✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आवाहन: मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती?

A
amit_m यांनी
Wed, 11/30/2011 - 14:46  ·  लेख
लेख
मराठीतील वाचनीय पुस्तके कोणती? पुस्तकांबद्दल योग्य माहिती नसल्याने महाजालावर पुस्तके खरेदी करताना खुपदा गोंधळ होतो. जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे. कथासंग्रह, अनुवादित, कादंबरी, ललित, चरित्र-आत्मचरित्र, अनुवादित ई. प्रकार चालतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26383 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

..........?

रानी १३
Wed, 11/30/2011 - 15:00 नवीन
तुमचे वय काय ? नाही म्हनजे तसे पुस्तके सन्गितलि जातिल .....(ह.घ्या.);)
  • Log in or register to post comments

+१

टवाळ कार्टा
Wed, 11/30/2011 - 23:08 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानी १३

अमितराव,

किसन शिंदे
Wed, 11/30/2011 - 15:05 नवीन
विरोप्याचा पत्ता द्या. आमच्या 'शब्दयात्री' पुस्तक भिषीची आख्खी यादीच पाठवून देतो, सगळीच वाचून काढा. :)
  • Log in or register to post comments

ही

गवि
Wed, 11/30/2011 - 15:12 नवीन
१) शाळा २) शाळा ३) शाळा ४) शाळा ५) शाळा ही पुस्तकं आधी वाचून पहा.. तोसवर आणखी कळवतो.
  • Log in or register to post comments

तुम्हाला कोणत्या विषयांच्या

जागु
Wed, 11/30/2011 - 15:16 नवीन
तुम्हाला कोणत्या विषयांच्या पुस्तकांत रस आहे म्हणजे रहस्य कथा, वैचारीक पुस्तके, निसर्गमय पुस्तके ?
  • Log in or register to post comments

कोणतेही प्रकार चालतील...

amit_m
Wed, 11/30/2011 - 17:11 नवीन
कोणतेही प्रकार चालतील... रहस्य कथांना प्राधान्य :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

रहस्यकथा?

धमाल मुलगा
Wed, 11/30/2011 - 18:30 नवीन
मराठीत रहस्यकथा वाचायच्या म्हणताय आणि ठौक नाय कोणती वाचावीत? ला हौल विलाकुवत! सुहास शिरवळकर बाबा कदम शरश्चंद्र वाळिंबे विजय देवधर (ह्यांनी केलेली अनुवादित) ह्या लेखकांची पुस्तकं घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit_m

हात तुमच्या!

आनंदी गोपाळ
गुरुवार, 12/01/2011 - 21:24 नवीन
गुरुनाथ नाईक कुठे गेले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अर्रर्रर्र....

धमाल मुलगा
Fri, 12/02/2011 - 11:20 नवीन
गुरुनाथ नाईकांना कसा काय विसरलो बरं? च्च च्च च्च्च.... मेजर अविनाश भोसले, कॅप्टन दीप, मारिया लोबो, हवालदार जंगम, शेख सगळी क्यारेक्टरं कशी वाचता वाचता नजरेसमोर उभी रहायची. :) गुरुनाथ नाईकांचं 'मंतरलेलं चिलखत' नावाचं एक लै भारी पुस्तक आलं होतं. फार पुर्वी वाचलं होतं..उत्खननाच्या पार्श्वभूमीवर भुताटकीची ष्टुरी होती ती. मिळतंय काय ते अजुन? :) आठवण करुन दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे हो गोपाळराव. अवांतरः आता श्रीकांत सिनकर वगैरे यादी नका बुवा काढायला लाऊ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अनुवादित

चिंतामणी
Fri, 12/02/2011 - 14:31 नवीन
रवीन्द्र गुर्जर यांची "अनुवादित" पुस्तके छान आहेत. उदा. पॅपीलॉन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

रहस्य कथांना प्राधान्य ?

आत्मशून्य
Wed, 11/30/2011 - 22:56 नवीन
रहस्य कथा लेखक अल-स्टॅनले गार्डनर याचा जगप्रसिध्द मानस पूत्र पेरी मेसन च्या अनूवादीत कथांपासून वाचयला सूरूवात करा. हा व्यवसायाने वकील आहे पण गून्हा केवळ हूडकत नाही तर तो कोर्टात सबळ पूराव्याने सिध्दही करतो. याच्या प्रत्येक कथेचा शेवट कोर्टातच होतो. मतीगूंग करणारे व शेवट्पर्यंत खिळवून ठेवणारे कथानक व अत्यंत तर्कशूध्द व अचूक रहस्यभेद ज्याचा शेवट कायम कोर्टामधे न्यायाधिशांसमोरच होणार. जबर्दस्त कोर्टरूम ह्यूमर , दोन वकीलातील स्पर्धा, पोलिसांशी स्पर्धा वगैरे वगैरे.. एकदम सॉलीड स्टार्टर (ह्याचा मेन्कोर कधी घडला कळणारही नाही). बर्‍याच नामवंत अनूवादकांनी याच्या पूस्तकांचे अनूवाद केलेत लाब्ररीत जा व पेरी मेसन एव्हडच नाव घ्या..... महत्वाचं :- याच्या पूस्ताकांसोबत जेम्स हॅडली चेस नावाच्या लेखकाची अत्यंत रद्दड व चिप कथानक/ प्रसंग असलेली व महत्वाचे म्हणजे अत्यंत टूकार रहस्य असलेली पूस्तके माथी मारायची काही लाब्ररीवाल्यांची जाम वाइट खोड आहे, तेव्हा या नालायक जेम्स हॅडली चेस पासून ४ हात लांब रहा बरका.. याच्या कथात रहस्यमय काय आहे याचे कदाचीत उत्तर मेल्या नंतरही आपल्याला भेटत नसल्याने याला रहस्य कथा लेखक म्हटले गेले असावे. "हैदोस" वगैरे पूस्तकातील कथांचे प्लॉट/वर्णनही सॉलीड भासतील इतकं टूकार ह्याचं कथा लेखन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit_m

हे काय पटलं नाय ब्वा. आम्हाला

प्रचेतस
गुरुवार, 12/01/2011 - 21:55 नवीन
हे काय पटलं नाय ब्वा. आम्हाला पेरी मेसन टुकार वाटतो आणि जेम्स हॅडली चेस भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

सखाराम गटणे...

मी-सौरभ
Wed, 11/30/2011 - 15:16 नवीन
यांणी पुनर्जन्म घेतला म्हणायचा...
  • Log in or register to post comments

सध्या मी माझा व्यासंग

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 15:57 नवीन
सध्या मी माझा व्यासंग वाढवतोय!! --- सखाराम गटणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हैदोस

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 15:22 नवीन
रंभा उनाड मैना मस्ताराम चावट राघू धिंगाणा .... ही झाली की पुढची सांगतो.
  • Log in or register to post comments

प्र का टा आ

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 15:57 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पहा पहा.. "वाईट मनावर कोवळे

गवि
Wed, 11/30/2011 - 15:57 नवीन
पहा पहा.. "वाईट मनावर कोवळे संस्कार" चं उदाहरण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 16:03 नवीन
गविशेठ आयुष्यात शेवटी मी दिलेली पुस्तकेच कामाला येणार आहेत. ह्यालाच्य व्यावसायाभीमुख शिक्षण म्हणतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुस्तके कामाला येणार हे पटले

गवि
Wed, 11/30/2011 - 16:08 नवीन
पुस्तके कामाला येणार हे पटले पण मराठी अर्थाने की संस्कृत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फोन करून सांगतो

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 16:13 नवीन
उगाच तुमच्या शेजारी बसणार्‍या टंचनिकेचा आमच्याविषयी गैरसमज नको. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शेजारी?? असो..

गवि
Wed, 11/30/2011 - 16:23 नवीन
शेजारी?? असो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

व्यावसायाभीमुख शिक्षण

मृत्युन्जय
गुरुवार, 12/01/2011 - 12:07 नवीन
व्यावसायाभीमुख शिक्षण व्यवसाय काय आहे नक्की त्यांचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

असतील तर मला दे

टवाळ कार्टा
Wed, 11/30/2011 - 23:10 नवीन
असतील तर मला दे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मला आवडलेली काही पुस्तके

तर्री
Wed, 11/30/2011 - 15:52 नवीन
१ . पाडस : राम पटवर्धनांनी केलेला एका एंग्रजी कादंबरीचा अनुवाद . मूळ लेखकाचे नाव आठवत नाही. २.रथचक्र : श्री. ना.पेंडसे याची गाजलेली व ऊत्तम कादंबरी . ३.धर्मानंद : जयवंत दळवीं ची झकास कलाकृती / कादंबरी. ४.ठणठणपाळ : जयवंत दळवींचे विनोदी लेखन. ५.रारंग ढांग : प्रभाकर पेंढारकरांची ऊत्तम कादंबरी. ६. पुरुष : जयवंत दळवींचे नाटक ( नाटक "वाचण्यात" वेगळा मजा आहे ) ७. पानिपत : विश्वास पाटील याची ऐतिहासिक कादंबरी. ८. आहे मनोहर तरी : सुनिताबाईंचे आत्मचरित्र. ९. बनगरवाडी : व्यंकटेश माडगुळरांची एक विगळीच वस्तु. ( कादंबरी ) १०. अ‍ॅडम : रत्नाकर मतकरींची ( अ‍ॅड्ल्ट ) कादंबरी . पटकन आठवली ती लिहीली आहेत. पु.ल. चे "मुद्दाम" नाही लिहेलेले. सानिया ह्या लेखिकेच्या कथा ही छान असतात. भैरप्पांची , ऊमा कुळकर्णी नी अनुवादित केलेली साहित्य संपदा परमप्रिय. नेमसेक : झुंपा लाहिरीची कादंवरी जरूर वाचावी अशी . आणि हो , कॅलिडोस्कोप : अच्युत बर्वे : ही कादंबरी वाचाच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

amit_m
Wed, 11/30/2011 - 17:18 नवीन
यातील दोन-तीन पुस्तके वाचलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

बरं

मी-सौरभ
गुरुवार, 12/01/2011 - 00:10 नवीन
मग आता उरलेली वाचा आणि समालोचन व्यनी करा त्यांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: amit_m

जी ए कुल्कर्णी

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 15:58 नवीन
जी ए कुल्कर्णी ची पिंगळावेळ सांजशकुन काजळमाया हिरवे रावे
  • Log in or register to post comments

शामची आई

सर्वसाक्षी
Wed, 11/30/2011 - 16:06 नवीन
अवश्य वाचा.
  • Log in or register to post comments

या इथेच मिपावर रामदास काकांचे

गणपा
Wed, 11/30/2011 - 16:10 नवीन
या इथेच मिपावर रामदास काकांचे लेखन वाचले आहे काय? आणि कुणाला भेटच द्यायचं असेल तर ही लिंक फोर्वडही करु शकता. :)
  • Log in or register to post comments

+१

किसन शिंदे
Wed, 11/30/2011 - 16:21 नवीन
रामदास काकांच लेखन अवश्य वाचा.
  • Log in or register to post comments

शशी भागवत

sagarpdy
Wed, 11/30/2011 - 17:26 नवीन
शशी भागवतांच्या कादंबऱ्या खूप चांगल्या आहेत असे ऐकले. त्यातील एक 'मर्मभेद' हि वाचली आहे. अतिशय सुंदर रहस्यकथा ! पण दुर्मिळ आहेत हि तीनही पुस्तके.
  • Log in or register to post comments

होय

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 18:05 नवीन
सुंदर लिहितात ते १. रत्न प्रतिमा २. रक्त रेखा ३. मर्म भेद शिवाय वीर धवल, कलिकामुर्ती इत्यादी पुस्तके पण छान आहेत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

शशि भागवत....

धमाल मुलगा
Wed, 11/30/2011 - 18:23 नवीन
दोस्ताहो, शशि भागवतांची जमतील तेव्हढी पुस्तकं हवी आहेत मला. जो कोणी मिळवून देऊ शकेल त्याचा मी आजन्म ॠणी राहीन रे. :) फार शोधलं, नाहीच सापडत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सापडतील

sagarpdy
गुरुवार, 12/01/2011 - 11:22 नवीन
मीही उभा अप्पा बळवंत पालथा घातला - नाही मिळाली. नंतर majestic प्रकाशन ची प्रेस शोधली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हि पुस्तके अजूनही साधारण सहा महिन्याच्या कालावधीत एकदा प्रकाशित होतात. सध्याचा साठा संपला असल्याने मला पुस्तके मिळू शकली नाहीत. पुढच्या प्रकाशनाच्या वेळी बघू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

क्या बात है!

धमाल मुलगा
गुरुवार, 12/01/2011 - 11:49 नवीन
भली मोलाची माहिती दिलीत द्येवा. :) मी तर आप्पा बळवंत चौक सोडाच, आठवले काकांकडंही पाहून आलो. जुनी, रद्दीत घातलेलीही नाही मिळत म्हणाले. हे मॅजेस्टिकचं एक बरं सांगितलंत. आता लक्ष ठेऊन राहतो. मला कळालं तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला मिळत असतील तर मला कळवा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

धम्या मलाही रडारवर ठेव रे.

मृत्युन्जय
गुरुवार, 12/01/2011 - 12:18 नवीन
धम्या मलाही रडारवर ठेव रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आधी मराठी संस्थळांवरचं लेखन

५० फक्त
Wed, 11/30/2011 - 17:54 नवीन
आधी मराठी संस्थळांवरचं लेखन वाचुन पचवुन दाखवा मग बघु पुस्तकांचं.
  • Log in or register to post comments

हा हा हा हा !

सुहास..
Wed, 11/30/2011 - 17:56 नवीन
आधी मराठी संस्थळांवरचं लेखन वाचुन पचवुन दाखवा मग बघु पुस्तकांचं. छ्या ! अशी संस्थळावरील लेखकांची हेटाई पाहुन डोळे पाणावले ;)
  • Log in or register to post comments

इथे लेखकाना निगरगट्ट बनविले

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 18:43 नवीन
इथे लेखकाना निगरगट्ट बनविले जाते तसेच त्यांच्यावर गेंड्याच्या कातडीचे अस्तर पांघरले जाते
  • Log in or register to post comments

हॅरी पॉटरचे सात मराठी भाग

JAGOMOHANPYARE
Wed, 11/30/2011 - 19:16 नवीन
हॅरी पॉटरचे सात मराठी भाग
  • Log in or register to post comments

हॅरी

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 11/30/2011 - 20:14 नवीन
हॅरी पॉटर मराठीमध्ये वाचायचे म्हणजे, मराठी येत असून सुद्धा पु. ल. तामीळ मध्ये वाचण्यापैकी झाले. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

खुप आहेत

सुनिल पाटकर
Wed, 11/30/2011 - 23:11 नवीन
कादंबरी श्यामची आई - साने गुरुजी रणांगण - विश्राम बेडेकर बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर ययाती - वि. स. खांडेकर कोसला - भालचंद्र नेमाडे मृत्युंजय - शिवाजी सावंत पार्टनर - व. पु. काळे श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई तुंबाडचे खोत, गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे शहेनशहा - ना. सं. इनामदार धग - उद्धव ज. शेळके नॉट विदाऊट माय डॉटर - बेट्टी महमूदी कथा चिमणरावांचे चर्‍हाट - चिं. वि. जोशी कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ काजळमाया - जी. ए. कुलकर्णी चरित्रे/आत्मचरित्रे स्मृति-चित्रे - अक्ष्मीबाई टिळक बलुतं - दया पवार . आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे आमचा बाप आन आम्ही - नरेंद्र जाधव रातवा - चंद्रकुमार नलगे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - महात्मा गांधी भोगले जे दु:ख त्याला ... आशा आपराद मी वनवासी -सिंधूताई सपकाळ संकीर्ण व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे माणसं - अनिल अवचट ........... द पेलिकन ब्रीफ : जॉन ग्रिशॅम द काइट रनर - खालीद हुसैनी गार्गी अजून जिवंत आहे - मंगला आठलेकर
  • Log in or register to post comments

यांच्यापैकी १९८५ नंतर प्रकाशित झालेली कोणती?

आनंदी गोपाळ
गुरुवार, 12/01/2011 - 21:29 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनिल पाटकर

बटाट्याची चाळ... पु.ल.

टवाळ कार्टा
Wed, 11/30/2011 - 23:16 नवीन
बटाट्याची चाळ... पु.ल. व्यक्ती आणि वल्ली...पु.ल. पु.लं.चे कोणतेही पुस्तक अनुदिनी...दिलिप प्रभावळकर
  • Log in or register to post comments

हेतू काहीही असला तरी चर्चा तर

आशु जोग
Wed, 11/30/2011 - 23:35 नवीन
हेतू काहीही असला तरी चर्चा तर होतेय
  • Log in or register to post comments

तुम्हाला खरंच माहिती नाही?

पैसा
Wed, 11/30/2011 - 23:41 नवीन
असो. सध्या http://www.pustakvishwa.com/ इथे जाऊन जमेल तितकं वाचा. आपोआप पुस्तकांबद्दल माहिती होत जाईल.
  • Log in or register to post comments

तुम्ही पण या की

सागर
Mon, 01/23/2012 - 16:50 नवीन
ज्योति ताई आधी तुम्ही हजेरी लावा की तिथे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

१)विद्रोही

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/01/2011 - 00:05 नवीन
१)विद्रोही तुकाराम>>>डॉ.आ.ह.साळुंखे...हे पुस्तक म्हणजे तुकाराम महाराजांचे खरेखुरे जीवनकार्य काय याची पूर्ण माहीती तर देतेच,शिवाय तुकारामां विषयीच्या सर्व वादग्रस्त मुद्यांचा अतिशय यथायोग्य परामर्श यात घेतला गेलाय २)छत्रपती शिवाजी महाराज-जीवन रहस्य>>> नरहर कुरुंदकर...शिवाजी महाराजांवर आजपर्यंत अनेक ग्रंथ/पुस्तके,नाटके,चित्रपट तयार झालेले आहेत.या पुढेही होतील.पण या ४० पानी छोट्या पुस्तका सारखे दुसरे एकही इतके उत्तम पुस्तक माझ्या पहाण्यात आले नाही.हे पुस्तक वाचल्यावर तर माझं असं मत झालय,की शिवाजी विषयीची इतर सर्व पुस्तक वाचली/नाही वाचली तरी,हे पुस्तक चुकवलं तर खरा शिवाजी आपल्याला कधी कळणारच नाही...कारण महाराज युगप्रवर्तक होते म्हणजे काय होते?...रयतेचे राजे होते म्हणजे रयतेनी या माणसाला खरोखरच आपले का मानले?इश्वरी अवतार का मानले? ...भारताच्या समग्र इतिहासात शिवाजी सारख स्थान जनतेनी इतर कुणालाही का दिलं नाही? त्याच्या हयातीत आणी निधना नंतरही शत्रुकडुन वट्याला येणारे सगळे भोग/हालापेष्टा/छळ हे सोसुनही सगळी जनता एक दिलाने या माणसाच्या मागे अखंड का बर उभी राहीली? नक्की काय रहस्य आहे या विभुतीच? या आणी अश्या सर्व प्रश्नांच परिपूर्ण आकलन घडण्यासाठी/होण्यासाठी हे पुस्तक वाचलच पाहिजे असं आहे..हे नक्की
  • Log in or register to post comments

आवश्या वाचा

वरुण मोहिते
गुरुवार, 12/01/2011 - 00:20 नवीन
प्रकाशाची सावली- दिनकर जोशी,अनुवाद- स्मिता भागवत. स्वामी-रनजीत देसाई झोंबी-आनन्द यादव हुतात्मा- मीना देशपाण्डॅ एका दिशेचा शोध- सन्दीप वासलेकर हेडहन्टर- गिरिस टिळक खुप आहेत आजुन् मला नीट टन्कता येत नाइ....व्यनी करा... ईन्ग्रजी आनी मराठी खुप सान्गेन
  • Log in or register to post comments

मराठी

सचिन भालेकर
गुरुवार, 12/01/2011 - 01:10 नवीन
मराठी तल प्रत्येक पुस्तक हे वाचन्यासाठी अप्रतिमच असत................... :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा