय्यम संघ पाठवला होता, त्याप्रमाणे एखाद्या युध्दात अप्रशिक्षित सैन्य पाठवता येईल काय??

पक पक पक's picture

9 Dec 2011 - 9:29 am | पक पक पक

वेस्ट इंडिज मधे भुकम्पाचा झटका, ऑस्ट्रेलियात सावधानतेचा इशारा.............सूनामी येत आहे.......

गोमटेश पाटिल's picture

9 Dec 2011 - 1:00 pm | गोमटेश पाटिल

,,, त्याच्या खेळीला अम्हा सर्वान्चा सलाम....