मदतः अॅन्ड आय ड्रॉईड :)
राम राम मंडळी!
काय मग? कशी काय झाली दिवाळी? झाले का फटाके उडवून? फराळाचं चापून गंडलेली पोटं आली का जागेवर? :D
मंडळी, हा धागा मी काढलात तो आहे मदत मागण्यासाठी. मोबाईलजगतात अगदी क्रांती म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण करणार्या अॅन्ड्रॉईड प्रणालीवर आमचा नुकताच जीव जडलाय बघा. :) पण...आम्ही पडलो एकतर विंडोज मोबाईलवाले गरीब वापरकर्ते, आणि एकुणच तंत्रज्ञान, प्रणाली(Operating System) ह्या विषयातले तद्दन ढढ्ढोबा!
गेला आठवडाभर झाला, सॅमसंगच्या अॅन्ड्रॉईड फोनशी खेळतोय खरा, पण त्यातल्या सोयी आणि एकुणच अॅन्ड्रॉईडबद्दलचं कुतुहल काही गप्प बसू देईना बॉ! मग म्हणलं, करावं तरी काय? तर ध्यानात आलं, आपले मिपाकर आहेत की. निरनिराळ्या क्षेत्रातली तज्ज्ञमंडळी इथं येत असतात, त्यांची काही मदत मिळते का ते पहावं म्हणलं. म्हणजे, आपल्यालाही मदत होईल अन आणखी कोणी असाच अडला असेल तर त्यांचीही सोय होईल. काय म्हणता? :)
मी सध्या वापरत असलेल्या अॅन्ड्रॉईड २.३ (जिंजरब्रेड) वर काही अॅप्लिकेशन्स टाकली आहेत (अर्थातच, फुकट असलेली हेवेसांनल ;) ). त्यापैकी
अॅन्ड्रॉईड असिस्टन्ट हे मेन्टेनन्स अॅप मला बरं वाटलं. (अर्थातच, चकटफू असलेल्या गोष्टीत जितकं जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळतील तितकं छानच. :) हे अॅप त्यातलंच. )
अॅस्ट्रो फाईल मॅनेजर ह्या अॅप्लिकेशनचा वापर मी मुख्यतः कॉम्प्युटरवर उतरवून घेतलेल्या .apk फायली फोनमध्ये भरण्यासाठी आणि तिथून वापरण्यासाठी करतो.
ऑडिओबूक्स अॅप्लिकेशनच्या कृपेने फुकटात शेरेलॉक होम्सच्या गोष्टी ऐकतोय. ह्या अॅपच्या लायब्ररीमध्ये बरीच ऑडिओबूक्स आहेत, गलिव्हर्स ट्रॅव्हल, टॉम सॉयर वगैरे लहानपणी मराठीत वाचलेल्या गोष्टी हल्ली इंग्रजीत ऐकायला मिळतायत :)
पण, खरं सांगू का? स्वतः हातात पुस्तक घेऊन ते वाचण्याची मजा ह्या ऑडिओबुकात आज्याबात नाही. अगदीच वेळ नसलेल्यांसाठीची एक सोय. घरुन नोकरीच्या ठिकाणी जाताना उशीर होतो म्हणून पोळीभाजी केंद्रातून पार्सल उचलल्यासारखी. घरच्या पोळीभाजीची मजा त्यात नाही! ते असो.
बाकी मग, QR Scanner, App2SD ह्यासारखे टूल्सही वापरून पाहतो आहे.
हे सगळं झालं वरवरच्या गोष्टींबद्दल. मला आणखी माहिती हवी आहे
१.ती आणखी कोणती चांगली अॅप्लिकेशन्स (अर्थातच शक्यतो चकटफू!) आहेत, ज्यांचा वापर करुन फोनची प्रॉडक्टिव्हिटी, फंक्षनॅलिटी वाढवता येईल?
ह्यासोबत तुमच्या आवडीची कोणती विशेष अॅप्लिकेशन्स आहेत त्याबद्दल सांगितलं तर माहिती नसतील तर ती वापरुन पाहता येतील. :)
२.महत्वाचा मुद्दा: अॅन्ड्रॉईड रूटिंग!
आयफोन्समध्ये जसं जेलब्रेक केलं जातं, तसंच अॅन्ड्रॉईडमध्ये फोन रूट (root) करुन सिस्टिम्स अॅक्सेस मिळवण्यासाठी सुपरयुजरचे अधिकार मिळवता येतात असं ऐकून्/वाचून/पाहून आहे.(जय गुगलबाबा! ) )
ह्या रुटिंगमुळे म्हणे फोनची वॉरंटी अवैध ठरते. पण रुटिंग करण्याचे बरेच फायदेही असतात. जसे खूपसे अॅप्लिकेशन्स आहेत, जे एरवी ज्या फोनवर चालणार नाहीत, त्यांना चालवण्याचा प्रयत्न बर्याचदा रुटिंगमुळे यशस्वी ठरतो. तसेच अॅडव्हान्स बॅकअप, रॉम अपग्रेड वगैरे किचकट आणि लै भारी टेक्निकल गोष्टी करता येतात म्हणे.
तर ह्या रुटिंगचे फायदे-तोटे, ते केल्यावर काय काय करता येऊ शकेल, त्याचे धोके काय इत्यादी माहिती मिळाली तर मंडळ आपले अत्यंत आभारी असेल :)
तर मित्रहो, कराल का मला ह्याविषयात थोडी मदत? :)
आपला,
धमालॅन्ड्रॉईड :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त...
हम्म्म्म
अभिनंदन नविन फोन
परंतु तेथे वायफायचे अधिष्ठान पाहिजे ---