खोपा
अर खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला
तिचा पिलामंदी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या. आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी ह्या पंक्ती जीवाला घोर लावून जातात.
ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. पक्षांबाबत वाचनात आल आहे की नर पक्षी हे घरटे तयार करतात व मादी पक्षी ते निरखून पाहतात व ते ठिकठाक आहे की नाही हे पाहून त्यात रहायच की नाही हे त्या ठरवतात.
हे सुगरण पक्षी घरटी विणतात त्यावरून मला नेहमी प्रश्न पडतो हत्ती, घोडे, बैलांसारखे मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करुन सुंदर विणीचा खोपा तयार करतात.
झाडाच्या फांदीला धरून ह्यांच्या पायाभरणीला (विणण्याला) सुरुवात होते.
किती बारीक लक्ष आहे पहा, ही मादी सुगरण असावी. आपल घरकुल व्यवस्थित झाला की नाही ते पडताळून पाहात आहे.
हा सुगरण बिचारा विणून विणून थकलेला दिसतोय. एकदाच जोर मारला असेल त्याने खोपा लवकर तयार होण्यासाठी.
खोप्यांच्या इंटेरियर व डिझाइन्स मध्ये थोडा फार फरक जाणवतो.
हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच वसवतात. एखादे लांबचे म्हणजे रहदारी जिथे कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही अशा ठिकाणी असलेले झाड बहूतेक निवडतात असा माझा अंदाज आहे. एकाच झाडावर ह्यांची १५-२० जणांची वस्ती विसावते.
ह्या सुगरणी तसेच बरेच घ्ररटे करणारे पक्षी आपल्या पिलांना जन्म देतात आणि बाळे स्वावलंबी झाली की नंतर घरटी सोडून देतात. खास आपल्या बाळांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी किती मेहनतीने ही घरटी बनवतात. एकच इश्वरचरणी प्रार्थना आहे की आजच्या ह्या सिमेंटच्या जंगलात ह्यांच्या वस्तीला कुणाची नजर न लागो उलट अधिकाधिक त्यांच्या हिरव्या वस्त्यांची ठिकाणे त्यांना उपलब्ध होवोत.
(हे लेखन जालरंग प्रकाशनाच्या दिपोत्सव ह्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशीत झाले आहे. जालरंगच्या टिमचे आभार)

(हे लेखन जालरंग प्रकाशनाच्या दिपोत्सव ह्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशीत झाले आहे. जालरंगच्या टिमचे आभार)लेखनविषय:
वाचने
15227
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
सुंदर !
असे झाडावर लटकलेले खोपे पाहिले आहेत... :)
अप्रतिम गं ताई! तु लई बेश्ट आहेस :)
(पक्ष्यांचे हावभाव अगदी अचुक टिपले आहेत! मला तर हे फोटो बघतांना कुठ्ल्या तरी पक्ष्याची वा किड्याची किरकीर असते ना अश्या झांडांभोवती तसं काहिसं ऐकण्याचा भास होत होता :) )
मस्त :)
आम्ही लहानपनी अशी अन अजुन विविध प्रकारची घरटी गोळा करुन शाळेच्या कपाटात ठॅवायला द्यायचो ,इतराना पाहता याव म्हणुन !
त्याची आठ्वन झाली :)
खुप छान...
वरुन तिसरा आणि शेवटुन पाचवा फोटो विशेष आवड्या...
लईच भारी फटू की व्हो जागुताई ! हा खोपा प्रकार य वेळा बघितला होता पण त्याचे आर्किटेक्ट आणि डेव्हलपर असे दिसतात हे पहिल्यांदाच समजलं. हे फटू काढणं म्हणजे फारच पेशन्सचं काम आहे ! भारी जमलंय !
(कधीही सुगरणींचं "बर्ड वॉचिंग" न केलेला)
जे.पी.
In reply to लईच भारी फटू की व्हो जागुताई by जे.पी.मॉर्गन
करुन बर्ड 'सुगरण' आहे की नाही ते समजत नाही! ;)
(सुगरणप्रेमी) रंगा
In reply to फक्त वॉचिंग by चतुरंग
हाहाहा... अशा अनुभवांती आलेल्या भाष्यावर फारसं काही बोलता येत नाही!
In reply to फक्त वॉचिंग by चतुरंग
कुठं काय बोलावं?
छान माहिती आणि फोटो
मस्त फटू गं जागूतै.... सगळे आवडले !! :)
मी पाहिलेले बहुतेक सगळे खोपे हे बाभळीच्या झाडांवर बांधलेले होते आणी मला वाटतं वरच्या फोटोत दिसणारं ते झाडही बहुतेक बाभळीचच आहे.
मदनबाण, उदय, डावखुरा, मॉर्गन, जाई, सुहास धन्यवाद. धन्यवाद.
पियुषा आमच्याही शाळेच्या प्रयोगशाळेत घरटी असायची.
किसन हे सुगरण पक्षी बाभुळ, ताड, नारळ अश्या उंच झाडांवर घरटी करतात. वरचे बाभळीचेच आहे.
फोटो छान आलेत. मला नेहमीच या पक्षांचे कौतुक वाटतं!!
एका सुगरणीने काढलेले दुसर्या सुगरणीचे फोटो आवडले ;)
चतुरंग, मोहनराव, नरेश धन्यवाद.
पक्षीण म्हणे राहण्याच्या आधी घरटं तपासून पाहते. आवडलं नाही तर तोडून टाकते.
तिच्या मनास येईपर्यंत पक्षी घर विणत राहतो.
फोटो आवडल्या गेले आहेत.
तुझ्यातला फोटोग्राफर ला सलाम!!
काय सुंदर फोटोग्राफी आहे तुमची जागुताई..एकदम मस्त!! :)
जागुताई, खरी निसर्गप्रेमी आहे!
किती सुरेख गोष्टी, ज्या रोजच्या शहरी जिवनात नजरेआड आणि स्मृतीआड झालेल्या असतात, त्यांचा आनंद जागुताईच्या धाग्यांमुळे मिळतो.
सुगरण पक्षी तर मी पहिल्यांदा पाहिला. केवळ एका वेळी अंडी घालण्याकरता एवढी मेहनत घेवून खोपा बांधण्याचे खूप कौतुक वाटते.
In reply to निसर्गप्रेमी by स्मिता.
:)
सगळेच फोटू भारी आलेत.
प्राजू, पुनम, स्मिता, अनामिक धन्यवाद.
खुप छान आहेत घरटी. सुगरन पक्षी आजच पहिला आणि त्याचे घरटे लहान असतांना काकांच्या घरी पाहीले. धन्यवाद जागुताई.
खोपे पाहुन गावच्या शेतातील खोपे आठवले.
आमचेही दोन पैसे.
(गेल्या वर्षी आमच्या अंगणातल्या बागेत एका पाखराने संसार थाटला होता. एका पानाच्या आड लपलेलं हे घरटं आधी दिसलंच नाही.)

जागुचे फोटो आणि माहिती झक्कास आहेच पण दिपालीचेही फोटो छान!
In reply to मस्त! by पैसा
खूप सुरेख फोटो, आणि त्याहीपेक्षा निसर्गाकडे पाहण्याची नजर.
सुगरण पक्षी ही घरटी विशिष्ट आकारात, लोंबत्या स्वरुपात आणि एकत्र बांधतात त्याचं एक कारण म्हणजे सापांपासून अंडी आणि पिलांचं संरक्षण हेही असतं असं ऐकल्याचं आठवतं.
दिपाली यांचीही प्रकाशचित्रं उत्तम आहेत, फक्त ते पक्षी 'शिंपी/ण' या नावाने ओळखले जातात. सुगरण (weaver bird) यांपेक्षा शिंपी हा वेगळा* पक्षी आहे.
शिंपी (common tailor bird) आपले खोपे करतांना पानांच्या कडा एकमेकांना शिवून त्यात घरटं बांधतात, सुगरण पक्षी पानं न वापरता वाळलेल्या काटक्या वापरतात.
[*सुगरण पक्षी प्लॉसिडी (Ploceidae) या Family तील Ploceus pelzelni या नावाने ओळखला जातो तर शिंपी Cisticolidae Family तील Orthotomus guzuratus किंवा Orthotomus patia अशा प्रकारात मोडतो.]
In reply to मस्त फोटो आणि माहिती by बहुगुणी
धन्यवाद.
तो पक्षी पाहिला होता आणि तो सुगरण नाही हेही माहिती होतं पण नक्की कुठला पक्षी हेच माहीती नव्हत.
जागुताइ फार अप्रतिम माहीतीपूर्ण धागा काढलात ... ही सुगरणाची घरटी खुपवेळा पाहीली,,,मोकळी काढुन घ्ररी आणुन टांगली देखिल...पण अशी अप्रतिम माहीती कुठेही मिळाली नव्हती...वाहवा या धाग्याबद्दल खरच,मनापासुन धन्यवाद
अवांतर---ही घरटी यांच्यातला नर बांधतो,हे कळल्यामुळे या 'नराला' खराखुरा घर-गडी म्हणावेसे वाटते :-)
सगळ्यांचे धन्यवाद.
दिपाली मस्त फोटो आहेत. बुलबुल पण असेच घरटे करतात.
सर्व छायाचित्रे मस्त आहेत. तसेच त्या साठी निवडलेल्या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीही समर्पक आहेत.
दिपालीप्रतिक ह्यांनी काढलेली दोन्ही छायाचित्रे सुंदर आहेत. त्यातल्या त्यात अंडीवाले छायाचित्र खासच आहे.
श्री. बहुगुणी ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे सुगरणीच्या घरट्याची रचना, आकार अंड्यांचे/पिल्लांचे सापांपासून रक्षण करण्यासाठीच असते. तसेच, उन-वारा-पाऊस ह्यापासूनही घरट्याच्या विशिष्ट घडणीमुळे पिल्लांचे रक्षण होते.
पुर्वी माणसातही नरच घरटे बांधायचा/विकत घ्यायचा. मादी त्या घरट्यावर भली-बुरी टिका टिपण्णी करायची. पण वाढत्या महागाईला शरण जात आता मादीही घरटे बांधण्यात/विकत घेण्यात नराला मदत करते.
सुगरण पक्षाला/पक्षिणीला 'सुगरण' का म्हणत असावेत?
चित्रा धन्यवाद.
प्रभाकरजी खरे आहे. आजकाल माणसांत दोघ मिळून घरट बांधतात.
सुगरणीला आता सुगरण का म्हणतात हे मात्र कोड आहे.
वाह!!
मस्त आले आहेत फोटो. :)
हे पाहुन मला मी टाकलेले हे फोटो आठवले.
http://misalpav.com/node/3661
सुंदर ! असे झाडावर लटकलेले