Skip to main content

तुझ्यविना आज.....!!!

तुझ्यविना आज.....!!!

Published on मंगळवार, 25/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
नाही भेटले मी दिवसभर तर त्याने खूप बेचैन व्हावे , भेटण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी त्याने नेहमी आधी यावे ! रोज भेटण्याची ओढ नित्य नेमाची पण नवीन असावी , रोज काहीतरी नवीन बोलण्यासाठी शब्दांची घाई असावी ! डोळ्यांसमोर असावा सतत चेहरा त्याचा हसणारा , आकाश शुभ्र असले तरी, ढग ओढून बरसणारा ! ‘तुझ्याशिवाय मी ’ आता कल्पनेतही नसावी , कल्पनेतील तुझी साथ आता अस्तित्वात असावी ! ज्याची कल्पनाही केली नाही इतकी प्रेमाने भरलेली असावी , माझ्या आठवणीत त्यानेही अशीच कविता लिहिलेली असावी ! सत्य मात्र अबाधित पणे दोघांकडे पाहत असेल , तुम्ही थांबता कुठे कि मी थांबऊ म्हणत असेल ! गुंतत गेलो असे कि आता गाठ सुटणे नाही , नकळतच घडले सारे पण कसली खंत नाही ! उद्या मध्ये काय दडलेले आहे कोण सांगेल का रे , आज नाही भेटलास तर संपेल का रे सारे ! आता हे प्रेम कसली अपेक्षाच करत नाही नाही आज भेटलो म्हणून उद्या बदलत नाही ! भेटलो असतो आज तर बरे झाले असते , असे म्हणत पुढचे आयुष्य सरले असते ! तुटत जातील धागे कदाचित आणि उसवत जाईल वीण , आणि तेव्हा मग जाणवेल जन्माचा शीण ! भावनांना शब्दात मांडायची पूर्ण कोशिश केली पण आज भावनाच इतक्या दाटल्या, कि कविताच अपुरी पडली !
लेखनविषय:

याद्या 1225
प्रतिक्रिया 3

डोळ्यांसमोर असावा सतत चेहरा त्याचा हसणारा , आकाश शुभ्र असले तरी, ढग ओढून बरसणारा ! आता हे प्रेम कसली अपेक्षाच करत नाही नाही आज भेटलो म्हणून उद्या बदलत नाही !
अप्रतिम!!

कविता आवडली.. शिवाय सदस्यनाम चुकून पिज्झा असे वाचल्याने अधिकच गंम्मत आली!