...तुझ्या अस्तित्वाची ओळखीची खुण
हे रिकामं घरं.....
तुझ्या असण्याची ओळख पटवत राहतं....
तुझ्या अस्तित्वाच्या न पुसल्या जाणार्या अमिट खुणा..
ती सोनचाफ्यासारखी पावलं...
अनं ओघळतं गेलेलं दरवाज्यापर्यंतच हसू....!!
तुझं नसणं पण कदाचित तुझ असणंच दाखवतं......!!
ओळखीच्या क्षणांनाही मी दिला नाही मागमूस....
तुझ्या या नसण्याचा...
बिलगत अनोखे ल्यात अपूर्व भान...
आहोत जवळी अजून असाच तो भाव....!!!
दारातला मोगरा अजूनही तसाच फुलतो..
समजावू का त्या निष्पाप कळ्यांनां...?
आता तू नसतेस इथे म्ह्णून...!!
पणं त्या फुललेल्या मोगर्यापरी तुझ येणं ते...?
पारिजातक ही फुलतो अजून...
निशिगंधाच्या सुवासाला वाट देत...!
त्यांना नाही माहितं.. तू नाहीस ते...
पणं पाणि घालतानां ते कोमल हात दिसतं नाहीतं ईतकंच...!!
का जाणवते मल ती जीवघेणी पायरव...
ती तुझ्या अस्तित्वाची ओळखीची खूण...
अनं आभास तुझ्या असण्याचा..
पोकळीतून ज्या तूच निर्माण केली आहेसं...
कधी न भरून येण्यासाठी...
अन तीच तुझ्या अस्तित्वाची खूणं..
अन तेच तुझं ते नसणं...
जे असण्याची चाहूल देतं राहतं...सदैव..!!
लेखनविषय:
याद्या
1543
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
फारच सुंदर!!
अन तेच तुझं ते नसणं... जे
अप्रतिम
सुंदर काव्य आलेले आहे. वहिनी
वहिनी नाहीतच ओ पाभे...!!