✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोकण दर्शन मदत हवी आहे.

म
मानस् यांनी
गुरुवार, 11/10/2011 - 15:16  ·  लेख
लेख
महाराष्ट्रात राहून कोकण पाहिलं नाहीस? असं आजपर्यंत बर्‍याच लोकांकडून ए॓कून घेतलय्...पण आता डिसेंबरमधे मिळणार्‍या सुट्टी व संधीचा फायदा घ्यावा म्हणतोय. मी माझ्या कुठुंबासह २३ ते ३१ डिसेंबर कोकण दर्शनाचा प्लान करतोय. कोकणात ही माझी पहिलीच ट्रिप आहे,इथे बरेचजण कोकणातले असल्याने/ कोकणात जाऊन आले असल्याने मदत करु शकतील असे वाटले. ८ दिवसात काय काय पहाता येइल? साधारण टूर प्लान कसा करावा? रहाण्यासाठी/जेवणासाठी शक्यतो घ्ररगुती चांगली ठिकाणे माहिती असतील तर सुचवाल का प्लीज? मागे एकदा या आशयाचा धागा वाचल्याचे आठवते पण खूप शोधूनही तो धागा सापडला नाही...कोणाला माहिती असेल तर क्रूपया URL द्या. धन्यवाद.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
72609 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

वेश्वी-बागमांडला फेरी बोट

सुनील
Tue, 11/19/2013 - 15:00 नवीन
वेश्वी-बागमांडला फेरी बोट घेवुन
ह्या फेरीवर चारचाकी घेतात का?
मुंबई-गोवा हायवेला न जाता मुंबई ते गोवा जाण्याची इच्छा असलेला
यस. एन्ड टू एन्ड किनारी सफर करायची आहे एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

हो घेतात. मी स्वतः गेलो आहे

सौंदाळा
Tue, 11/19/2013 - 17:11 नवीन
हो घेतात. मी स्वतः गेलो आहे कार घेऊनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मस्त माहिती... हा दुवा तर गवि

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/19/2013 - 23:37 नवीन
मस्त माहिती... हा दुवा तर गवि आणि तुमच्या माहितीपूर्ण प्रतिसादाने संग्राह्यच नाही तर कोकण सहलीचे आयोजन करताना आवश्यकच झाला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

दुसरे दिवशी सकाळी गोपाळगड

परिंदा
Tue, 11/19/2013 - 12:29 नवीन
दुसरे दिवशी सकाळी गोपाळगड गाठा . या ठिकाणी लाईट हाउस मध्ये वरती जायला देतात.
हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. 'टाईम प्लीज' या मराठी चित्रपटाचा शेवटचा भाग इथेच चित्रीत केला होता.
  • Log in or register to post comments

माझा अनुभव .माझी मुलगी चार ते

कंजूस
Tue, 11/19/2013 - 13:48 नवीन
माझा अनुभव .माझी मुलगी चार ते दहा वर्षे होईपर्यंत चारपाच वेळा जाऊन कोकण पाहिले .केवळ समुद्र पाहिजे म्हटले तरी सर्व किनारे सुरक्षित नाहित . मुलांना देवळे फार आवडत नाहित .मुरूड कर्देला हॉटेल किनाऱ्याजवळ असले तरी मुले (दुसरी मुले नसल्यास) दुपारी 'बोअर' होतात .कोकणात बऱ्याच ठिकाणी हॉटेलवाले फक्त रुम भाड्याने देत नाहित तर नाश्ता ,चहा ,दोन जेवणाचे प्रत्येकी अमूक रूपये असा रेट(माथेरान सारखा) घेतात त्यात काटछाट करत नाहीत .यात नुकसान होते .पुण्याकडून कोकणात उतरायला कोणता घाट कार ड्रायविंगला बरा वाटतो तोच नेहमी कायम ठेवा .
  • Log in or register to post comments

कोणत्या किनारी अशी व्यवस्था आता उपलब्ध आहे का ?

घन निल
Wed, 11/20/2013 - 12:43 नवीन
बऱ्याच वर्षांपूर्वी गणपतीपुळे , मालवण च्या सहलीवर गेलो होतो , तिथे कुठल्यातरी मुक्कामी किनार्यावरच्या वाळूत , सुरुच्या झाडांमध्ये बांबूची घरे आहेत त्यात मुक्काम केल्याचे आठवते आहे ,पण ते नेमके ठिकाण कोणते ते आठवत नाही . २ री , ३ रीत असेन फार तर तेंव्हा , घरच्यांसोबत गेलेलो … आता मी घरच्यांना तिथेच घेऊन जावे अशी इच्छा आहे . पण ठिकाण आठवत नाही कोणत्या किनारी अशी व्यवस्था आता उपलब्ध आहे का ?
  • Log in or register to post comments

मदत...

ब़जरबट्टू
Mon, 06/02/2014 - 19:04 नवीन
जुनच्या शेवटच्या आठवड्यात को़कणचा प्लान करणे हे ईष्ठ ठरेल का ? म्हणजे पाउस कदाचित असेल ( का उकाडा ?), पण बीचवर जाताच येणार नाही, अशी परिस्थिती असेल का ? साधारण आठवडा थाम्बायचा विचार आहे, तारकर्ली, गणपतीपुळे असा... जाणकारांनी मार्गदर्शन करावे....
  • Log in or register to post comments

निसर्गाच्या तर्‍हा बघायला

असंका
Tue, 06/03/2014 - 12:19 नवीन
निसर्गाच्या तर्‍हा बघायला जाणार तर एक विलक्षण अनुभव मिळेल. पावसाची शक्यता ९९%. समुद्रकिनारी जायची कल्पनाही करू शकणार नाही असे भयावह वातावरण. भयानक उकाडा. घामाच्या धारा लागणार. पाऊस नसेल तर घामाने तुम्ही गच्च ओले होणार. चांगला आनंददायक अनुभव नाही. (मी गेली चार/पाच वर्षे दर महिन्याला एक दोनदा घाटावरून रत्नागिरीला जा ये करतो. त्या अनुभवावरून सांगत आहे. तेवढा जाणकार नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

धन्यवाद....

ब़जरबट्टू
Wed, 06/04/2014 - 09:38 नवीन
व्यनि केला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

फिरायला?

पैसा
Wed, 06/04/2014 - 16:31 नवीन
अजिबात येऊ नका. जून शेवटचा आठवडा आणि जुलै पहिला आठवडा, आम्ही लोक नाइलाज झाला तरच घराबाहेर पडतो. लाईट जाणे, रस्त्यात, रेल्वे मार्गात अडथळे हे नेहमीचेच आहे. त्यात जर मजा वाटणार असेल तर या. नाहीतर काय तोपाऊस म्हणून शिव्या द्यायची वेळ येणार असेल तर अजिबात येऊ नका. एका दिवसात काही इंच पाऊस पडणे वगैरे हमखास बघायला मिळेल. पण अशा हवेत घरात गप्प बसून राहणे हे शहाणपणाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

धन्यवाद छान माहीती

गणेशा
Tue, 12/15/2015 - 09:43 नवीन
धन्यवाद छान माहीती
  • Log in or register to post comments

कोकन दर्शन मद्त

ओशो
Wed, 06/07/2017 - 08:32 नवीन
गवि आम्ही पति पत्नी व ४ वर्षाचा मुलगा कोकण दर्शन साठी जात आहोत. स्वतचे वाहन नाही . कोल्हापुर पर्यंत ट्रेवल्स ने येतोय. तर पुढ्च नियोजन कसे करावे. आम्ही गणपतीपुले पाहून येणार होतो आणखी काय काय आणि कसे पाहता येईल.
  • Log in or register to post comments

नियोजन असे आहे पण तरी कोकण अर्धवट राहतोय अस वाटत

ओशो
Wed, 06/07/2017 - 08:37 नवीन
आपल्या अनुभवा नुसार , नियोजन नुसार काय बदल करावा ? माझे नियोजन कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन कन्हेर मठ 15km (OLD बेंगलोर हाईवे) शाहू पैलेस 3KM नानीज किंवा पुले मुक्काम Stay नानिज to पुले 50 km दुसरा दिवस आगमन गणपती पुले 7am गणपति पुले दर्शन गणपति दर्शन ८ am , प्राचीन कोकण, माल्गुंड बिच 5km बीच 6 PM Stay Gp तिसरा दिवस महाबलेश्वर दर्शन : पाचगनी stay महाबलेश्वर or पुणे प्रस्थान महाबलेश्वर to पुणे 117 km (at ngt or mrng) चौथा दिवस पुणे दर्शन
  • Log in or register to post comments

लिमिटेड कालावधीसाठी ठीकच आहे

गवि
Wed, 06/07/2017 - 18:19 नवीन
लिमिटेड कालावधीसाठी ठीकच आहे तुमचा प्लॅन. एंजॉय करा आणि वृत्तांत फोटोसहित लिहा. शुभेच्छा...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओशो

मालगुंडला केशवसुतांचं स्मारक

अनुप ढेरे
Wed, 06/07/2017 - 09:39 नवीन
मालगुंडला केशवसुतांचं स्मारक पहा. उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

ओशो
Wed, 06/07/2017 - 11:53 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा