सूर्याची जरा अधिकच फाकलेली किरणं.
जणू सुटकेच्या प्रयत्नात.
पण ब-याचदा ती समाधानी दिसतात
कैदेतल माफक स्वातंत्र्य उपभोगताना
उमटत जातात खुणा कधी कधी त्यांच्या बंडाच्या
प्रकाशाच्या सावल्या जशा,
आणि मग संध्याकाळी घाई घाईने ती गोळा करतात सगळ्या सावल्या
आणि बांधून नेतात पुन्हा ,
नकोच पुरावा त्यांच्या बंडाचा, किंवा साध्या कुजबुजण्याचा सुद्धा.
त्या सगळ्या सगळ्या सावल्यांमध्ये माझी सुद्धा सावली दिसते
माझ्यातून फाकलेल्या धगधगणा-या, पोळलेल्या, किरणांसकट
तेव्हा समजते निरर्थक धडपड,
किरणांची नव्हे तर सूर्याची
स्वतःपासून सुटण्याची!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1300
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
तेव्हा समजते निरर्थक
आभार. गगन्विहरि च गवि कधि
In reply to तेव्हा समजते निरर्थक by गवि
अफाट!!
आभारी आहे. लोभ असु द्या.
In reply to अफाट!! by मिसळलेला काव्यप्रेमी
कविता दोन-तीनदा वाचली पण अजून
नमस्कार निरन्जन आभार. प्रयत्न
In reply to कविता दोन-तीनदा वाचली पण अजून by नगरीनिरंजन