✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपली तर काय.....

व — वपाडाव, Mon, 11/14/2011 - 14:19
आपली तर काय लायकीच नाय तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय ! आपली तर काय..... .................तू McD चा pizza .................आपण मैद्याचा पाव पण नाय ! .................आपली तर काय... तू विशालकाय वडाचं झाड़ आपण लाजाळुचे पान पण नाय ! आपली तर काय.... .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय ! .................आपली तर काय.... तू अटलांटिक महा सागरातला "शार्क" आपण गटारातला अमीबा पण नाय ! आपली तर काय..... .................तू Rolls Royce ची कार .................आपण nano चा nut पण नाय! .................आपली तर काय.... तू I.I.T. ची इमारत आपण Z.P. च्या बाकावर पण बसलो नाय ! आपली तर काय.... .................तू तिरुपतीचं संस्थान .................आपण झाडाखालचा शेंदुर फासलेला दगड पण नाय! .................आपली तर काय..... तू ''मिसळपाव'' ची owner आपला तर तिथे एक thread पण नाय !! आपली तर काय लायकीच नाय.......... - Kale Pushpak (काळे पुष्पक) १४ नोव्हेंबर २०११

प्रतिक्रिया द्या
15054 वाचन

💬 प्रतिसाद (73)

ज्यांना मॅक्डोनाल्ड्सच्या पिझ्झाविषयी शंका आहेत अशांकरिता

वपाडाव
Tue, 11/15/2011 - 16:23 नवीन
McPizza – McDonald's has also attempted pizza at various times, with an apple-pie–like McPizza and more conventional McDonald's Pizza. A line of personal-sized pizzas was first seen in the late 1970s in test-market stores near interstate highways around Milwaukee and Madison. In Canada (c. 1992–1999), the pizza originally began as a family-sized pizza that was brought out to the table by an employee and placed on a raised rack in the centre of the table. Later it was scaled down to a personal-sized pizza. However, variations have found their way into some international markets such as India (the pie-like "Pizza McPuff"). McDonald's also test marketed a 14-inch, round, traditional-style pizza in Evansville, Indiana, and nearby Owensboro, Kentucky, in 1989.[23] By 1991, the McDonald's test markets for pizza had grown to over 500 McDonald's locations before the pizza test was placed on hold.[24] Pizza is still sold at one McDonald's location in Orlando, Florida. येथुन साभार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

माहितीबद्दल धन्यवाद! पुढच्या

किचेन
Tue, 11/15/2011 - 17:12 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद! पुढच्या बारीला मक दि ला गेलात कि आमच्यासाठी पण आणा पिझ्झा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

च्यायला, हे कधी झालं... आम्ही

धन्या
Tue, 11/15/2011 - 18:11 नवीन
च्यायला, हे कधी झालं... आम्ही आपलं उगाच डॉलर वन मेनू खात दिड वर्ष काढलं तिकडे. आधी माहिती असतं तर पिझ्झाही खाल्ला असता ना राव. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

अहो सोबतच चला, कट्टा मॅकडीला

वपाडाव
Tue, 11/15/2011 - 18:15 नवीन
अहो सोबतच चला, कट्टा मॅकडीला करु.....तुमची अव्हेलिबिलिटी सांगा.....सगळ्या मिपाकरांना बोलवुन धुमाकुळ घालु.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मकडी व्यावसाइक आहे पैका

आत्मशून्य
Tue, 11/15/2011 - 18:43 नवीन
मकडी व्यावसाइक आहे पैका मिल्तो म्हंल्याव पिझ्झाज काय उद्या वडापावही विकायला सूरूवात करतील ते. बाकी मक्-डीचा पिझ्झ्या परोबर ते यकदम मस्त सॅलड सोरी सलाड द्यायचे एकदम टेश्टी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

भारी

स्पा
Tue, 11/15/2011 - 13:28 नवीन
=)) =)) =)) भारी
  • Log in or register to post comments

धन्यवाद....

वपाडाव
Tue, 11/15/2011 - 14:10 नवीन
प्रभाकर पेठकर, स्पा, किचेन, वल्ली, सोकाजी, मिचमधुरा, लखु यांचे आभार...... मृत्युंजय यांच्या प्रश्नाचे उत्तर = http://www.misalpav.com/node/19741#comment-352254
  • Log in or register to post comments

छान रे मस्त झालीय कविता, आता

५० फक्त
Tue, 11/15/2011 - 14:40 नवीन
छान रे मस्त झालीय कविता, आता उत्तरार्ध का काय तो येउ दे.
  • Log in or register to post comments

डब्बलबारी!

मेघवेडा
Tue, 11/15/2011 - 16:26 नवीन
हा हा! डब्बलबारी लावल्यासारखा वाटला माहिताय, पुष्पकबुवा काल्यानुं! सगळ्याच बार्‍या मस्त हसवून गेल्या पण चोरलेलं गाण, नॅनोचा नट बेष्टच! लगे रहो भिडू!
  • Log in or register to post comments

एक कविता म्हणून वाचताना मज्जा

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/15/2011 - 16:34 नवीन
एक कविता म्हणून वाचताना मज्जा आली! ;)
  • Log in or register to post comments

धन्स...

वपाडाव
Tue, 11/15/2011 - 17:27 नवीन
बिपिनदा, मेघवेडा अन ५० राव आपले आभार........
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/15/2011 - 18:22 नवीन
मस्त मजा आली. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

या कवीतेमागे रॉकस्टार हा चित्रपट प्रेरणा आहे काय ?

आत्मशून्य
Wed, 11/16/2011 - 04:34 नवीन
म्हणजे एखादा विशीष्ठ प्रसंग डायलॉग वगैरे... ? Coz, I strongly doubt , which one is it... ;)
  • Log in or register to post comments

भन्नाट रे वप्या, कल्ला कविता.

प्यारे१
Wed, 11/16/2011 - 10:49 नवीन
भन्नाट रे वप्या, कल्ला कविता. तू कातीव संगमरवराची मूर्ती आपण इटकुराचा तुकडा पण नाय.. आपली तर काय....! तू निवळ निळेशार पाणी, आपण ओढ्याचा ओहोळ पण नाय... आपली तर काय....! तू हिरवीगार पावसाळी मखमल, आपण तर ग्रीष्मातली कोरडी पानगळ पण नाय ... आपली तर काय....! तू अव्यक्ताची व्यक्त जाणीव, आपण तर मर्तिकातलं मडकं पण नाय.... आपली तर काय लायकीच नाय.
  • Log in or register to post comments

धन्यु....

वपाडाव
Wed, 11/16/2011 - 11:38 नवीन
बिरुटे सर, पियुशा व प्यारे यांचे आभार.....
  • Log in or register to post comments

तु झण्झणीत मिसळ्पाव पण मी तर

डावखुरा
Fri, 11/18/2011 - 11:50 नवीन
तु झण्झणीत मिसळ्पाव पण मी तर मुंबईची शान..मी हाय वडापाव.... जियो वडापाव...मस्त रचना....
  • Log in or register to post comments

उत्तम....

वपाडाव
Fri, 11/18/2011 - 12:17 नवीन
च्यामारी... हे तर सुचलंच नाही की..... लाय भारी हो लिंकशांडर..... आवड्या..... धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

मस्त

नंदन
Sun, 11/20/2011 - 12:39 नवीन
झकास जमलीय कविता, मजा आली.
तू विशालकाय वडाचं झाड़ आपण लाजाळुचे पान पण नाय ! आपली तर काय.... .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय ! .................आपली तर काय....
बेश्ट!
  • Log in or register to post comments

पेताड वप्या साठी...

मी-सौरभ
Fri, 12/09/2011 - 19:02 नवीन
तू JD चा खंबा आपण पावशेर ची पिवशीपण नाय ! आपली तर काय.....
  • Log in or register to post comments

झकास!!!

नया है वह
Wed, 06/22/2016 - 15:06 नवीन
मस्त मजा आली....
  • Log in or register to post comments

लय जबरी लिहीयंल!! कडक!!!

जव्हेरगंज
Wed, 06/22/2016 - 22:05 नवीन
लय जबरी लिहीयंल!! कडक!!!
  • Log in or register to post comments

+१

रातराणी
गुरुवार, 06/23/2016 - 08:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

वप्या

नाखु
गुरुवार, 06/23/2016 - 09:11 नवीन
माणसात होता तेंव्हा असंही लिहायचा आणि नंतर त्याचा उच्चभ्रू झाला. हे काव्य मस्त आहे. वप्या तू तर जाणता खिलाडी मैदानावरचा ! आपण दुकानाबाहेरचा बघ्या (प्रेक्षक) पण नाय आपली तर काय....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा