✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोक्ष कुणाला हवाय?

र
रविंद्र गायकवाड यांनी
Sun, 11/13/2011 - 10:16  ·  लेख
लेख
कोण तू वाचलं... आणि अनेक दिवस मनाच्या कोपर्‍यात राहून गेलेला प्रश्न पुन्हा डोक्यात थैमान घालतोय.. मी म्हणजे सुक्ष्म किंवा स्थूल देह नाही. म्हणजे कर्ता किंवा भोक्ताही नाही. मन बुद्धी चित्त अहंकार याहूनही मी वेगळा आहे. म्हणजेच मला सुख दुख:ची बाधाही नाही. मला जन्म बाल्य अस्तित्व यौवन वर्धन मृत्यूही नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका म्हणजेच मोक्ष नक्की कुणाला हवाय. ??? सु़ख दु़खः कर्म भोग मन बुद्धी चित्त अहंकार स्थूल देहाबरोबरच नष्ट होतात. मग मोक्षाची गरज कुणाला आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22263 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

मला नेहमी संत, अध्यात्म इ.

जयंत कुलकर्णी
Wed, 11/16/2011 - 22:10 नवीन
मला नेहमी संत, अध्यात्म इ. ज्यांना कळते अशा ज्ञानी लोकांना प्रश्न विचारावासा वाटतो तो असा – जर तुम्हाला जन्मल्या जन्मल्या एका बंद खोलीत “”Life support system” वर ठेवले तर काय होईल ? जन्म आणि मृत्यूच्या कल्पनांचे काय होईल. मृत्यूची जर कल्पना नसेल तर परमेश्वराच्या कल्पनेचे काय होईल, मग अध्यात्माचे काय होईल ? मग माणसामधे फक्त जनावरांप्रमाणे “instinct” च उरेल का ? जे अस्तित्वात नाही त्याला मेंदू जन्म देतो का ? इ.इत्यादि....... काय होईल याची यादी मी एकदा केली आहे आणि मला ह्या सगळ्या कल्पनांचा फोलपणा लक्षात आला.
  • Log in or register to post comments

काय राव ? ओशो वाचताय का ?

आत्मशून्य
Wed, 11/16/2011 - 22:59 नवीन
नाय त्याचं म्हणन जसंच्या तसच लिहलय म्हणून विचारलं ? तो सूध्दा असच म्हणायचा समजा जन्म झाल्यानंतर तूमच्यावर कोणतेच संस्कार कोणीही केले नाहीत/काहीच शिकवलं नाही तर तूम्ही कसे जगत असाल ? बस अगदी तसाच चालू क्षण व्यतीत करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

प्रामाणिकपणे सांगायचे तर

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/17/2011 - 09:09 नवीन
प्रामाणिकपणे सांगायचे तर ओशोचे कुठलेच लिखाण मी वाचलेले नाही. ओमर खय्याम जेव्हा लिहायला घेतला तेव्हा एका रुबाईच्या वेळी अर्थ लिहिताना मनात हा विचार आला आणि तो तेथेच मांडला. कदाचित ओशो म्हणतोय तेच मीही म्हटलेले असेल पण ओशोने ही यादी केली आहे का ? असल्यास मला वाचायला आवडॅल.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

२-३ पेग मारायचे... चकणा

अविनाशकुलकर्णी
Wed, 11/16/2011 - 23:53 नवीन
२-३ पेग मारायचे... चकणा चापायचा..आपले भाऊ गणपा करतात त्यातला एखादा पदार्थ चापायचा. खुडुक व्हायच. मद्य सत्य..मोक्ष मिथ्या...
  • Log in or register to post comments

आद्य सत्य. मद्य सत्य सत्यमेव

विजुभाऊ
गुरुवार, 11/17/2011 - 14:57 नवीन
आद्य सत्य. मद्य सत्य सत्यमेव जयते
  • Log in or register to post comments

रविंद्र साहेब

रघु सावंत
Mon, 01/30/2012 - 23:45 नवीन
>मोक्ष कुणाला हवाय? मला तर नकोच नको ह्या जन्मात भरपुर बघितल अबब याच्या पुढे भरपूर बघायच आहे आता विद्या बालन बिपाशा कंगना पूढ्च्या जन्मात याच्या पेक्शा भलतच असेल कस काय ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा