खोपा
अर खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला
तिचा पिलामंदी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या. आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी ह्या पंक्ती जीवाला घोर लावून जातात.
ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. पक्षांबाबत वाचनात आल आहे की नर पक्षी हे घरटे तयार करतात व मादी पक्षी ते निरखून पाहतात व ते ठिकठाक आहे की नाही हे पाहून त्यात रहायच की नाही हे त्या ठरवतात.
हे सुगरण पक्षी घरटी विणतात त्यावरून मला नेहमी प्रश्न पडतो हत्ती, घोडे, बैलांसारखे मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करुन सुंदर विणीचा खोपा तयार करतात.
झाडाच्या फांदीला धरून ह्यांच्या पायाभरणीला (विणण्याला) सुरुवात होते.
किती बारीक लक्ष आहे पहा, ही मादी सुगरण असावी. आपल घरकुल व्यवस्थित झाला की नाही ते पडताळून पाहात आहे.
हा सुगरण बिचारा विणून विणून थकलेला दिसतोय. एकदाच जोर मारला असेल त्याने खोपा लवकर तयार होण्यासाठी.
खोप्यांच्या इंटेरियर व डिझाइन्स मध्ये थोडा फार फरक जाणवतो.
हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच वसवतात. एखादे लांबचे म्हणजे रहदारी जिथे कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही अशा ठिकाणी असलेले झाड बहूतेक निवडतात असा माझा अंदाज आहे. एकाच झाडावर ह्यांची १५-२० जणांची वस्ती विसावते.
ह्या सुगरणी तसेच बरेच घ्ररटे करणारे पक्षी आपल्या पिलांना जन्म देतात आणि बाळे स्वावलंबी झाली की नंतर घरटी सोडून देतात. खास आपल्या बाळांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी किती मेहनतीने ही घरटी बनवतात. एकच इश्वरचरणी प्रार्थना आहे की आजच्या ह्या सिमेंटच्या जंगलात ह्यांच्या वस्तीला कुणाची नजर न लागो उलट अधिकाधिक त्यांच्या हिरव्या वस्त्यांची ठिकाणे त्यांना उपलब्ध होवोत.
(हे लेखन जालरंग प्रकाशनाच्या दिपोत्सव ह्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशीत झाले आहे. जालरंगच्या टिमचे आभार)

वर्गीकरण
सुंदर ! असे झाडावर लटकलेले
अप्रतिम गं ताई! तु लई बेश्ट
मस्त आम्ही लहानपनी अशी अन
खुप छान... वरुन तिसरा आणि
लईच भारी फटू की व्हो जागुताई
In reply to लईच भारी फटू की व्हो जागुताई by जे.पी.मॉर्गन
फक्त वॉचिंग
In reply to फक्त वॉचिंग by चतुरंग
हाहाहा
In reply to फक्त वॉचिंग by चतुरंग
कुठं काय बोलावं?
छान माहिती आणि फोटो
मस्त फटू गं जागूतै.... सगळे
आमच्या गावी
मदनबाण, उदय, डावखुरा, मॉर्गन,
फोटो छान आलेत. मला नेहमीच या
उत्तम फोटो..
चतुरंग, मोहनराव, नरेश
पक्षीण म्हणे राहण्याच्या आधी
तुझ्यातला फोटोग्राफर ला
काय सुंदर फोटोग्राफी
निसर्गप्रेमी
In reply to निसर्गप्रेमी by स्मिता.
असेच म्हणते...
सगळेच फोटू भारी आलेत.
प्राजू, पुनम, स्मिता, अनामिक
मस्तच !!
खोपे पाहुन गावच्या शेतातील
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
दोन्हींबद्दल धन्यवाद,
मस्त फोटो आणि माहिती
In reply to मस्त फोटो आणि माहिती by बहुगुणी
धन्यवाद. तो पक्षी पाहिला होता
जागुताइ फार अप्रतिम
सगळ्यांचे धन्यवाद. दिपाली
सुगरण...
चित्रा धन्यवाद. प्रभाकरजी खरे
वाह!! मस्त आले आहेत फोटो.