Skip to main content

परा काकांच्या पुस्तकाचे प्रदर्शन. कोण कोण येतंय?

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 08/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम पराकाकांचे अभिनंदन. ह्या पुस्तक प्रकाशन समारंभाला कोण कोण येताय? आणि कुठून? म्हणजे जमल्यास एकत्र जाता येता येईल. प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम) कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता

वाचने 5168
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

प्रकाशन झाल्यानंतरचा शिण घालवायचा काही कार्यक्रम आहे का?

In reply to by विनायक प्रभू

तो असेलच नक्की, पण त्याचे पैसे लेखक देणार आहेत असे घोषित केले तर दुपारी न जेवता येऊ हो ;-) (लेखकाऐवजी राज ठाकरे यांनी बिल भरले तरी आमची हरकत नाही)

मंदाकिनी येणार आहे का प्रकाशन सोहळ्यात? :-)

In reply to by दिपक

ज्यानं त्यानं आपली आपली मंदाकिनी निरखून नी पारखून घ्यायची असते असं कोणतरी काका कुठल्या तरी पुतण्याला सांगत असताना एका मास्तरने या वाक्याला दिलेलं अणुमोदण एका मुलग्यानं पाहिलं असं चोता दोन राजकुमारला बोलताबोलता बोलला . ;)

मी सद्ध्या ठाण्यातच आहे आणि देवदया नगरमधेच राहतोय. खरं तर आजच मी तिथे जाणार होतो. तुम्ही सगळे भेटणार असाल तर मी पण १० तारखेला हजर राहिन म्हणतो.

In reply to by गवि

पोखरण रोड १ व २ ला जोडणारा रस्ता.... शिवाई नगर येथून उजवीकडे. (गल्ली बोळात फिरणारा ठाणेकर) नितिन थत्ते

पराकाकांचे अभिनंदन !!................... नाही येवू शकत या कार्यक्रमाला.....क्षमस्व....... कारण रविवारी नगरपालिका निवडणूक आहे...जायाच मताला जायाच........