बनाना लीफ ग्रीन चिकन

गणपा's picture
गणपा in पाककृती
26 Nov 2011 - 10:26 pm

राम राम मंडळी.
दिवाळीच्या सुट्टी नंतर आमची ही पहिली पाककृती.
महिनाभर आयतच गिळायला मिळत होतं. त्यामुळे किचनकडे जास्त फिरकण्याची गरज पडली नाही.
आता परत येरे माझ्या मागल्या.

आज ग्रीन मसाला चिकन बनवलं होते. चांगलं लागल. मग म्हटलं तुम्हा सोबत शेअर करावं.
फार काही कटकटीचं नाही.

४-५ मोठे चमचे हिरवं वाटण. (यात भरपूर कोथिंबीर + ४-५ हिरव्या मिरच्या + ४-५ पाकळ्या लसुण + १" आलं + एका लिंबाचा रस.)
१/२ चमचा हळद.
२ चमचे मसाला.
२ चमचे ऑलिव्हचं तेल.
मीठ चवी नुसार.
एका लिंबाचा रस.

१/२ ते ३/४ किलो चिकन.

चिकन स्वच्छ धुवून चाळणीत ठेऊन निथळवून घ्यावं. त्यात हळद, मसाला, मीठ आणि वाटण टाकुन चांगले एकत्र करुन घ्यावं.

केळ्याच्या पानात वरील मसाला लावलेले चिकन गुंडाळुन, बेकिंगच्या भांड्यात ठेवावं.
वरुन अ‍ॅल्युमिनीयमची फॉईल लावून हवाबंद करावं.
ओव्हन २५० ते २७५° C वर ठेउन ४० ते ४५ मीनिटे शिजवावे,

४० ते ४५ मीनिटां नंरत अ‍ॅल्युमिनीयम फॉईल आणि केळीची पानं काढून अजुन ८-१० मिनिटे ग्रील मोड वर शिजवावं.

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

26 Nov 2011 - 10:30 pm | श्रावण मोडक

नुसतं पाहूनच तोंड ओलं झालं. पण त्या ओलाव्यानं आणखी काही मागितलं. तर, यासोबत काय घ्यावं?

गणपा's picture

26 Nov 2011 - 10:34 pm | गणपा

मालक या की. सगळी सोय आहे आपल्या कडं ;)

नावातकायआहे's picture

26 Nov 2011 - 10:48 pm | नावातकायआहे

तिकट पाठवा...श्रामो सायबांबरोबर येतो बनाना लीफ ग्रीन चिकन खायला... :-)

:) :-) :smile:

जागुतैनं मला मत्स्याहारी बनवलंय (अजून मांडे मनातच आहेत).
आता तू मला पूर्णपणे मौसाहारी ;) बनवणार.
निषेध!

गणपाशेठ कुठं राहायला आहे आपण? सध्या माझा रुममेट गेलाय गावाला!! ;)
काय एक एक पाककृती दाखवता राव? तुमचा फॅन झालोय!!

वाहीदा's picture

26 Nov 2011 - 11:15 pm | वाहीदा

असंच हळदीच्या पानावर केलं तर चवीला वेगळी लागेल का रे गणपा भाऊ ?

नक्कीच.
केळीच्या पानाचा स्वाद जसा चिकनमध्ये उतरतो, तसाच हळदीच्या पानाचाही उतरेल.

पैसा's picture

26 Nov 2011 - 11:27 pm | पैसा

पाकृ १ नंबर, आणि फोटो १ नंबर.

सगळ्याच पानांमुळे कोणत्याही पदार्थाला खास स्वाद येतो. आत्ता आईने केलेल्या पानग्या, हळदीच्या पानातल्या पातोळ्या, कारवारी मैत्रिणीने केलेल्या फणसाच्या पानाच्या द्रोणातल्या इडल्या (खॉट्ट) सगळं सगळं आठवलं.

आफ्रिकेत केळीची पानं भरपूर मिळतात वाट्टं?

मेघवेडा's picture

28 Nov 2011 - 7:14 pm | मेघवेडा

चिकन बघून गोंयकारणीस पानग्या, पातोळ्या नि इडल्या आठवाव्यात? काय नाय तर नुस्ते तरी गे?

पैसा's picture

28 Nov 2011 - 7:22 pm | पैसा

काय आठवणार कप्पाळ? हां हळदीच्या पनातल्या बांगड्याचं कौतुक बरंच ऐकलंय, पण खाल्ला नाही तर कसं आठवणार? ;)

पिवळा डांबिस's picture

29 Nov 2011 - 4:37 am | पिवळा डांबिस

हळदीच्या पानातल्या बांगड्याचं कौतुक बरंच ऐकलंय,
हळदीच्या पानातला बांगडा छान लागतो हे खरंच, पण त्यापेक्षा हळदीच्या पानातले पेडवे!!!
वा!! अगदी पितर (माझे) स्वर्गात जातात!!

बाकी गणपाशेठ, ही डिश झकास जमलीये!
आवडली. बकार्डीबरोबर चखणा म्हणुनही उत्तम होईल!!
:)

चिंतामणी's picture

27 Nov 2011 - 12:23 am | चिंतामणी

नुसते फटु आणि पाकृ टाकुन अत्याचार करण्याबद्दल निषेढ.
प्रत्यक्ष भेटीत अश्या काही गोष्टी खायल्या दिल्यानंतर अभीप्राय देण्य़ात येइल याची नोंद घेणे.

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 1:15 am | प्रभाकर पेठकर

भन्नाट दिसते आहे पाककृती. केळीच्या पानाचा वास आणि स्वाद, कोंबडीच्या बलिदानाचे सार्थक करणारा असणार ह्यात शंका नाही. अभिनंदन .

केळीच्या पानांचा संयोग गरम अन्नाशी झाला की एक विशिष्ट प्रकारचे एन्झाईम्स त्या अन्नात मिसळतात आणि अन्न पचण्यास मदत होते. म्हणूनच आपल्याकडे केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2011 - 2:26 am | अत्रुप्त आत्मा

पुन्हा एक कोंबडी जन्म मरणाच्या दुर्धर फेय्रातुन कायमची सुटली... :-D

मोक्ष..मोक्ष म्हणतात तो हाच असावा... ;-)

शाकाहारींची फारच पंचाईत होईल तुमच्याकडे. कायतरी गोडधोड टाका आता.

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

काय पाषाणभेद साहेब,

कायतरी गोडधोड टाका आता.

ह्याच्याच खाली मधुमेहा विरुद्ध लढा वाचून अंमळ हसू आले.

पाषाणभेद's picture

28 Nov 2011 - 7:15 pm | पाषाणभेद

अरे! विनोद मोठ्ठाच झालाय!!!

पन काय हाये ते मच्छी मटान काय चालत न्हाय आमास्नी, म्हून म्हटलं का कायतरी गोडधोड व्हवून जावूंद्या.

सन्जोप राव's picture

27 Nov 2011 - 5:33 am | सन्जोप राव

अशी बाळबोध प्रतिक्रिया टाकावी म्हणतो. बाकी सगळे म्हणून झाले आहे.

सुहास झेले's picture

27 Nov 2011 - 5:53 am | सुहास झेले

जबरदस्त रेसीपी... कीबोर्ड ओला झाला ;)

गणपा रॉक्स :) :)

ओव्हन नसेल तर काय कराव बा ??

गणपा's picture

27 Nov 2011 - 2:57 pm | गणपा

ओव्हन नसेल तर फ्राइंग पॅनमध्ये मंद आचेवर पानात गुंडाळुन आणि वर झाकण ठेउन शिजवाव.

खादाड's picture

28 Nov 2011 - 5:13 pm | खादाड

बनवुन बघतो आणि कळवतो !!

सानिकास्वप्निल's picture

27 Nov 2011 - 4:37 pm | सानिकास्वप्निल

आतातर काही बोलायलाच नको गणपाभौ :)
तुम्ही आणी तुमच्या पाकृ +१ :)

५० फक्त's picture

28 Nov 2011 - 11:08 am | ५० फक्त

सानिकातैचा हा प्रतिसाद महणजे

हे म्हणजे, द्रविडनं लक्ष्मणला, ' येन्ना, इदै परम सुंदर कवर ड्राइव, यन्ना रासक्ला माईंड्ड्ड्ड इट्ट्ट' असं म्हणण्यासारखं आहे,

माझ्या डोळ्यासमोर, पहिल्या दोन बॉलवर सचिननं चौकार मारुन, सेहवागला स्ट्राईक द्यावी अन मग त्यानं दोन षटकार खेचल्यावर पिचच्या मध्ये येउन हातावर हात मारावे असं द्रुश्य आलं.

तुम्ही दोघं असंच करता आमच्या बरोबर, म्हणजे मांसाहारी लाळ गाळतात, त्यांचा जीव जातो, त्या बॉलरसारखा जो जीव तोडुन बॉलिंग करतो, पण आम्ही शाकाहारी मिडऑफच्या फिल्डरसारखे हातावर हात ठेवुन बघत उभे असतो उन्हात, बिचारे.

असो, अवांतर फार झालं, याच प्रकारानं बटाटे, रताळे आणि वांगे शिजवुन खाल्ले जातील, पिवळं वरण भातासोबत.

बटाटा आणि फ्लॉवरचे तुकडे असे शिजवून खाणार.

मी-सौरभ's picture

27 Nov 2011 - 8:09 pm | मी-सौरभ

त्यापेक्षा पनीर किंवा सोयाबीन ट्राय करा की ;)

गणपा भौ: मी बोल्लो ती बात सच्ची की नाय??????

अविनाशकुलकर्णी's picture

27 Nov 2011 - 6:18 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त..

सोबत टिचर हवि.....

एक तिचा घोट ......व साथिला भाऊंचेी चिकन,,,

चिंतामणी's picture

28 Nov 2011 - 7:09 pm | चिंतामणी

सोबत टिचर हवि..... :O :-O :shock:

एक तिचा घोट .....व साथिला भाऊंचेी चिकन,,,

काका, एकावेळी किती जिवांशी खेळणार;) ;-) :wink:

स्वाती२'s picture

28 Nov 2011 - 6:28 pm | स्वाती२

नेहमीप्रमाणेच झकास पाकृ!

विनायक प्रभू's picture

28 Nov 2011 - 6:35 pm | विनायक प्रभू

पाकृ.
गणपा किचनच्या ड्युटीत नसतो तेंव्हा काय करतो म्हणे?

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2011 - 6:59 pm | प्रभाकर पेठकर

मिपावर पाकृ टंकित असतो.

व्यक्तीगत प्रश्ण... पास. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2011 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, थकलो भो मी गंपाचं कौतुक करुन. प्रतिक्रियेत कोणते शब्द काय टाकावेत म्हणजे गंपापर्यंत भावना पोहचतील आणि गंपाला आनंद वाटेल. काही कळत नाही. शब्दांचा पार चोथा झालाय. गंपाशेठ, तुमच्या प्रत्येक पाकृतीला माझा मस्त, बेष्ट,झकास, खल्लास, मेलो, असा प्रतिसाद आहेच असे समजत चला.

कधी औरंगाबादला आलात तर तुमच्या कोणत्याही पाकृतीशिवाय केवळ तुमच्यासोबत दोन शब्द बोलता यावेत, तुमची ग्रेट भेट व्हावी म्हणून बीबीका मकबरा, पानचक्की, दौलताबाद, वेरुळ, आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे तुम्हाला फिरवून आणीन. :) अजून काय बोलू !

-दिलीप बिरुटे

डॉक भापो.
असलं आमिष दाखवताय की आताच बॅगा भराव्याश्या वाटु लागलय. :)

सगळ्यां प्रेमळ प्रतिसादांबद्दल मंडळ दिल्से आभारी हय.

दिपक पाटील's picture

28 Nov 2011 - 8:55 pm | दिपक पाटील

गणपा भाऊ,
तोंडाला खूप पाणी सुटल, रविवारचा बेत ठरला.
पण इथे मिर्ची मिळत नाही. केळीच पान तर मुळिच नाही. (असही, आई केळिच्या पानात मांसाहार करू देत नाही)
काही तरी मधला मार्ग सुचवा की.
वाट बघतोय.....

पाटीलसाहेब

पण इथे मिर्ची मिळत नाही. केळीच पान तर मुळिच नाही.
काही तरी मधला मार्ग सुचवा की.

अरे अश्या कुठल्या दुर्गम भागात रहात आहात तुम्ही की जिथे मिर्ची मिळत नाही?
असो मिर्ची नसेल तर वाटण मिरची शिवाय करा.

तिखट पणासाठी वरुन मसाला/लाल तिखटं (मिळत असल्यास) अथवा काळीमिरी पूड वापरा.

केळीच्या पानाला पर्याय म्हणाल तर हळदीची पानं, ती नसतील तर कर्दळीची ही चालतील.

केळीच्या पानात मांसाहार करू न देण्याची कारणे आईला विचारून देऊ शकाल काय?
आमच्या इथे तर पूर्वापार ही पद्धत चालू आहे.

sarita jadhav's picture

29 Nov 2011 - 11:12 am | sarita jadhav

nice.........

जाई.'s picture

29 Nov 2011 - 11:14 am | जाई.

झकास

गणपा वेलकम बॅक. पण तुमची दिवाळी संपली आणि आमचा मार्गशिर्ष चालू झाला आहे. रेसिपी भन्नाट. मायक्रोवेव्ह मध्ये किती वेळ ठेवावे लागेल ?

गणपा's picture

29 Nov 2011 - 12:55 pm | गणपा

सॉरी जागुतै, पण मायक्रोवेव्हमध्ये अन्नं गरम करण्या पलीकडे कधी दुसर काही केल नाही. (अपवाद फक्त केक.)
सबब मायक्रोवेव्ह मध्ये किती वेळ ठेवावे लागेल याचा अंदाज नाही. अन्य कुणी प्रकाश पाडला तर उत्तमच.

पिवळा डांबिस's picture

30 Nov 2011 - 12:28 am | पिवळा डांबिस

मायक्रोवेव्हमध्ये अन्नं गरम करण्या पलीकडे कधी दुसर काही केल नाही. (अपवाद फक्त केक.)
वा, वा, रसिकहो, या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!!!
-पिवळी पल्लवी
:)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Nov 2011 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

गणपा आय हेट यू बरं का रे.

पुढील पाकृ जर गवताळ नसेल तर जगणे मुश्कील करीन मेल्या तुझे.

तु माझ्या भिंतीवर 'गो ग्रीन' वाचलं असशीलच. ;)

हालत खराब झाली आहे हे लुललुशीत चिकन बघून. सोबत काही नसले तरी चालेल. नुसते सुक्के हादडायला काय बहार येईल.. अहाहा..

कच्चा पापड पक्का पापड's picture

29 Nov 2011 - 3:37 pm | कच्चा पापड पक्क...

लालच आहा लप लप

<<मायक्रोवेव्हमध्ये अन्नं गरम करण्या पलीकडे कधी दुसर काही केल नाही. >>
अगदी बरोबर..

प्रभो's picture

29 Nov 2011 - 8:29 pm | प्रभो

आहा!!!