फक्त शिकले सवरलेलेच नाही, तर कित्येक अशिक्षीत, अर्धशिक्षीत कामगार देखील दूरच्या देशात नशीब काढायला जात असतात. भारतात असतांना कदाचित काही कष्टकरी कामगारांना संघटनांचे पाठबळ शोषणापासून वाचवीत असेल. पण पुष्क्ळदा बाहेर देशात अशा तळागाळातल्या कामगारांचे हित बघायला कुणीही नसते. काही लोक असे सहजपणे म्हणून जातील, "काम आणि कष्ट केल्याशिवाय का पैसा मिळतो?" हे जरी खरे असले, तरी पैसा फेकून माणसाचे यंत्र बनवता येते का? आणि त्यासाठी किती पैसा पुरेसा आहे?
काही पूर्णवेळ घरात रहाणार्या मेड्स कडून तर अशी अपेक्षा केली जाते की २४ तास ती आमच्या घरात रहाते म्हणजे जास्तीत जास्त काम घेऊन २४ तासाचा पैसा वसूल केला पाहीजे.
ह्या कवितेतून एका अनिवासी मोलकरणीची अशीच कोंडी दाखवायचा प्रयत्न केला आहे.
चाल- "पोर खाटेवर मृत्युच्याच द्वारा"
किंवा "गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या"
दूर सोडुनिया अंतरीची माया
आणि जमवाया कष्ट करुनी माया
आली आशेने कर्ज फेडवाया
मोलमजुरीने भूक भागवाया
तिथे घरटे चिमुकले सुबक छान
असे पुढती पसरले माळरान
पक्षी करती किलबील गोड गान
आठवीता हरपले तिचे भान
क्षणी जागी होऊन हडबडूनी
आणि सार्या कामास निस्तरूनी
जरा बसली क्षण चार विसावूनी
तोच आली मा.लकीण तरवरूनी
काम सोडुन का बैसलीस स्वस्थ?
दाम मोजतसे तुला सढळ हस्त
सर्व मेडची या कामचोर फक्त
नाही यांना नौकरी प्रती शिस्त
बाई जेवण ते पूर्ण मी बनवले
केर काढूनी ओटेही स्वच्छ धुतले
जरा दोन क्षण शांतसे मिळाले
सुरू करते मी काम जेही उरले
चाल - कठीण समय येता कोण कामास येतो.
संपली सर्व कामे तरी विसावा मिळेना
सवकली म्हणे मेड ती कामही करेना
गर्जली मालकीण कण काम कमी होना
पिळून तिला पूर्ण धन वसूली हवी ना?
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5594
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वावा!
विडंबन ????
In reply to वावा! by बेसनलाडू
मलाही हेच म्हणायचे आहे
In reply to विडंबन ???? by आनंदयात्री
खुलासा | क्षमस्व
In reply to मलाही हेच म्हणायचे आहे by अरुण मनोहर
तीव्र आक्षेप...!
In reply to वावा! by बेसनलाडू
वैयक्तिकच
In reply to तीव्र आक्षेप...! by विसोबा खेचर
आमचं मत तुम्हालाच........
In reply to तीव्र आक्षेप...! by विसोबा खेचर
सुरेख....
वा! छानच आहे हो!!
परिस्थिती..
हे विडंबन नसावे...
हे असं आहे
अमेरिकेचे माहित नाही
In reply to हे असं आहे by मन
अमेरिकेत कोणतीही
In reply to अमेरिकेचे माहित नाही by अरुण मनोहर
सुंदर..!
कविता सुंदर आहे!
मोलकरणीचे मनोगत...
आभार
सुरेख कविता