तू फक्त उभा राहा
लेखनविषय (Tags)
मित्राच्या लग्नात तिला पहिल्यांदा पाहिलं.पूर्णवेळ स्टेजवर दीपकच्या पाठीमागे. कधी रुमालाने कुंकू नीट कर,कधी मुंडावळ्या बांधायला मदत, कधी हातातल्या गोष्टी मागे पास कर....अशी बरीच काम पुढाकार घेऊन करत होती.कॅमेरामनच लक्ष आपल्याकडे आहे अस दिसलं कि २-४ छान पोझेही द्यायची.मी कॅमेरामन नाही याच राहून राहून वाईट वाटत होत.थोड्यावेळाने मला आता ह्याची बायको थोड्यावेळाने तिला हात धरून मांडवाबाहेर काढते कि काय अशी भीती वाटत होती.कारण वधु पेक्षा तीच जास्त भाव खून जात होती..निळ्या रंगाची वर्कची साडी तिचा जम शोभून दिसत होती!हळदीच्या कार्यक्रमात मांडवातल्या अनेक बायकांनी तिला ' उष्टी हळद लावली कि लग्न लवकर जमत!'म्हणून रंगवाली होती.दुपारची जेवण झाली.लग्न संध्याकाळी होत.
नवर्या मुलाच्या रुममध्ये मध्यावेलेत बाईसाहेब "दादा ,चेहर्याचा हा पिवळा रंग कसा काढू.?इथे डव्ह कुठे मिळेल? " म्हणत नवर्या मुलाच डोक खात होत्या.बिचारीचा चेहरा आता लाल होत आता होता.तिच्या डोळ्यातून पाणी यायच्या आधी मी चान्स घेतला.खरतर हि दिप्याची बहिण आहे हे कळल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी यायायचं बाकी राहील होत.
' इथे जवळच एक दुकान आहे.तिथे मिळेल'
' हो पण मी अशी कशी जाऊ तिथे?'(म्हण्जे तुम्हीच आणून द्याना...तुमचाच पैशांनी)
चायला उगीचच बोललो.कारण त्या दुकानात डव्ह न्हवता.लग्न एव्द्य्हा आडबाजूला होत कि जिथून घेतला त्याने मुळातच महाग असलेल्या डव्ह चे १० रु. जास्त घेतले.
'थन्क यु.' तिने एक गोड स्मैल देत डव्ह हातात घेतला.
मित्राच्या कॅमेराशी खेळता खेळता मी तिचे १०-१२ फोटो काढून घेतले.
दिप्याही हुशार होता.बोलला माझी चुलत बहिण आहे.मी काय बोलू न काय नको अशी अवस्था असताना
'घाबरू नकोस मित्रा.आई मला कालपासून तुझ्याबद्दल विचारात होती.पिनू साठी.सकाळपासून माझी आई,काकू आणि तमाम महिला मंडळ माझ्यापेक्षा तुझ्याकडेच जास्त बघताय.तेव्हा काही वेड वाकड वागू नकोस.आणि हिच्यापासून दोन हात लांब राहा.'
'काय?'- मी
'हो,पत्रिका द्यायला घरी गेलो तेव्हा काकू म्हणत होत्या.तू 12 ला अमेरिकेहून येनाराहेस.लग्नाविषयी टाळाटाळ करतोयस,पण यंदा आला कि उरकून टाकायचं वगैरे.तेव्हाच आईला बोललो आपला पक्या कसा वाटतोय पिनुसाठी?'
आयला..ह्याने तर पार माझी विकेट उडवली होती.
तेवढ्यात ती आली.'आता कशी दिसतीये मी?गेला का हळदीचा रंग?माझा मेक उप बिघडून जाईल नाहीतर.'
'पिनू तसाही तुला कोणी बघणार आहे?आणि तयारी करून घे लवकरच तुझ्याही अंगाला हळद लागणार आहे'-दिप्या
'गप्पच बस!मी नाही लग्नाच्या भानगडीत पडणार.डोक्याला ताप नुसता' अस बोलत ती परत तोंड धुवायला बाथरूम मध्ये निघून गेली!
'पक्या संध्याकाळी काकू पण येणार आहेत.तुमची पत्रिकाही जुलातिये.तुझा हो असेल तर मी घरच्यांना तयार करतो'-दिप्या
'पंकज म्हण, पक्या नको'
'म्हण्जे तू तयार आहेस तर'-दिप्या
'मी अस कधी बोललो?मुळात मला न सांगता तुम्ही पत्रिका कशी काय बघितली?आई देखील मला काहीच बोलली नाही!'
'तुझी काळजी आहे न म्हणून.मीच काकौना सांगितलं होत पक्याला काही सांगू नका म्हणून.नाहीतर तू माझ्या लग्नालाच आला नसताच.'-दिप्या
'तिला माहित आहे का?'
'नाही.जर माहित असत तर ती तुझ्याशी बोललीच नसती!'-दिप्या
'पण ती तयार होईल का लग्नाला'
'होईल, मी तयार करेन तिला.तसा माझ्या आईला आणि काकूला तू पसंत आहेस.संध्याकाळी काका तुझी मुलाखत घेतील.त्यात पास हो म्हण्जे झाल.
२ दिवसांनी जागरण गोंधळ आहे.त्याच्या दुसर्या दिवशी तुझ्या बैठकिच बघू'-dipya
'एवढ्या लवकर?दिप्या तू तर फक्त लग्नाचा मुहूर्त बाकी काढ्याचा ठेवलाय'
'अरे तूझी सुट्टी दोन महिन्यांचीच आहे.त्यातला एक आठवडा गेला.पुढचा एक आठवडा बोलणी करायला जातील.म्हण्जे १५ दिवस गेले.उरलेल्यांपैकी २७,२९ आणि पुढ्या महिन्याच्या ३,७,९,१५ ह्या तारखा मुहूर्ताच्या आहेत.'-दिप्या
मला चक्कर यायचीच बाकी होती.
'तू एवढ सगळ कधी ठरवलं?'
'मी एकता नाही..मी आणि काकू मिळून.तू अडकलास पक्या!तुझ्याही डोक्याला मुंडावळ्या लाताकातायात आता.'
जवळ जवळ दीड तास आमच बोलन चालाल होत.इतक्यात
प्रतिक्रिया
मस्त..
हम्म असंच दिसतय!! 'इतक्यात'
हा हा हा हा... एकदम मस्त..
किचेनतै
मस्त
मस्त... ज्योतिषवाले, नाडीवाले
ह्याह्याह्या.. ह्या वधूवर
नुसतंच कौतुक करत बसु नका आता
हायला!
पक्याची खरीच मज्जा आहे
एरवी आवडत्या पोरीसाठी किती
हे ऐका
काय म्हणता ध.वा.? अनुभव तरी
टाकूयात की.
संत तात्याबांचा ब्लॉग वाचला
चांगली कथा आहे, पुढचा भाग
नम्र विनंती, तुम्ही नविन आहात
पेशंटशी सहमत.
धन्यवाद, कारण इथं सगळेच काही
मस्त झालिये सुरुवात... पुढचा
मायला एकदम जाऊ बाई जोरात....