Skip to main content

आरास रास

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 31/10/2011 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
अथांगास काय हिरे माणके सभोवर कनक रुप्याची आरास रास अंगभर तरी त्यास मोहवे मोर पाचुवांचा सद्गदीत धरा सवे मेघ आळवांचा सकाळी सकाळि मोतियांचे धुके- स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि उधळे जगी रंग चित्त झुंझवाया ऋणांचे खळे आगळे वेगळे- स्नेह वाटे परी गोत हे सोवळे आंसवांना नसे दु:ख खारे इथे निर्झराचे पिसे अवखळे खळखळे .................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1053
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सकाळी सकाळि मोतियांचे धुके- स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि उधळे जगी रंग चित्त झुंझवाया
...................!!