शब्द कसे अलगद उतरत असतात मनामध्ये
कधीही ,केव्हाही
अचानक ....!
तेव्हाच त्यांना बंदिस्त करावे लागते
नाहीतर ते उडून जातात पाखरासारखे
त्याना बघावे मनात पसरताना
हलके हलके फुलताना
शब्दाना अनेक अर्थ फुटत जातात
तेव्हा ते काळीज कोरून जातात
काळजात ते जपून ठेवावे लागतात
नाहीतर ते हरवून जातात ....
कसे रुमझुमत येतात शब्द .....
जेव्हा मन असते फक्त निशब्द
शब्द शब्द झेलून घ्यावा
जेव्हा वाटतो शब्द नवा
तेव्हाच शब्दांच्या सरीत भिजून जावे
जमले तर गाणे गावे
गाता गाता एक होईल
एखादी कविता
गिरकी घेऊन गाणे गाईल .....!!
कसे अलगद शब्द उतरत असतात मनामध्ये
त्यांना फक्त बघत बसावे ....!
नि हलकेच त्याना कवेत घ्यावे ....!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1596
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
शब्दांवाचून कळले सारे
सुंदर
अप्रतिम ...
शब्द-
झकास
मस्त.
शब्दाना अनेक अर्थ फुटत
शब्दातून उलगडून सांगितले सारे