✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
गुरुवार, 11/24/2011 - 16:55  ·  लेख
लेख
साधारण आज दुपारी १ते२ च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. दिल्लीमधे मा.शरद पवार एका कार्यक्रमाहुन निघत असताना,एका तरुणाने (हरविंदरसींग) पवारांच्या दिशेनी चाल करत ''ये सब चोर है'' अशा आशयाची काही वाक्य उच्चारत पवारांना एक थप्पड लगावली.तो तरुण महागाइच्या कारणावरुन भडकुन तस वागला असं अता व्रुत्तवाहीनीवाले सगळेच सांगत आहेत. तो मनोरुग्ण आहे हेही याच व्रुत्तांतात ऐकायला मिळत आहे.अजुन आज रात्री/उद्या पर्वापर्यंत याचे अजुनही वेगवेगळे 'अर्थ' आपल्यासमोर येतिल. त्यात अण्णा हजारे यांनी एका कार्यक्रमातुन निघता निघता तिथल्या लोकांनी 'ही' माहीती दिल्यावर ,त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली आणी अण्णा निघुन गेले.नंतर मिडिया अण्णांपर्यंत पोहोचली व विचारले की असे आपण का बोललात? तेंव्हा अण्णा सुरवातीला मी या घटनेचा निषेधच केलाय,मी अहिंसावादी आहे,असं बोलले.पण मिडियानी त्यांना उपरोक्त वाक्यांची अठवण करुन दिल्यावर अण्णांनी ''थप्पड मारली की अणखी काही केले?'' असे मी विचारले. अशी सारवासारव केली. पवारांपासुन सर्व पक्षांचे नेते लोकांना व आपल्या कार्यकर्त्यांना ''शांत'' रहाण्याचे आवाहन केले आहे.पण अनेक ठिकाणी बंद जाळपोळ तोडफोड ह्या घटना सुरु झाल्या आहेत... माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा? या घटना स्वागतार्ह/ निषेधार्ह /चिंताजनक मानायच्या आणी गप्प बसायचे...की कोलमडु पहात असलेल्या किंवा अजुनही नीट न स्थिरावलेल्या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुन्हा एकवार अभ्यास करुन नवे उपाय शोधायचे...कारण क्रांत्या हिंसेनी घडोत वा अहिंसेनी...त्यांच्या पाठचे हेतु न्याय्य असोत वा अन्याय्य... नंतर मिळालेलं स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीनी अव्याहतपणे टिकवण हेच तर अवघड असतं ना...?अन्याय दुर करणाय्रांनाही न्यायाची कल्पना असतेच अस नाही...त्यामुळे अश्या घटनांच नक्की फलीत काय?...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33202 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

+ १

दादा कोंडके
Fri, 11/25/2011 - 13:43 नवीन
आणि दुसरं काही नाही सापडलं म्हणून मग "हे मराठी माणूस सहन करणार नाही" वगैरे भावनिक भडकाउ विधानं करायची. मराठी आणि अमराठीवाद कुठुन आला यात? सकाळ मधेतर कहर झालाय. ७०वर्षाचा जेष्ठ नेता, प्रचंड लोकसंग्रह, १८-१८ तास काम करण्याची शक्ती, विमानातून देखिल जाताना खालच्या गावात कुठला कार्यकर्ता रहातो, त्याच्या घरी कोण-कोण असतं हे लक्षात ठेवण्याएव्ह्डी स्मरणशक्ती वगैरे. हे असले निकष आहेत चांगल्या नेत्याचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

राळेगण मधे राष्त्र वादी चे

अविनाशकुलकर्णी
Fri, 11/25/2011 - 13:23 नवीन
राळेगण मधे राष्त्र वादी चे आत्म क्लेश आंदोलन.. अण्णांनी टी व्ही समोर खडा सवाल केला. मारहाणीचा निशेध... पण..एक थप्पड मा्रली तर इतका गदारोळ... शेक-या वर गोळ्या चालवल्या तेंव्हा का गप्प होता? हिंसा निंदनीय
  • Log in or register to post comments

उद्वेग...

चिगो
Fri, 11/25/2011 - 14:08 नवीन
उद्वेग बाहेर काढायला नेत्याला थप्पड हाणा... आणि अधिकार्‍यांना जाळा / काळं फासा. लै जालीम मार्ग आहे राव.. शरद पवारांबद्दल मला अजिबात ममत्व नाही, पण हा हल्ला मुर्खपणाचा होता, हे वाटतं.. "हल्ल्यामागच्या भावना लक्षात घ्या.." कायपण च्यायला सॉलिड वाक्य आहे, नाही ?? हेच लोक मग केजरीवाल, प्रशांतभुषण ह्यांच्या हल्लेखोरांच्या भावना का लक्षात घेत नाही, ब्वॉ ? बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्‍यांना खांबाला बांधून झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे मातीचे पाय दिसलेत.. बाकी, हल्ल्याचा आणि बंद करणार्‍या, जाळपोळ करणार्‍यांचाही निषेध !! अवांतर : ज्योक असेल, पण आम्हीही आता ऑफीसात हेल्मेटघालून बसावं म्हणतोय. उगाच आपल्या निर्णयाने (चूक का बरोबर, कोणाला पडलीय) कुणाच्या भावना दुखावल्या, उद्रेक झाला तर भारी पडेल..
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Fri, 11/25/2011 - 14:18 नवीन
अवांतर : ज्योक असेल, पण आम्हीही आता ऑफीसात हेल्मेटघालून बसावं म्हणतोय. उगाच आपल्या निर्णयाने (चूक का बरोबर, कोणाला पडलीय) कुणाच्या भावना दुखावल्या, उद्रेक झाला तर भारी पडेल..
+१, परफेक्ट ! मी वर हेच लिहले आहे. निर्णय घेणारे सरकार ही एक संस्था आहे, ते सरकार चावलणारा एक गट आहे, कुठल्या एका व्यक्तीला वैयक्तिकरित्या दोषी धरुन 'अशी' शिक्षा देणे योग्य नाही. जसे काल महागाईच्या प्रश्नांवरुन पवारांवर हात उचलला तरी तो पायंडा नको पडायला. अन्यथा छोट्या छोट्या प्रश्नांवर लोक असेच सोपे सोल्युशन हुडकतील. आज सकाळी पाणी नाही आले, धुवा त्या अधिकार्‍याला. आज काल तर मॅच बघाताना लाईट गेली, फोडा विजमंडळाचे कार्यालय. बसेसना खुप गर्दी असते, बस अपुर्‍या आहेत, हाणा परिवहन मंत्र्याला/अधिकार्‍याला .... हे असे सर्व उपाय चूक आहेत आणि अजिबात पटणारे नाहीत. राग आहे हे मान्य, पण अशा बाबतीत तो व्यक्त करण्याची ही पद्धत नव्हे हे पुन्हा आवर्जुन सांगतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

बाकी कालच्या विधानावरुन आणि

मदनबाण
Fri, 11/25/2011 - 14:28 नवीन
बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्‍यांना खांबाला बांधून झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे मातीचे पाय दिसलेत मला वाटतं अण्णांनी दारु सोडा सांगुन सुद्धा त्याच्या व्यसानात अडकलेल्यांना स्वहस्ताने झोडले आहे.काल का परवाच एक वॄत्तवाहिनीवर अण्णांनी ज्या परिवारातल्या माणसाची दारु सोडवली होती त्याची मुलाखत दाखवली गेली होती,अण्णांमुळेच माझी दारु सुटली आणि आमच्यासाठी ते देवा समान आहेत असा तो व्यक्ती म्हणाला ! दारु सारख्या कुटंब उधवस्त करणार्‍या व्यसनास सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना तालिबानी म्हणणे हास्यास्पद आहे ! तालिबानी लोकांनी समाज उपयोगी कार्य केली नसुत ते समाज घातक कॄत करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत,आणि अण्णा समाजसेवी आहेत हे राळेगणसिद्धी पासुन ते देशातल्या सर्व सुजाण नागरिकांना माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

>>बाकी कालच्या विधानावरुन आणि

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 11/27/2011 - 01:40 नवीन
>>बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्‍यांना खांबाला बांधून झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे मातीचे पाय दिसलेत.. चिगो, तुम्ही ते विधान नीट वाचलेले दिसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे दारू पिणारे आणि दारुडे यात फरक आहे. आणि कष्टकरी समाजातील कर्ता पुरुष जेव्हा दारुडा होतो तेव्हा त्या कुटुंबाची कशी वाट लागते ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तो प्रकार सोत्री किंवा नाटक्याशेट च्या कॉकटेल इतका रम्य नसतो. बेवडे लोक बघितले आहेत ना तुम्ही? रोज टल्ली होणारे, दारूपाई नोकरी गेलेले, घरी बसून बायकोच्या पैशावर दारू पिऊन वर तिलाच मारहाण करणारे. घरी मुलांना खायला पैसे नसताना रोज दारू पिऊन गटारात पडणारे. सकाळी दहा किंवा बारा वाजता पण रस्त्यातून अडखळत चालणारे ? पाहिले आहेत ना ? अशा लोकांना दोन मुस्कटात भडकवल्याने कुणाचे पाय मातीचे ठरत असतील तर मला मातीचेच पाय असणारा माणूस आवडेल. दुसरे म्हणजे मला वाटते की ते राळेगणसिद्धीत झालेल्या दारूबंदीच्या आंदोलनाबद्दल बोलत होते. तिथे त्यांनी काय उपाय केले यावर. त्यांनी सगळीकडे असे करावे असे म्हटल्याचे ऐकिवात नाही. तूनळीवरील एका बातमीप्रमाणे अण्णांनी एक पुस्तक लिहिले असून त्यात ३०-४० वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगितली आहे. ती एक घटना उचलून त्याचे राजकारण कॉंग्रेस करत आहे हे कळायला मला वाटत नाही फार कष्ट पडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अरारारा...

चिगो
Tue, 11/29/2011 - 10:56 नवीन
बाप रे.. एकदम सेंटी करुन टाकलं ब्वॉ तुम्ही.. इतकं की एक्साइज आक्टान्वये (साभार : पुलं) शिक्षा करतांनाही भरुन येतंय अगदी.. >> बेवडे लोक बघितले आहेत ना तुम्ही? रोज टल्ली होणारे, दारूपाई नोकरी गेलेले, घरी बसून बायकोच्या पैशावर दारू पिऊन वर तिलाच मारहाण करणारे. घरी मुलांना खायला पैसे नसताना रोज दारू पिऊन गटारात पडणारे. सकाळी दहा किंवा बारा वाजता पण रस्त्यातून अडखळत चालणारे ? पाहिले आहेत ना ? अशा लोकांना दोन मुस्कटात भडकवल्याने कुणाचे पाय मातीचे ठरत असतील तर मला मातीचेच पाय असणारा माणूस आवडेल अगदी अगदी... बघितलेयत की. पण मुस्काटात भडकावल्याने अशी किती लोकं सुधारतात ? मी आपणांस विनंती करतो, कृपया आंध्रप्रदेशात स्त्रियांनी एकजुट होऊन केलेल्या अँटी-अरॅक (देशी दारु) विरुद्ध दिलेल्या लढ्याची माहीती घ्या, म्हणजे खर्‍या प्रकारे गांधीवादी प्रयत्नांनी सरकारला व प्रशासनाला नमवता येते हे कळेल.. कुठेही आपल्या गांधीवादाचा उदो-उदो न करता ह्या स्त्रियांनी प्रौढ शिक्षण, जनजागृती, पिकेटींग आणि मन-परीवर्तनाद्वारे एका गावातच नव्हे, तर जवळजवळ पुर्ण राज्यात दारुबंदी करायला भाग पाडलं होतं सरकारला.. बादवे, अणांचं राळेगाव मधलं कार्य मला मान्य आहे. पण महाराष्ट्रात असेच चमत्कार करणारे आणखीही लोक आहेत. वारणानगर परीसर.. हिवरे बाजारचे पोपटराव पवार (हिवरेबाजार वर प्रेझेंटेशन आसामात नगॉंवमध्ये डिसी ऑफीसमध्ये आदर्श ग्रामच्या सभेत दाखवली होती आम्हाला..) , आणीही काही.. हां, आता त्यांना मायलेज घेता आलं नसेल ही गोष्ट वेगळी.. अ‍ॅज युजवल, कुणाच्याही धोतराला हात घालायचा उद्देश नाही.. भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कॉन्पिक्युअस बाय अ‍ॅबसेन्स कॉलिंग इन्द्रराज पवार

कापूसकोन्ड्या
Fri, 11/25/2011 - 14:09 नवीन
कॉलिंग इन्द्रराज पवार
  • Log in or register to post comments

मी काल पासुन आण्णांच्या

शित्रेउमेश
Fri, 11/25/2011 - 20:22 नवीन
मी काल पासुन आण्णांच्या कमेंट वर खुप हसलोय...
  • Log in or register to post comments

आधुनिक गान्धी .

अशोक पतिल
Fri, 11/25/2011 - 21:38 नवीन
अन्ना हजारेचे खरे रुप आता उघड झाले आहे. मी ही त्याना आधुनिक गान्धी समझलो होतो. परन्तु त्या गान्धीची व या गान्धीची तुलनाच नाही.त्या गान्धीने चुकुनही कोणाविषयी कुजकट शब्द वापरले नव्हते. खरेतर ज्या अन्ना ना एक महाराष्ट्र सोड्ला तर कोणी ओळखत नव्हते ते एकाएकी सर्व देशात कसे प्रसिध्द झाले त्याचे खरे कारण कळले. त्यानी आता भ्रष्टाचारविरोधी आंदोलन वगेरे बोलने सोडुन सरळ सरळ आपल्या ( बोलवीत्या धन्याचे ) कुन्कू लावुन सरळ राजकारण करावे. भारतीय लोकशाहित तसा तो प्रत्येकाचा हक्क आहेच.
  • Log in or register to post comments

पवार यांना झापड मारल्याने

आशु जोग
Fri, 11/25/2011 - 23:05 नवीन
पवार यांना झापड मारल्याने पाटील यांना दु:ख झाले अण्णा जाऊदे हो विषय पवारांचा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

मु. पो. बारामती काय?

अर्धवटराव
Sun, 11/27/2011 - 11:33 नवीन
मला मनापासुन वाटतं कि अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला राजकीय स्टंट ठरविण्याचा (मुर्ख) प्रयत्न करणार्‍यांचं एखाद्या भ्रष्टाचाराने प्रचंड नुकसान व्हावं... अगदी पर्सनल नुकसान... आतड्या पिळवटुन काढणारं ...आणि मग त्यांची प्रतिक्रिया घ्यावी अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

एक पुर्वग्रहदुषीत द्रुष्टिकोन

अशोक पतिल
Sun, 11/27/2011 - 22:11 नवीन
तस नाही हो, भ्रष्टाचाराने प्रचंड नुकसान ह्या देशाचे , जनतेचे,आपल्या सर्वाचे होतेय. परन्तू याला फक्त एकाच पार्टीला किवा नेत्यालाच का जबाबदार धरताय ? ह्या धाग्यावर बहुतेक सर्व प्रतिक्रीया एक पुर्वग्रहदुषीत द्रुष्टिकोन दाखवतात. (मुर्ख) प्रयत्न करणार्‍यांचं प्रयत्न मुर्ख नाही.तो तुम्हाला तसा वाट्तो . बाकि बहुतेक सर्व प्रतिक्रीया विषयी मीपण हेच लिहु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

असेल कदाचीत !!

अर्धवटराव
Mon, 11/28/2011 - 09:04 नवीन
>>प्रयत्न मुर्ख नाही.तो तुम्हाला तसा वाट्तो . तसंही असेल कदाचीत. शरद पवारांचा आवाका, त्यांची राजकारणी समज या बद्दल कुणाचेच दुमत नसावे. राजकारणात कोणिच पूर्ण काळं वा पांढरं नाहि हे ही सत्य... पण विषय जेंव्हा अण्णांच्या आंदोलनाचा येतो तेंव्हा त्याला अण्णांच्या मुद्द्यावरुनच आव्हान द्यावं ना... अण्णांना राजकारणात उतरण्याचं आव्हान देणं म्हणजे पोटदुखीला खोकल्याचं औषध. घोड्याला पळण्याच्या शर्यतीत हरवावे, पोहायच्या नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

१००!!!!!!!!!!!!

यकु
Fri, 11/25/2011 - 21:46 नवीन
सचिनचं शतक होवो न होवो. श्रीयुत हरविंदर कृपेने निघालेल्या या धाग्याचे शतक झाले असे जाहीर करतो!!!!
  • Log in or register to post comments

यापेक्षा हे अधिक

आशु जोग
Sat, 11/26/2011 - 22:26 नवीन
यापेक्षा हे अधिक आवडले http://www.misalpav.com/node/19882
  • Log in or register to post comments

या

समंजस
Sun, 11/27/2011 - 01:22 नवीन
थप्पड मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी पक्षाने, पक्ष कार्यकर्त्यांनी आणि पक्ष नेत्यांनी नंतर जो धुमाकूळ घातला ( रस्ता बंद, दुकाने बंद, दगडफेक, हरविंदरला मारहाण करण्याचा प्रयत्न, अण्णांचा पुतळा जाळणे, अण्णांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ई. ई. ) त्या वरून हे दिसून आलं आहे की, राष्ट्रवादी पक्षाचे पाय सुद्धा मातीचेच आहेत. तसेच जो बुरखा (आम्ही फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांचे पुरस्कर्ते आहोत आणि दुसरे पक्ष हे झुंडशाही, झोडशाही, दडपशाही, हुकूमशाही वगैरे विचारांचे आहेत) आतापर्यंत त्यांनी वापरला तो गळून पडला हे सुद्धा या प्रकरणातून बाहेर आलेलं एक चांगलं फलितच. अवांतर: शरद पवार साहेबांनी आतापर्यंत राजकारणात राहून बरंच काही मिळवलयं, आता त्यांनीच स्वतःच वाढतं वय बघून, तब्येती कडे बघून राजकारणातून बाहेर पडावं आणि एका आजोबाचं, अनुभवी, वयस्कर व्यक्ती असं मानाचं आयुष्य जगावं.
  • Log in or register to post comments

वासना दुष्पूर है ||

यकु
Sun, 11/27/2011 - 03:04 नवीन
वासना दुष्पूर है ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

मातीचे पाय

अशोक पतिल
Sun, 11/27/2011 - 06:32 नवीन
( रस्ता बंद, दुकाने बंद, दगडफेक, हरविंदरला मारहाण करण्याचा प्रयत्न, अण्णांचा पुतळा जाळणे, अण्णांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ई. ई. ) त्या वरून हे दिसून आलं आहे की, राष्ट्रवादी पक्षाचे पाय सुद्धा मातीचेच आहेत. तसेच जो बुरखा (आम्ही फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या विचारांचे पुरस्कर्ते आहोत आणि दुसरे पक्ष हे झुंडशाही, झोडशाही, दडपशाही, हुकूमशाही वगैरे विचारांचे आहेत) मातीचे पाय नसलेला दूसरा कोणी पक्ष आहे ?
  • Log in or register to post comments

मातीचे

समंजस
Mon, 11/28/2011 - 12:45 नवीन
<< मातीचे पाय नसलेला दूसरा कोणी पक्ष आहे ?>> दुसरा कोणताच नाही. हे माझे मत. (परंतू काही पक्ष हा आव आणतात. आपणच तेव्हढे सोज्ज्वळ, सहिष्णूतावादी, उदारमतवादी वै. वै)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

मुजोर झालेल्या लोकशाहीला?

चिंतामणी
Sun, 11/27/2011 - 09:51 नवीन
बाकी सगळे ठिक. पण सांगा लोकशाही मुजोर झाली की नेते? :( :-( :sad:
  • Log in or register to post comments

सदनशीर मार्ग !!

अर्धवटराव
Sun, 11/27/2011 - 11:35 नवीन
(हि हरविंदरची केस नाहि पण...) पोटात अन्न नाहि... इतकं वैफल्य कि जीव द्यायची ईच्छा होते... सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या भविष्यातही हाच अंधार दिसतोय... या परिस्थीतीत सदनशीर मार्गाने लढायला जे काळीज लागते ते ३ गोळ्या खाऊन "हे राम" म्हणत केंव्हाच बंद पडलय... बाकी काय बोलणार... हि थप्पड "निषेध व्यक्त" करण्याचा विषय होऊन बसली फक्त... आपल्या सामाजीक संस्थेचं एक मोठं अपयश अजुन काय... (गांधीवादी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अरे काय चाल्लय काय? एका

भीमाईचा पिपळ्या.
Sun, 11/27/2011 - 11:57 नवीन
अरे काय चाल्लय काय? एका माथेफिरुने केलेल्या एका भ्याड हल्ल्याच्या येथील लोकांच्या अपरिपक्व प्र पाहून खेद वाटला. एक मिपाकर म्हणून शरमही वाटली. साहेबांसारख्या एका विनम्र आणि सौहार्दशील, ज्ञानवृध्द व्यक्तिवर केलेल्या ह्या भ्याड हल्ल्याचा आम्ही णिषेढ नोंदवतो. वयाच्या सव्विसाव्या वर्षी आमदार आणि छत्तिसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या ह्या शेतकर्याच्या पोरावर राळ उडवण्याची एकही संधी काही विवक्षित लोक सोडत नाहीत. आज उभ्या भारतवर्षात गावातल्या सोसायटीपासून थेट सर्वोच्च संसदेपर्यंत ज्ञान असलेला एकमेव नेता म्हणजे आदरणीर साहेबांचे नाव घ्यावे लागेल. बाकी एसीत बसून गप्पा ठोकणार्या सो कॉल्ड धर्मबुडव्यांना आमच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

फार

कुंदन
Sun, 11/27/2011 - 22:13 नवीन
फार जोरात बसली का हो ? नाहि त्याबद्दल कोणीच काही बोलले नाही , तुम्हाला आतली बातमी माहित असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

आदरणीय?

मैत्र
Mon, 11/28/2011 - 14:17 नवीन
http://www.misalpav.com/node/19898#comment-355813 याला काही उत्तरे द्याल का? पतिल साहेब आणी पिपळ्याराव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

किळसवाणे

हुप्प्या
Mon, 11/28/2011 - 07:14 नवीन
सत्तरीला पोचलेल्या नेत्याला भ्रष्टाचार करायला, आपली पिलावळ पुढे करायला, जातीय राजकारण करायला कुठलीही लाज वाटत नाही तर त्याला एक भडकावून दिली तर काय बिघडले? कायद्याचा धाक नाही, नैतिक चाड नाही, (भक्कम पैसे ओतल्यामुळे) निवडणूकीत हरण्याची शक्यता नाही. ह्या मुजोरांना धडा शिकवणार तरी कसा? वाहे गुरुच्या कृपेने मारणारा सरदार होता. बामन असता तर १९४८ ची पुनरावृत्ती झाली असती. बाकी ह्या निमित्ताने ठाकरेसाहेबांचे साहेबप्रेम ओसंडून वाहू लागले आहे. सामन्यातील अग्रलेखात इतके लाडे लाडे लिहिले आहे की किळस यावी. एकंदरीत कितीही वेगवेगळे मुखवटे घातले तरी सगळे मिळून वाटून खाऊ वालेच लोक आहेत हे उघड होते आहे. लागलीच महाराणी सुप्रियासाहेब सुळे बाळासायबांच्या भेटीला पतीसमवेत मग फोटो सेशन वगैरे वगैरे. अगदीच अती होते आहे. ह्याही घराण्यात असा "प्रसाद" वाटला पाहिजे. असले विरोधक असतील तर लवासा वगैरे प्रकरणे उघडकीस येणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

बाकी ह्या निमित्ताने .....

कुंदन
Mon, 11/28/2011 - 09:42 नवीन
>>बाकी ह्या निमित्ताने ठाकरेसाहेबांचे साहेबप्रेम ओसंडून वाहू लागले आहे. सामन्यातील अग्रलेखात इतके लाडे लाडे लिहिले आहे की किळस यावी. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

सामन्यातील अग्रलेखात इतके

मदनबाण
Mon, 11/28/2011 - 09:49 नवीन
सामन्यातील अग्रलेखात इतके लाडे लाडे लिहिले आहे की किळस यावी. याच बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत शरद पवारांचे मैद्याचे पोतं असे टोपणनाव ठेवले आहे... तसेच छगन भुजबळांचा लखोबा तर नारायण राणे यांचा नारोबा उर्फ कोंबडी चोर ! ;) सध्या मैद्याचा काय भाव चालु आहे हे पहायला हवे बरं ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

ह्या मुजोरांना धडा शिकवणार

भीमाईचा पिपळ्या.
Mon, 11/28/2011 - 12:04 नवीन
ह्या मुजोरांना धडा शिकवणार तरी कसा?
=)) =)) इतिहासाने उगवलेला सूड. बाकी काय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

भंपक लेख......

अनामिका
Mon, 11/28/2011 - 13:31 नवीन
http://saamana.com/2011/November/28/AGRALEKH.HTM सामनामधिल संजय राऊत यांनी प्रसवलेला सगळ्यात भंपक लेख......राष्ट्रवादीची भविष्यात राष्ट्रिय लोकशाही आघाडीच्या अंगणात उडी मारण्याबाबतचे तथाकथित विचारमंथन सुरु झाल्याचे हे सुतोवाच असावे का? हरमिंदरसिंह याने पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याला भ्याड हल्ला म्हणणे मुर्खपणाचा कळस आहे ....याला जाळ म्हणतात असे सविस्तर नमूद केलय .... http://www.harkatnay.com/2011/11/blog-post_24.html
  • Log in or register to post comments

राजकारण्यां चे हे खेळ आता

मदनबाण
Mon, 11/28/2011 - 13:35 नवीन
राजकारण्यांचे हे खेळ आता सर्व सामान्य जनतेला माहित झालेले आहेत ! आज एकमेकांना बोल लावायचे आणि दुसर्‍या दिवशी स्नेह भोजनाला एकत्र जमायचे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा