✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हल्ली मी लिहीतच नाही .....

फ — फिझा, Tue, 11/08/2011 - 16:47
हल्ली मी लिहीतच नाही ..... हल्ली मी लिहित नाही शब्दांची उधळण झेपत नाही बोचरे शब्द व तुटक्या भावना ... म्हणून मी कागद आता शोधतच नाही .... हल्ली मी लिहीतच नाही ..... मनात राहून गेलेले अस्फुट काहीतरी ..... कवितेमध्ये कधी उमटलेच नाही .... भावना कमी पडली कि प्रतिभा याचा विचार आता करतच नाही ... हल्ली मी लिहीतच नाही ..... काही आठवणी खरडल्या खुळ्या त्याच मग घेऊन गेल्या टाळ्या..... हसता हसता पण रडणे कधी जमलेच नाही ...... हल्ली मी लिहीतच नाही ..... लिहायला घेतले कि आता पाऊस येतो इतका बरसतो कि कागदच ओला होतो चिंब डोळे पुसले तरी आठवणी पुसणे जमतच नाही ...... हल्ली मी लिहीतच नाही .....
  • हल्ली मी लिहीतच नाही ...(२)...
  • हल्ली मी लिहीतच नाही ...(३)

Book traversal links for हल्ली मी लिहीतच नाही .....

  • हल्ली मी लिहीतच नाही ...(२)... ›

प्रतिक्रिया द्या
3141 वाचन

💬 प्रतिसाद (14)

व्वा व्वा क्या बात ! क्या बात

पियुशा
Tue, 11/08/2011 - 17:14 नवीन
व्वा व्वा क्या बात ! क्या बात ! क्या बात :)
  • Log in or register to post comments

सुंदर

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 11/08/2011 - 17:27 नवीन
सुंदर रचना!! खुप आवडली.
लिहायला घेतले कि आता पाऊस येतो इतका बरसतो कि कागदच ओला होतो चिंब डोळे पुसले तरी आठवणी पुसणे जमतच नाही ......
क्या बात!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

मदनबाण
Tue, 11/08/2011 - 17:30 नवीन
अप्रतिम... :)
  • Log in or register to post comments

कविता/मुक्तक

चित्रा
Tue, 11/08/2011 - 19:02 नवीन
आवडले. एकच सुधारणा सुचवते: "कि" हे "की" असे लिहावे (मी तरी ते तसेच वाचलेले आहे). अवांतर: आंतरजालावर मनोगतावरचा हा दुवा अतिशय उपयुक्त आहे. - जे आपल्या लिखाणासंबंधी जागरूक आहेत, अशांनी तो जरूर पहावा. http://www.manogat.com/node/6774 आपल्या सर्वांच्याच र्‍ह्स्व दीर्घाच्या चुका नेहमीच होत असतात. http://www.manogat.com/node/6734
  • Log in or register to post comments

हल्ली...

विदेश
Tue, 11/08/2011 - 19:15 नवीन
चिंब डोळे पुसले तरी आठवणी पुसणे जमतच नाही ...... मस्त !
  • Log in or register to post comments

अतिशय आवडले !

वाहीदा
Tue, 11/08/2011 - 19:22 नवीन
मनात राहून गेलेले अस्फुट काहीतरी ..... कवितेमध्ये कधी उमटलेच नाही .... भावना कमी पडली कि प्रतिभा याचा विचार आता करतच नाही ... ___/\____
  • Log in or register to post comments

छान

जाई.
Tue, 11/08/2011 - 19:25 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लिहायला घेतले कि आता पाऊस

मनीषा
Wed, 11/09/2011 - 07:40 नवीन
लिहायला घेतले कि आता पाऊस येतो इतका बरसतो कि कागदच ओला होतो चिंब डोळे पुसले तरी आठवणी पुसणे जमतच नाही .... वा! खूपच छान ... पण आठवणी पुसायच्या कशाला ? आपल्याच असतात.... जपून ठेवायच्या . सुरेख कविता !
  • Log in or register to post comments

सुंदर... अप्रतिम रचना

सुहास झेले
Wed, 11/09/2011 - 09:42 नवीन
सुंदर... अप्रतिम रचना :) :)
  • Log in or register to post comments

क्लास्स्स्स्स. अम्मळ जास्तच

प्यारे१
Wed, 11/09/2011 - 10:36 नवीन
क्लास्स्स्स्स. अम्मळ जास्तच हळवी वाटते कविता.
  • Log in or register to post comments

मस्त!

sneharani
Wed, 11/09/2011 - 10:39 नवीन
मस्त कविता! :)
  • Log in or register to post comments

छान

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/09/2011 - 11:07 नवीन
न लिहिण्याची कारणं कवितेतून उत्तम व्यक्त झाली आहेत. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर कविता लिहायला घेतले कि

गणेशा
Wed, 11/09/2011 - 11:57 नवीन
सुंदर कविता
लिहायला घेतले कि आता पाऊस येतो इतका बरसतो कि कागदच ओला होतो चिंब डोळे पुसले तरी आठवणी पुसणे जमतच नाही ......
मस्त
  • Log in or register to post comments

अव्वल !!! माणगये उस्ताद....

वपाडाव
Wed, 11/09/2011 - 12:05 नवीन
अव्वल !!! माणगये उस्ताद....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा